Weight Loss SAAM TV
लाईफस्टाईल

Weight Loss : जास्त नाही तर कमी खाल्ल्याने वाढते वजन, वाचा वेट लॉस करण्याचे सिक्रेट

Health Care Tips : आजकाल प्रत्येकजण वाढत्या वजनामुळे त्रस्त असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक डाएट करूनही जर तुमचे वजन कमी होत नसेल तर, रोजच्या जीवनात हे ४ बदल करा. तुम्हाला काही दिवसात फरक दिसेल.

Shreya Maskar

बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक लोकांच्या आहारावर, व्यायामावर परिणाम होताना दिसून येतो. यामुळे आरोग्याच्या अनेक समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागते. आजकाल सर्वात महत्त्वाची समस्या म्हणजे वाढते वजन आहे. धावपळीच्या जीवनात फक्त या ४ गोष्टींवर तुम्ही विशेष लक्ष दिल्यास वजन कमी काही दिवसात कमी होईल.

व्हिटॅमिन डी

वजन वाढण्याचे मुख्य कारण शरीरात व्हिटॅमिन डी ची कतरता आहे. व्हिटॅमिन डी मोठ्या प्रमाणात कोवळ्या उन्हातून मिळते. पावसात कोवळे ऊन मिळणे थोडे कठीण असते. त्यामुळे वजन लवकर वाढते. पण आपल्याला मिळेल तसे कोवळं ऊन घेणे गरजेचे आहे. वजन कमी करण्यासाठी शरीराची चरबी कमी करणे खूप महत्त्वाचे असते. आहारातील प्रोटीन्स, फॅट्स वजन कमी करण्यास मदत करतात.

रात्री उशीरापर्यंत काम

आजकालच्या धावपळीच्या जगात बरेच लोक रात्री उशीरापर्यंत काम करतात. यामुळे त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते. उशीरापर्यंत काम करत बसल्यास वजन झपाट्याने वाढते. जास्त बसल्यामुळे कॅलरी बर्न न होता फॅट्स वाढतात. म्हणून रात्री लवकर झोपावे. तसेच सकाळी उठल्यावर किमान २० - २५ मिनिटे तरी व्यायाम करावा. चांगल्या आरोग्यासाठी रोज ८ तास झोप घेणे गरजेचे आहे.

मोबाईलचा वापर

आजकाल मोठ्या प्रमाणात मोबाईलचा अतिवापर करण्यात येत आहे. त्यामुळे आपण बराच वेळ एकाच ठिकाणी बसून राहतो. परिणामी वजन वाढते. तसेच मोबाईलच्या नादात अनेक जण खाण्यापिण्याकडे सुद्धा दुर्लक्ष करतात. त्यामुळे पोषक घटकांचा अभाव वाढतो.

कमी खाणे

वजन कमी करण्यासाठी अनेक लोक कमी खाण्याचा मार्ग निवडतात. जो की, चांगल्या आरोग्याच्या दृष्टीने चुकीचा आहे. वजन कमी करायचे असल्यास कमी खाण्यापेक्षा योग्य खाण्यावर भर देणे महत्त्वाचे आहे. वजन कमी होण्यासाठी जर तुम्ही जेवण सोडत असाल तर यामुळे तुम्हाला भरपूर अशक्तपणा येऊ शकतो. जेवणात जास्त फॅट्स असलेले पदार्थ खाणे टाळा.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: भुसा पाडायला आलोय, दादा भुसेंवर टीकास्त्र; शिंदे सेनेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली !

Sanju Samson Six: खूप जोरात लागला..संजूच्या षटकारामुळे महिला फॅनला रडू कोसळलं - VIDEO

IND vs SA: संजू सॅमसनने खेचला 1500 वा षटकार! टीम इंडियाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

Assembly Election: बटेंगे तो कटेंगेला भाजपातूनच विरोध; पंकजा मुंडेंनंतर अशोक चव्हाणांचाही विरोध

IND vs AUS: बुमराह बॅटिंगला आला अन् रिषभ गोलंदाजीला; BCCI ने शेअर केला दोघांच्या जुगलबंदीचा VIDEO

SCROLL FOR NEXT