Relationship Tips SAAM TV
लाईफस्टाईल

Relationship Tips : झूठ बोले कौवा काटे, तुमचा जोडीदार तुमच्याशी खोटे बोलतो? मिनिटांत घ्या शोध

Relationship Tips For Couples : प्रेमाच्या नात्यात विश्वास आणि आदर असणे खूप महत्वाचे असते. अशात जर तुमचा जोडीदार तुमच्याशी खोटे बोलत असेल तर नात्यात दुरावा येऊ शकतो. अशावेळी परिस्थिती हळुवार सांभाळणे गरजेचे असते.

Shreya Maskar

गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड असो की नवरा -बायको भांडणे होत राहतात. पण नात्यात खोटेपणा जागा नसावी. नात्यात खोटे बोल गेल तर नात कमकुवत होऊन तुटू शकते. त्यामुळे आपल्या जोडीदारासोबत कधीच खोटे बोलू नये. जर तुम्हाला माहिती पडले असेल की, आपला जोडीदार आपल्याशी खोटे बोलत आहे. तर योग्य वेळ साधून त्याला याची जाणीव करून द्या. खोटे बोलण्यामागील कारण समजून घेऊन त्यावर उपाय शोधा. तुम्ही अबोला धरल्यास जोडीदाराचे खोटे बोलणे वाढत जाईल.

जोडीदाराच्या खोटे बोलण्याचा दोष कधीही स्वतःला लावून घेऊ नये. जोडीदाराच्या खोटे बोलण्यामुळे तुमच्या नात्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. नातं कमकुवत होण्याची ही पहिली पायरी आहे. त्यामुळे आपले नाते जपा.

जोडीदार खोटं बोलत आहे कसे ओळखाल?

आवाजातील चढउतार

जर तुमचा जोडीदार तुमच्याशी खोटं बोलत असेल तर त्याच्या आवाजावरून तुम्हाला लगेच कळू शकते. करण खोटं बोलणारी व्यक्ती नेहमी मोठ्या आवाजात बोलते. तसेच आपला मुद्दा खरा ठरवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करते.

देहबोली

खोटे बोलणाऱ्या जोडीदाराची देहबोली संशयास्पद वाटते. तसेच त्यांना घाम येतो, अंगाचा थरकाप होतो, ती लोक नखे चावू लागतात. त्यांचा अस्वस्थता खूप काही बोलून जातो.

नजर चोरणे

जोडीदार आपल्याशी बोलताना नजर चोरत असेल तर नक्कीच तो आपल्यापासून काही तरी लपवत आहे.

जास्त प्रेम दाखवणे

आपल खोटं पकडू नये म्हणून आजकाल जोडीदार अधिक चांगले किंवा अधिक प्रेम दाखवतात. जे चुकीचे आहे. अशा परिस्थितीत सावधगिरी बाळगण्याची गरज असते. जोडीदार आपल्या चूक लपवण्यासाठी असे करत असतो.

एकाच गोष्टी बाबत परत विचारणे

आपल्याला जोडीदाराने एखादी गोष्ट सांगितली आणि आपल्याला ती खोटी असल्याचा संशय असल्यास तीच गोष्ट कालांतराने पुन्हा विचारावी. जर ती गोष्ट खरी असेल तर तुमचा जोडीदार जशीच्या तशी सांगेल. मात्र त्यामध्ये एखादी गोष्ट खोटी असेल. तर लगेच त्यात बदल दिसेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: वांद्रे पूर्वमधून वरुण सरदेसाई आघाडीवर

Chopda Vidhan Sabha : निवडणुकीचे काम टाळणाऱ्या २१ कर्मचाऱ्यांवर गुन्हा; विनापरवानगी राहिले गैरहजर

Assembly Election Results 2024 : राज्यात कोणाचं सरकार येणार? सुरुवातीच्या कलात महायुती आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: बहुमताचा आकडा गाठला, सुरुवातीचा कल महायुतीकडे, भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेत!

Cleaning Tips: ब्लँकेट रजाईला दुर्गंधी येते का? हे उपाय एकदा करून बघा

SCROLL FOR NEXT