Snake Viral Video: तरुणीच्या मानेवर ब्लॅक किंग कोब्रा; पुढे जे घडलं ते भयंकरच

Viral Video: आजकाल ही एक नवी फॅशनच झाली आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. कारण अनेक व्यक्ती वाघ, सिंह यांच्याबरोबर राहत आहेत. मूत्र मांजर जशी पाळतात त्या पद्धतीने सापांना आणि वाघ सिंह यांना पाळत आहेत.
Snake Viral Video
Snake Viral VideoSaam TV
Published On

King Cobra Snake News:

किंग कोब्रा साप म्हणजे एका दंशात मृत्यू. असं असलं तरी अनेक सर्पमित्र सापाचे योग्य प्रशिक्षण घेतात आणि साप पकडतात. आता साप पकडणं सोप्प आहे. मात्र सापाला आपल्या अंगाखांद्यावर खेळवणं फार कठीण आहे. अशात सोशल मीडियावर एक खतरनाक व्हिडिओ समोर आलाय.

Snake Viral Video
Leopard CCTV Footage : बिबट्याने पोलीस स्टेशनमध्ये घुसून कर्मचाऱ्यांसमोरच केली कुत्र्याची शिकार, थरारक VIDEO व्हायरल

सध्या अनेक व्यक्ती साप, अजगर, किंग कोब्रा, वाघ, सिंह असे विषारी आणि हिंस्त्र प्राणी पळताना दिसतायत. आजकाल ही एक नवी फॅशनच झाली आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. कारण अनेक व्यक्ती वाघ, सिंह यांच्याबरोबर राहत आहेत. कुत्रा, मांजर जशी पाळतात त्या पद्धतीने सापांना आणि वाघ सिंह यांना पाळत आहेत.

सध्या सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुणी आपल्या घरात आरशासमोर उभी आहे. एखाद्या लहान बाळाला उचलून घावे तसे तिने ब्लॅक किंग कोब्राला उचलून घेतले आहे. सुरुवातीला हा साप तिच्या मानेवर आणि खांद्यावर फिरताना दिसतो. त्यानंतर साप अगदीच तिच्या चेहऱ्याजवळ जातो. साप आता तरुणीला चावेल की काय अशी भीती व्हिडिओ पाहताना वाटत आहे.

मात्र किंगकोब्रा साप या तरुणीला कोणतीही हानी पोहचवत नाही. तरुणी एका आरशासमोर उभी राहून या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ देखील रेकॉर्ड करत आहे. @lika_pxl या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. सध्या व्हिडिओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय.

या आधी देखील साप, किंग कोब्रा याच्याबरोबरचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. काही दिवसांपूर्वी एक तरुण फना काढून उभा असलेल्या सापाला किस करत होता. यावेळी देखील सापाने त्याला दंश केला नाही. चकित करणाऱ्या या व्हिडिओला देखील सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी पसंती दाखवली होती.

Snake Viral Video
Odisha Accident Video: एक चूक अन् ७ जणांनी गमावला जीव! भरधाव स्कॉर्पिओच्या अपघाताची भयंकर दृष्य; VIDEO

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com