Monsoon Foot Care : पावसाळ्यात पायांना खाज सुटतेय? व्हा सावधान! वाढेल इन्फेक्शनचा धोका, असा टाळा संसर्ग

Foot Care Tips : सर्वत्र मुसळधार पावसाचे वातावरण आहे. अशात आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. पावसाळ्यात पाण्यामुळे पायांचे आरोग्य धोक्यात येते. त्यामुळे पावसात पायांची त्वचा जपा.
Foot Care Tips
Monsoon Foot CareSAAM TV
Published On

पावसात वातावरणातील ओलाव्यामुळे पायांना इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो. पायांना खाज येऊन त्वचा लालसर होते. तसचे पावसात मोठ्या प्रमाणात फंगल इन्फेक्शनची समस्या उद्भवते. पावसाच्या पाण्यामुळे पाय कुजतात आणि जखम होते. पावसातील ओलावा आणि घाणीमुळे पायाला बुरशी लागते. त्यामुळे पायाची त्वचा खराब होऊन वेदना होतात.अशात पावसात पायांच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले पाहिजे.

पावसाळी चप्पल ची योग्य निवड

पावसाच्या पाण्यामुळे पायांना इन्फेक्शनच धोका वाढतो. त्यामुळे पावसातून घरी आल्यावर पाय स्वच्छ कपड्यांनी पुसून घ्यावे. पायांमध्ये अडकलेली घाण साफ करावी. तसेच चप्पल सुकवून वापराव्या. पावसाळ्यात प्लास्टिकचे फुटवेअर घालावे. कारण चप्पल पाणी शोषून घेते. ज्यामुळे पायांमध्ये ओलावा निमार्ण होत नाही. तसेच पायांना बुरशी लागत नाही.

सोपे घरगुती उपाय

गरम मिठाचे पाणी

एका मोठ्या भांड्यामध्ये गरम पाणी घेऊन त्यात मीठ घालावे. या पाण्यात पाय बुडवून अर्ध्या तास बसावे. कालांतराने पाय कोरडे करावे. मीठामध्ये अँटी-बॅक्टेरिअल गुणधर्म असल्यामुळे ते पायांची सूज आणि इन्फ्केशन कमी करतात. तसेच गरम पाण्यामुळे पायांची जळजळ आणि सूज कमी होते.

ॲपल सायडर व्हिनेगर

ॲपल सायडर व्हिनेगरमध्ये अँटीफंगल गुणधर्म असतात. जे पायांची खाज लवकर बरी करण्यास मदत करतात. एका मोठ्या भांड्यात गरम पाणी आणि ॲपल सायडर व्हिनेगर घालून त्या भांड्यात पाय बुडवून बसा. यामुळे पायाचे इन्फेक्शन दूर होते.

कडुलिंब

कडुलिंबामध्ये अँटी बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म आढळतात. यामुळे पायांची खाज लवकर बरी होते आणि पायांना आराम मिळतो. कडुलिंबाची पाने स्वच्छ धुवून त्यांची पेस्ट करून घ्या. ही पेस्ट संसर्ग झालेल्या भागावर लावावी. कडुलिंबाची पेस्ट वाळल्यानंतर पाय स्वच्छ धुवून घ्या.

फटकी

पावसाळ्यात फटकी उगाळून पायांच्या बोटांमध्ये लावल्यास खाज येणे बंद होते. तसेच इन्फेक्शन टळते.

डिस्क्लेमर : ही फक्त सामान्य माहिती आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Foot Care Tips
Monsoon Tips: पावसाळ्यात सतत काळ्या आणि लाल मुंग्या येतायत; 'या' घरगुती ट्रिक्स करा फॉलो

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com