Right Way of Walking : चुकीच्या पद्धतीने चालू नका; वजन कमी होण्याऐवजी आरोग्यावर होईल गंभीर परिणाम

Health Tips : वजन कमी करण्यासाठी किंवा निरोगी आणि सुदृढ राहण्यासाठी जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने चाललात तर तुमच्या आरोग्यावर याचा दुष्परिणाम होऊ शकतो.
Health Tips
Right Way of Walking Saam TV
Published On

वजन कमी करण्यासाठी अनेक व्यक्ती व्यायाम करण्याऐवजी भरपूर चालणे पसंत करतात. चालणे ही एक अगदी सोप्पी आणि सिंपल स्टेप आहे. त्यामुळे तुम्ही देखील वजन कमी करण्यासाठी चालत असाल तर त्याची योग्य पद्धत जाणून घेणे सुद्धा महत्वाचे आहे. कारण वजन कमी करण्यासाठी किंवा निरोगी आणि सुदृढ राहण्यासाठी जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने चाललात तर तुमच्या आरोग्यावर याचा दुष्परिणाम होऊ शकतो.

Health Tips
Morning Walk: सकाळी 'या' वेळेत मॉर्निंग वॉक करा; वजन पटापट होईल कमी

चालताना ही काळजी घ्या

वजन कमी करण्यासाठी चालत असाल तर एक आठवड्यातून कमीत कमी ५ वेळा आणि दिवसातून ३० मिनिटे चाललं पाहिजे. याचा आपल्या आरोग्यासाठी फायदा होतो.

योग्या आउटफीट परिधान करा

वॉक करताना कायम योग्य बुटं आणि योग्य कपडे परिधान करणे सुद्धा आवश्यक असते. त्यामुळे सहज वेगात चालता येते. त्यामुळे चालण्यासाठी कंम्पर्टेबल असलेले आउटफीट वेअर करा. जर तुम्ही चालण्यास योग्य ठरतील असे श्यूज परिधान नाही केले तर तुमचे पायांमध्ये दुखू लागले. त्यामुळे चालण्यास सुद्धा त्रास होईल.

.योग्य ठिकाण निवडा

वॉक करताना योग्य ठिकाण निवडणे सुद्धा महत्वाचे आहे. त्यामुळे अशा जागा निवडा जिथे कोणताही प्राणी सहसा कुत्रे नसतील. शिवाय ती जागा पूर्णता मोकळी असेल. असे ठिकाण असल्यास आपल्याला मोकळ्या हवेत एन्जॉय करत वॉक करता येतं. चालणे हे काही रोजच्या जीवनातील काम नाही. चालणे हा एक प्रकारचा खेळ आहे असे समजून चालत राहा.

सरळ रेषेत धावा

धावताना कायम पाठ तहाट असली पाहिजे आणि आपण सरळ एका रेषेमध्ये धावलं पाहिजे. धावताना मान किंवा खांदे लोंबकळतील असे खाली वाकू नका. त्यामुळे आपल्याला जास्त थकवा जाणवू लागतो. धावताना कायम सरळ सरळ आणि एकाच रेषेत धावा. मध्ये कोणताही अडथळा येणार नाही याची काळजी घ्या. अशा पद्धातीने धावल्याने तुम्हाला अगदी ताजे आणि फ्रेश वाटेल.

पावर वॉकींग

चालताना पावर वॉकींग पद्धतीने चालावे. त्याने आपल्याला जास्त थकवा येत नाही. पावर वॉकींगसाठी आधी हळूहळू चालत राहा. त्यानंतर १० ते १५ सेकंद तुम्ही फास्ट आणि पटपट चालण्यास सुरुवात करा. त्यानंतर पुन्हा स्लो चाला. असे चालल्याने शरीरातील कॅलरी आणखी जास्त बर्न होते.

पायऱ्यांवर चालणे

पायऱ्या किंला डोंगरासारखा भाग असलेल्या ठिकाणी चालणे फार कठीण असते. मात्र तुम्हाला लवकर वजन कमी करायचे असेल तर अशाच पद्धतीने चालत राहिलं पाहिजे. यामध्ये जस्तीत जास्त कॅलरी बर्न होतात.

Health Tips
Morning Walk: सकाळी 'या' वेळेत मॉर्निंग वॉक करा; वजन पटापट होईल कमी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com