Shevga Leaves Benefits  Saam Tv
लाईफस्टाईल

Shevga Leaves Benefits : शेवग्याच्या शेंगाच नव्हे पानंही आहेत बहुगुणी; फायदे वाचाल तर अवाक् व्हाल

Drumstick Leaves : दररोज प्रत्येकांच्या आहारात विविध भाज्यांचा समावेश असतो. जर तुम्ही शेवग्याची भाजी खात असाल तर तुम्हाला शेवग्याच्या भाजीच्या पानाचे महत्त्व देखील माहिती पाहिजे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भारत असा एकमेव देश आहे की, जो देश विविध फळं आणि विविध प्रकारच्या भाज्यांच्या बाबतीत अत्यंत समृद्ध आहे. आपल्याकडे आढळणाऱ्या अनेक भाज्यांचे विविध असे औषधी गुणधर्म आहेत शिवाय या बद्दलचे महत्त्व संपूर्ण जगालाही कळाले आहे. त्यात आज आपण अशाच एक भाजीबद्दल पाहूयात. ज्या भाजीचे आपल्या शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. ती भाजी म्हणजे दररोजच्या आहारात असलेली शेवगा. मात्र शेवग्याच्या भाजीचे शरीराला निराळे फायदे आहेत त्याच प्रमाणे शेवग्याच्या पानाचेही शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.

आपल्यापैंकी अनेकांच्या घरी आठवड्यातून एकदा शेवग्याची भाजी(bhaji) बनत असले मात्र त्यांच्यापैंकी अनेकांना शेवग्याच्या पानांच्या भाजीचे आरोग्यदायी महत्त्व माहिती नसेल. चला तर आज जाणून घेऊयात शेवग्याच्या पानांचे आरोग्यदायी महत्त्व.

फायदे -

१ तुम्हाला माहिती आहे का, शेवग्यांच्या पानात व्हिटॅमिन ए तसेच सी आणि ई आणि कॅल्शियम , पोटॅशियम तसेच प्रोटीन आणि फायबरचे प्रमाणा मोठ्या प्रमाणात आढळते. जर शेवग्याच्या पानाचे दररोज आहारात समावेश केल्यास शरीराला अनेक पोषक तत्व मिळतात.

२ शेवग्याच्या पानात मोठ्या प्रमाणात एटी ऑक्साइचे प्रमाण आढळते. याच्या मदतीने व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती (immunity)वाढण्यास मदत होते शिवाय अन्य आजारांपासून लढण्यास मदत मिळते.

३ जर प्रत्येकाने सकाळी रोज उठल्यानंतर उपाशी पोटी शेवग्याची पाने खाल्ल्यास रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. शिवाय हृदयाशी संबंधित समस्या दूर राहण्यासही मदत होते.

४ जर तुम्हाला वारंवार पचनाची समस्या जाणवत असल्यास तुम्ही शेवग्याची पाने चावून खावू शकता. शेवग्याच्या पानात फायबरचे प्रमाण असल्याने पचनयंत्रणा चांगली राहण्यास मदत होते. तसेच वध्दकोष्ठतेची समस्या दूर होण्यास मदत होते.

५ केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी शेवग्याची पाने फायदेशीर ठरतात. शिवाय त्वचेच्या समस्यांवरही शेवग्याची पाने फायदेशीर ठरतात.

मधुमेह(diabetes) असलेल्या रुग्णांसाठी शेवग्याच्या भाजी सह शेवग्याची पाने खाण्याचा सल्ला ही दिला जातो. त्यामुळे तुम्ही शेवग्याच्या पानांपासून भाजी तयार करु शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : कोल्हापुरात औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार जखमी, घटना कॅमेऱ्यात कैद

Jharkhand Results 2024 : झारखंडमध्ये इंडिया आघाडीची सरशी; हेमंत सोरेन आणि कल्पना यांची जोडी ठरली सुपरहिट

Maharashtra Election Result: देवेंद्र फडणवीसांनी चक्रव्यूह भेदलं! विधानसभा निवडणुकीत विरोधक चारही मुंड्या चीत

Maharashtra Election Result: बारामतीचा दादा 'अजितदादा'! लोकसभेला काका, विधानसभेला पुतण्या

Mahrashtra Election Result : हूश्श! अखेर रोहित पवार विजयी झाले

SCROLL FOR NEXT