
झुरळ म्हटलं की, चेहऱ्यावर आपोआपच किळसवाणा भाव येतो. झुरळं शक्यतो माणसांपासून लांब राहतात. पण त्यांच्या शरीरावर अनेक जीवाणू असतात जे आपल्या आरोग्यास हानिकारक ठरतात. झुरळ अंधाऱ्या ठिकाणी, किचनमधील कोपऱ्यात, माळ्यावर, अडगळीत असतात. रात्रीच्या वेळेस ते बाहेर पडतात व अन्नावर आणि भांड्यांवर फिरत असतात. यावेळी त्यांच्या शरीरावरील किटाणू अन्नावर किंवा भांड्यांवर तसेच राहतात. यामुळे योग्य काळजी न घेतल्यास आरोग्यविषक धोकादायक समस्या उद्भवू शकतात.
झुरळांच्या शरीरावर साल्मोनेला आणि ई. कोलाय यासारखे हानिकारक जीवाणू असतात. साल्मोनेला जीवाणूने संक्रमित असलेल्या अन्नाचे सेवन केल्यास ताप, अतिसार, पोटदुखी, उलट्या आणि डिहायड्रेशन होण्याची शक्यता असते. हा जीवाणू रक्तात मिसळल्यास सेप्सिस सारख्या गंभीर स्थितीत बदलू शकतो. ही एक जीवघेणी स्थिती आहे ज्यात रोगप्रतिकारशक्ती संसर्गाशी लढताना उलट प्रतिक्रिया देते आणि शरीरातील ऊतींना तसेच अवयवांना नुकसान पोहोचवते. ज्यामळे सेप्टिक शॉक, अवयव निकामी होणे किंवा काहीवेळा मृत्यूही होऊ शकतो.
ई. कोलाय जीवाणू देखील अन्न किंवा पाण्याद्वारे पोटात जाऊन आतड्यांना संक्रमित करतात. यामुळे रक्तासहीत अतिसार होणे याचसोबत हेमोलिटिक यूरेमिक सिंड्रोम (HUS) होऊ शकतो. जो थेट किडनीवर परिणाम करतो. हा एक गंभीर आजार आहे. जो प्रामुख्याने लहान मुलांना होतो. यामुळे शरीरातील लाल रक्तपेशींचा नाश होतो, किडनी योग्यरीत्या काम करत नाही आणि रक्ताच्या गाठी तयार होतात. पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना हा आजार होण्याची संभाव्यता अधिक असते.
शिवाय झुरळांची विष्ठा, लाळ आणि मृत शरीराचे भाग ऍलर्जी तसेच अस्थमासारख्या समस्यांना कारणीभूत ठरू शकतात. यापासून वाचण्यासाठी घरामध्ये आणि आसपासच्या परिसरात नियमित स्वच्छता ठेवा. अन्न पदार्थ उघड्यावर ठेवू नका. भांडी वापरण्यााधी पुसून किंवा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. झुरळांना दूर ठेवण्यासाठी महिन्यातून एकदा पेस्ट कंट्रोल करून घ्या. तसेच आरोग्यविषयक गंभीर समस्या जाणवल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.