Home Tips : पावसाळ्यात किचनमध्ये झुरळांचा वावर वाढलाय? 'या' भन्नाट उपायांनी होईल नायनाट

Tips For Cockroaches Control : पावसाळ्यात दमट वातावरणामुळे घरात डास, पाली, झुरळ यांची पैदास मोठ्या प्रमाणात होते. अशावेळी झुरळांना पळवून लावण्यासाठी सोपे घरगुती उपाय मदत करतील.
Tips For Cockroaches Control
Home TipsSAAM TV
Published On

पाऊस आनंदासोबत अनेक समस्या आणतो. पावसात स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. कारण दमट वातावरणामुळे घरात डास,पाली , झुरळ, छोटे कीटक यांचा पैदास होते. पावसात कीटक नेहमी आडोसा शोधात असतात.

पावसात अनेकांच्या घरात झुरळांची समस्या वाढते. झुरळांच्या वाढत्या वावरामुळे आपल्याही आरोग्यास धोका निमार्ण होतो. कारण पावसात विशेषतः किचनमध्ये झुरळांची संख्या वाढते. घरात किचनच्या ओट्यावर अन्नाचे कण पडले असतात. यामुळे झुरळांचा वावर वाढतो.

घरगुती उपाय

कडुलिंब

पावसाळ्यात विशेषतः किचनमध्ये झुरळांची असंख्य पैदास होते. पावसाळ्यात त्रास देणारे झुरळ कमी करण्यासाठी कडुलिंबाचा वापर तुम्ही करू शकता. घरात ज्या ठिकाणी झुरळांची संख्या जास्त आहे. तिकडे कडुलिंबाच्या तेलाचे फवारणी करा. तसेच जागोजागी कडुलिंबाची पाने ठेवा.

व्हिनेगर

गरम पाण्यामध्ये दोन चमचे व्हिनेगर घालून झुरळ फिरत असलेल्या भागांवर याची फवारणी करा. काही मिनिटांत झुरळ गायब होतील.

काकडी

झुरळांना काकडीचा सुगंध अजिबात आवडत नाही. त्यामुळे तुम्ही काकडीचे काप करून झुरळ असलेल्या भागांवर ठेवावे. तसेच काकडीचा रस करून झुरळांचा वावर असलेल्या भागांवर स्प्रे बॉटलच्या मदतीने फवारणी करावी.

खडे मसाले

खडे मसाल्यांमध्ये सर्वात जास्त लवंग आणि दालचिनी याला सुगंध येतो. त्यामुळे पावसाळ्यात संपूर्ण घरामध्ये किंवा विशेषता किचन च्या कानाकोपऱ्यात एका कपड्यामध्ये लवंग आणि दालचिनी बांधून ती पोटली ठेवावी. यामुळे घरातील झुरळांची संख्या कमी होईल.

Tips For Cockroaches Control
Rainy Season Clothes Bad-Smell : पावसामुळे कपड्यांचा येणारा आंबट वास होईल छूमंतर; फॉलो करा 'या' टिप्स

बोरीक पावडर

पिठामध्ये बोरीक पावडर मिसळून त्याच्या गोळ्या तयार करा. या गोळ्या घरात पसरवून ठेवा. यामुळे झुरळांची संख्या कमी होईल.

लिंबू

लिंबू झुरळांसाठी रामबाण उपाय आहे. एका स्प्रे बॉटलमध्ये बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस मिक्स करून त्यात थोडे पाणी टाकावे. हे पाणी घरामध्ये सर्वत्र शिंपडावे. यामुळे नवीन झुरळांची पैदास होणार नाही.

डिस्क्लेमर : ही फक्त सामान्य माहिती आहे.

Tips For Cockroaches Control
Tips For Wearing Contact Lenses : लेन्स लावताय? सावधान! वाढतोय डोळे गमवण्याचा धोका

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com