Vinesh Phogat Weight : विनेश फोगाटचं १०० ग्रॅम वजन अचानक कसं वाढलं? प्रयत्न केले पण...

How did Vinesh Phogat gain weight : एएनआयच्या वृत्तानुसार, अंतिम फेरीत पोहोचलेल्या विनेश फोगाटचे मंगळवारी रात्री अचानक जवळपास 2 किलो वजन वाढले. त्यामुळे ती रात्रभर झोपली नाही.
How did Vinesh Phogat gain weight
How did Vinesh Phogat gain weightSaam TV
Published On

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये बुधवारी भारताला सर्वात मोठा धक्का बसला. अचानक १०० ग्रॅम वजन जास्त भरल्याने कुस्तीपटू विनेश फोगाटला ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवण्यात आलं. यामुळे भारताचं सुवर्णपदाचं स्वप्न भंगल असून कोट्यवधी भारतीयांची मने दुखावली आहे. दरम्यान, मंगळवारी सेमीफायनल सामना खेळणाऱ्या विनेश फोगाटचं अचानक वजन कसं वाढलं? याबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत.

How did Vinesh Phogat gain weight
Bajrang Punia Post : तिला देशात लाथांनी चिरडलं, फरफटत नेलं; विनेश फोगाटच्या विजयावर बजरंग पुनियाची पोस्ट

विनेश फोगाटला रौप्यपदकही मिळणार नाही

वेदनादायी बाब म्हणजे, सुवर्णपदाकाचे स्वप्न बघणाऱ्या विनेश फोगाटला आता रौप्य पदकही मिळणार नाही. कारण, पॅरिस ऑलिम्पिकच्या नियमांनुसार फक्त 50 किलो गटातीलच कुस्तीपटू सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदकाचे दावेदार आहेत. त्यामुळे विनेश फोगाटला आता पॅरिसमधून खाली हातच परतावे लागणार आहे.

वजन कमी करण्यासाठी विनेशने केले प्रयत्न

भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने एका निवेदनात म्हटले आहे की, “विनेश फोगाटच्या 50 किलो महिला कुस्ती गटातून अपात्र ठरल्याची बातमी शेअर करताना आम्हाला अतिशय दु:ख होत आहे. भारतीय संघ विनेशच वजन कमी करण्यासाठी प्रयत्न केले. पण शेवटी तिचे वजन 100 ग्रॅम जास्तच भरले. त्यामुळे तिला फायनलमधून अपात्र ठरवण्यात आले.

विनेश फोगाटचे अचानक वजन कसे वाढले?

एएनआयच्या वृत्तानुसार, अंतिम फेरीत पोहोचलेल्या विनेश फोगाटचे मंगळवारी रात्री अचानक जवळपास 2 किलो वजन वाढले. त्यामुळे ती रात्रभर झोपली नाही. वजन कमी करण्यासाठी तिने सर्वोतोपरी प्रयत्न केले. जॉगिंगपासून ते स्किपिंग आणि सायकलिंगपर्यंत कसरत करून विनेशने वजन कमी करण्याचा प्रयत्न केला.

वजन कमी करण्यासाठी विनेशला मिळाली होती संधी

वृत्तानुसार, विनेश फोगाटचे वजन कमी करण्यासाठी भारतीय शिष्टमंडळाने ऑलिम्पिक समितीला थोडा वेळ मागितला होता. पण त्यांनी पुरेसा वेळ दिला नसल्याचा आरोप केला जात आहे. शेवटच्या क्षणी विनेश फोगाटचे वजन मोजण्यात आले. जे 50 किलोपेक्षा 100 ग्रॅम जास्त भरले. त्यानंतर तिला अपात्र करण्यात आले.

पॅरिस ऑलिम्पिकमधील विनेश फोगाटचा प्रवास

विनेश फोगाट ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत पोहोचणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली होती. तिने सुवर्णपदकाची प्रबळ दावेदार आणि जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकाची कुस्तीपटू जपानची युई सुसाकी हिला आस्मान दाखवलं. यानंतर तिने युक्रेन आणि क्युबाच्या कुस्तीपटूंवर शानदार विजय नोंदवले. अंतिम फेरीत तिचा सामना सारा हिल्डब्रँडशी होणार होता. फायनल सामन्यात विजयाची विनेश दावेदार मानली जात होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com