Health effects of using Teflon non-stick pans Freepik / istock
लाईफस्टाईल

Kitchen Tips and Health : तुम्ही पण नॉनस्टिक भांड्यांमध्ये जेवण बनवताय? होऊ शकतो फुफ्फुसांचा आजार, वाचा सविस्तर

Health Effects Of Using Non-Stick Pans : नॉनस्टिक भांड्यांमध्ये रोज स्वयंपाक करता? यामुळे फुफ्फुसांचा आजार होऊ शकतो. भांड्यांमुळे होणारे धोके ओळखा आणि सुरक्षित पर्याय निवडा.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आजकाल प्रत्येक स्वयंपाक घरात जेवण बनवण्यासाठी नॉनस्टिक भांडी वापरली जातात. यामध्ये जेवण बनवणे सोपे जाते, शिवाय पदार्थ भांड्याच्या तळाला चिकटण्याचीही भिती नसते. पण तुम्हाला माहित आहे का? याच नॉनस्टिक भांड्यांमध्ये बनवलेले अन्न कर्करोग, थायरॉईड, फुफ्फुसांचे आजार अशा अनेक गंभीर समस्यांचे कारण बनू शकते. हे कसे आणि यापासून वाचण्यासाठी कोणती काळजी घ्यावी याबद्दल पुढे जाणून घेऊया.

नॉनस्टिक भांडी सामान्यतः अॅल्युमिनियम, स्टेनलेस स्टील अशा धातूवर नॉनस्टिक कोटिंग लावून बनवली जातात. या कोटिंगमध्ये पॉलीटेट्राफ्लुरोइथिलीन (PTFE) म्हणजेच टेफ्लॉन हे रसायन वापरले जाते. याशिवाय काही नॉनस्टिक भांड्यांमध्ये सिलिकॉन डायऑक्साइड वापरले जाते. या रसायनांमुळेच नॉनस्टिक भांड्यांमध्ये शिजवलेले अन्न तळाला चिकटण्यापासून रोखले जाते. हे कोटिंग भांड्याच्या आतल्या भागावर असल्यामुळे ते अन्नाच्या थेट संपर्कात येते.

यामुळे रसायन उच्च तापमानात अन्नामध्ये मिसळू शकते. जे तुमच्या आरोग्यासाठी अतिशय हानिकारक ठरते. नॉनस्टिक भांडी गरम केल्यानंतर त्यातून निघणाऱ्या वाफेत विषारी घटक असतात. जे श्वसनामार्गात गेल्यास फुफ्फुसांना नुकसान पोहोचवू शकतात. तसेच पॉलीटेट्राफ्लुरोइथिलीन (PTFE) रासायन शरिरात गेल्यास थायरॉईड, कर्करोग आणि मुत्रपिंडाच्या समस्या तर उद्भवतातच शिवाय गर्भधारणेवरही नकारात्मक परिणाम होतो.

यापासून वाचण्यासाठी नॉनस्टिक भांड्यांमध्ये जेवण बनवताना योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.

१. नॉनस्टिक भांडी २६० अंश सेल्सियस तापमानापेक्षा जास्त गरम करणे टाळा.

२. कोटिंग खराब झालेली व ओरखडलेली नॉनस्टिक भांडी वापरणे टाळा.

३. नॉनस्टिक भांड्यांमध्ये स्टीलचे चमचे वापरल्यास कोटिंग खराब होऊ शकते. लाकडी किंवा सिलिकॉनचे चमचे वापरा.

४. PFOA मुक्त असलेली नॉनस्टिक भांडी वापरा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gautam Gaikwad: सिंहगडावरून पडला,पाच दिवस जंगलातच; गौतम गायकवाडच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट!

Passenger Boat Accident: समुद्रात 10 प्रवासी घेऊन जाणाऱ्या बोटीला नेव्हीच्या स्पीड बोटीची धडक

Russia-Ukraine War: भारतच रशिया-युक्रेनमध्ये शांतता घडवणार? पुतीन-झेलेन्स्की भारतात येणार

Maratha Reservation: 'चलो मुंबई'! मनोज जरांगेंचा रोष नेमका कोणावर? आंदोलनाचा रोड मॅप नेमका कसा?

Sleep and Earn: झोपा आणि झोपण्याचे पैसे कमवा, 9 तास झोपा, 10 लाख मिळवा

SCROLL FOR NEXT