Relationship Tips : मेरे सैयां जी से आज मैंने ब्रेकअप कर लिया! तुमचाही नुकताच ब्रेकअप झालाय? 'या' टिप्स फॉलो करा

Relationship Breakup : नुकताच तुमचा तुमच्या जोडीदारासोबत ब्रेकअप झाला असेल आणि भावनिकदृष्ट्या ही गोष्ट स्वीकारणे तुम्हाला कठीण होत असेल. तर 'या' टिप्स फॉलो करा आणि वेळीच ब्रेकअपमधून बाहेर या.
Relationship Breakup
Relationship TipsSAAM TV
Published On

'नातं जोडणं हे सोप्प असतं पण नातं टिकवणं खूप कठीण. त्यामुळे प्रत्येक नातं जीवापाड जपायचं. आजकाल रिलेशनशिपमध्ये ब्रेकअप सामान्य गोष्ट आहे. पण ती गोष्ट मनाला खूप त्रास देऊन जाते. काही लोकांना नात तुटण्याची भावना सहन होत नाही. यामुळे त्याचे मानसिक आरोग्य बिघडते.

आपल्या जोडीदारासोबत ब्रेकअप ही गोष्ट भावनिकदृष्ट्या स्वीकारणे खूप कठीण असते. तर या प्रेमवेड्यांनी स्वतःला ब्रेकअपमधून कसे बाहेर काढायचे जाणून घेऊयात. 'या' टिप्स फॉलो करा आणि ब्रेकअपला पॉझिटिव्ह घ्या.

स्वतःवर प्रेम करा

आयुष्यात दुसऱ्यांवर प्रेम करण्याआधी स्वतःवर प्रेम करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे ब्रेकअप झाल्यानंतर स्वतःला दोष न देता परिस्थिती स्वीकारून आयुष्य जगा.

आपल्या भावना स्वीकारा

नात्याच्या शेवटाबरोबर येणाऱ्या भावना या खूप त्रासदायक असतात. पण त्या स्वीकारून आपल्याला आयुष्यात पुढे जाणे गरजेचे असते. त्यामुळे दु:ख, राग आणि निराशा अनुभवा. पण त्यांच्या अधीन जाऊ नका वेळीच स्वतःला सावरा.

तुमच्या एक्सशी संपर्क ठेवू नका

एकदा नातं तुटल की त्या माणसाशी बोलणे किंवा त्यांच्या संपर्कात राहणे कठीण जाते. कारण त्या व्यक्तीशी बोलून आपल्याला प्रेमाची आठवण होते. त्यामुळे ब्रेकअपमधून बाहेर येण्यासाठी सर्वात महत्वाचे की एक्सशी संपर्क तोडून टाका.

स्वत:ची काळजी घ्या

ब्रेकअपनंतर बरेच लोक मानसिक तणावाखाली येतात. त्यामुळे त्याचे खाण्यापिण्याच्या गोष्टींवरील वासना उडून जाते. त्यामुळे शारीरिक,मानसिक आणि भावनिक खच्चीकरण होते. जे तुमच्या आरोग्यासाठी चांगले नाही. ब्रेकअपमधून बाहेर पडण्यासाठी तुमच्या आवडीच्या गोष्टी करा. नवीन गोष्टी शिकत रहा.

सतत बोलत रहा

ब्रेकअप नंतर बऱ्याच लोकांना एकांतात राहायला आवडते. पण हे चुकीचे आहे . यामुळे तुम्ही अजून त्या भावनांमध्ये अडकत जाता. त्यापेक्षा आपल्या भावना आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. त्यामुळे तुमचे मन हलके होईल. तसेच तुम्हाला मित्रांशी बोलून प्रोत्साहन मिळेल.

Relationship Breakup
Parenting Tips : मुलाचं भवितव्य धोक्यात जाण्याआधीच पालकांनो सावध व्हा; लहानपणापासूनच शिकवा 'या' गोष्टी

भविष्याचा विचार करा

ब्रेकअपनंतर भूतकाळाचा विचार करण्यापेक्षा आपल्या वर्तमानाचा आणि भविष्याचा विचार करावा. आपला दृष्टिकोन नेहमी सकारात्मक आणि आशावादी असावा. आपल्या करिअरवर आणि व्यक्तिमत्व विकासावर आपण लक्ष केंद्रित करावे.

ब्रेकअपचे कारण

ब्रेकअपचे कारण काही असो त्यातून शिकून आपण पुढचं आयुष्य जगायच असतं. कोणत्याच एका गोष्टीसाठी स्वतःला दोष देत राहायच नाही.

व्यसनाच्या अधीन जाऊ नये

आजकाल सरास मुलं ब्रेकअप झाल्यावर दारूच्या अधीन जातात. त्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात येते. त्यांचा जगण्याचा दृष्टीकोन पूर्ण बदलून जातो.

सोशल मीडियाचा वापर

ब्रेकअपनंतर आपल्या एक्सच्या सोशल मीडियाचा अकाउंटवर वारंवार जाऊन त्यांच्या आयुष्याचे अपडेट घेत राहू नका. यामुळे तुम्ही दूर राहूनही तिच्यात गुंतून राहाल.

Relationship Breakup
Relationship Tips : सासुबाई तुमच्याविरुद्ध पतीला भडकवत आहेत? मग 'या' टिप्स नक्की वाचा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com