Monsoon Tips
Ant Problem Saam Tv

Monsoon Tips: पावसाळ्यात सतत काळ्या आणि लाल मुंग्या येतायत; 'या' घरगुती ट्रिक्स करा फॉलो

Monsoon Tips: पावसाळ्यात अनेकदा ओलाव्यामुळे घरात लाल -काळ्या मुंग्या यायला लागतात. काहीवेळा तर खाण्याच्या गोड पदार्थांमध्येही मुंग्या लागतात.
Published on

पूनम धुमाळ

पावसाळ्यात अनेकदा ओलाव्यामुळे घरात लाल –काळ्या मुंग्या यायला लागतात... काहीवेळा तर खाण्याच्या गोड पदार्थांमध्येही मुंग्या लागतात. अशावेळी आपण बनवलेल्या अन्नाची नासाडी होते... तर अशावेळी मुंग्यांच्या समस्येवर मात करण्यासाठी सोपे घरगुती उपाय जाणून घेऊयात.

Monsoon Tips
Memory Booster Tips : तुम्हाला गोष्टी लक्षात राहत नाहीत का? स्मरणशक्ती वाढवण्यासाठी रामबाण उपाय

हळदीचा वापर...

लाल काळ्या मुंग्या घालविण्यासाठी हळदीच्या पावडरचा वापर करा...ज्या ठीकाणी लाल काळ्या मुंग्या दिसतील तिथे हळद पावडर टाका...

मीठ...

पावसाळ्यात घरात मुंग्यांना दूर ठेवण्यासाठी मीठाचा वापरही करता येईल...घराच्या कानाकोपऱ्यात जिथे मुंग्या असतील तिथे मीठ टाकावे. किंवा मिठाचे पाणी शिंपडावे.

काऴी मीरी...

ज्या ठिकाणी मुंग्या आल्या आहेत त्या टिकाणी काळीमिरी टाकल्यास मुंग्या निघुन जातात...

Monsoon Tips
Precautions from Snakes : घरात साप कधीच घुसणार नाही, किचनमधील पदार्थ त्यांना पळवून लावतील!

लिंबु...

लिंबुची साल जर का आपण कोपऱ्यात टाकून ठेवली तर त्या सालीच्या आंबट वासाने मुंग्या येत नाही...किंवा लिंबु आणि पाण्याचं मिश्रण करून जर का हे पाणी स्प्रे केलं तरी मुंग्या येत नाहीत...

व्हिनेगर...

बाटलीमध्ये व्हिनेगर आणि पाण्याचं मिश्रण करा. आणि हे पाण्याचं मिश्रण मुंग्यांवर शिंपडल्यास मुंग्या मरून जातील

कॉफी पावडर...

मुंग्या घालवण्यासाठी कॉफी पावडरचा वापर देखील करू शकतो. कॉफी पावडर पाण्यात मिसळून कॉफीचं पाणी मुंग्यांवर फवारल्यास मुंग्या मरून जातात...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com