Relationship Tips: नात्यामधील बॉन्डिंग चांगली आहे का नाही? 'या' पाच गोष्टीतून घ्या समजून

Relationship Tips: जर आतापर्यंत तुम्हाला तुमचे वैवाहिक जीवन चांगले चालले आहे की नाही किंवा तुमच्या दोघांचे बॉन्डिंग कसे आहे हे समजत नसेल तर तुम्ही या गोष्टींनी जाणून घेऊ शकतात.
Relationship tips: नात्यामधील बॉन्डिंग चांगली आहे का नाही? 'या' पाच गोष्टीतून घ्या समजून
Relationship tipssaam tv
Published On

कोणतेही नाते तयार व्हायला एक वर्ष लागले तर ते टिकवायला एक अख्य आयुष्य लागतं. अनेकदा असे आढळून आले आहे की, जोडपी नवीन नातेसंबंधात खूप आनंदी असतात. ते सर्व अपेक्षांवर अवलंबून असतात जोडीदार त्यांच्यासाठी सर्व गोष्टी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु जसजसा वेळ जातो तसतसे एकमेकांच्या चुका दिसू लागतात. त्यामुळे नात्यात भांडणं होऊ लागतात.

अशी स्थिती निर्माण झाल्यानंतर एकमेकांना आनंदी ठेवणे सोपं काम नाही. या वादांमुळे नातं तुटण्याची भीती मनात घर करू लागते आणि चिंता वाढू लागते. पण मनात शंका घेण्याऐवजी किंवा भीती निर्माण करण्याऐवजी तुमच्यातील बॉन्डिंगवर लक्ष केंद्रित केले तर नातं अधिक घट्ट होईल. तुमच्यातील बॉन्डिंग कसं आहे, हे जाणून घेणं खूप आवश्यक असतं, हे जाणून कसं घेता येईल हे आपण खालील गोष्टींतून समजून घेऊ.

जोडीदारासोबतचे तुमचे नातं कसं आहे, हे कसं ओळखावं

जर तुम्ही तुमच्या जोडीदारासमोर न डगमगता तुमच्या भावना व्यक्त करू शकत असाल आणि कोणालाही वाईट वाटले नाही, तर तुमच्यातील बॉन्डिंग चांगले आहे. तुम्ही एकमेकांचा कमकुवतपणा ओळखून आहात. तरीही तुम्ही त्यावर टोमणा न मारता समजून घेत आहात. किंवा भांडणं करत नाहीत, तर तुमचं नातं घट्ट असल्याचं समजून घ्यावं.

तुम्ही जेव्हा एकमेकांच्या चुका तु्म्ही समजून घेत आहात. त्या चुकांवर एकमेकांना दोष न देता त्यावर उपाय शोधत असला तर तुमचं नातं चांगलं मजबूत झालंय हे समजून घ्यावं. बऱ्याचवेळा स्पर्श केल्यावरुनही तुमचं नातं मजबूत आहे की दिखावा आहे. हे समजून येतं. जेव्हा तुम्ही कोणताच संकोच न बाळगता एकमेकांना मिठी मारता किंवा किस करतात तर तुमचं नातं चांगलं असल्याचं म्हटलं जातं. डोळ्यात डोळे घालून तुम्ही जेव्हा एकमेकांशी संवाद साधत असतात तेव्हा तुमच्या नात्यात विश्वासहर्ता येते आणि नातं घट्ट होत असतं.

Relationship tips: नात्यामधील बॉन्डिंग चांगली आहे का नाही? 'या' पाच गोष्टीतून घ्या समजून
Relationship Tips : मेरे सैयां जी से आज मैंने ब्रेकअप कर लिया! तुमचाही नुकताच ब्रेकअप झालाय? 'या' टिप्स फॉलो करा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com