Tips For Wearing Contact Lenses : लेन्स लावताय? सावधान! वाढतोय डोळे गमवण्याचा धोका

Healthy Eyes : आजकाल फॅशनच्या नावाखाली कॉन्टॅक्ट लेन्सचा ट्रेंड अनेकांना महागात पडत आहे. कॉन्टॅक्ट लेन्सचा चुकीचा वापर डोळ्यांचे आरोग्य धोक्यात आणतो. त्यामुळे कॉन्टॅक्ट लेन्स लावण्याआधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा.
Healthy Eyes
Tips For Wearing Contact LensesSAAM TV
Published On

टेक्नॉलॉजीच्या काळात स्क्रीनच्या अतिवापरामुळे अनेकांना चष्मा लागतो. मात्र या फॅशनेबल जगात चष्मा लावून लूक खराब येत असल्यामुळे बऱ्याच तरुणांचा कल चष्मा ऐवजी कॉन्टॅक्ट लेन्सकडे झपाट्याने वाढलेला पाहायला मिळत आहे. नियमित कॉन्टॅक्ट लेन्स लावणे डोळ्यांच्या आरोग्यांसाठी घातक ठरते. यामुळे डोळ्यांच्या दृष्टीवर वाईट परिणाम होऊन डोळ्यांच्या समस्या उद्भवतात.

कॉन्टॅक्ट लेन्स लावताना 'ही' घ्या काळजी

  • कॉन्टॅक्ट लेन्स चुकूनही रात्री घालून झोपू नये. त्यामुळे डोळ्याला ऑक्सिजनची कमतरता भासते. परिणामी डोळ्यांना संसर्ग होण्याचा धोका वाढतो.

  • कॉन्टॅक्ट लेन्स दीर्घकाळ घातल्यामुळे डोळ्यांवर ताण येऊन नसा खेचल्या जातात. जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी घातक ठरते.

  • तुम्हाला नियमित कॉन्टॅक्ट लेन्स घालायची सवय असल्यास वेळोवेळी डॉक्टरांकडून डोळ्यांची तपासणी करून घ्यावी. डोळ्याला काही धोका नाही ना हे पाहावे. कारण खराब झालेल्या कॉन्टॅक्ट लेन्स आरोग्यासाठी घातक ठरू शकतात.

  • कॉन्टॅक्ट लेन्स वापरताना त्याच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष केंद्रित केले पाहिजे. नाहीतर आपल्या डोळ्यांच्या दृष्टीवर याचा परिणाम होताना दिसतो.

Healthy Eyes
Eye Makeup : आयलाइनर लावताना हात थरथरतो? 'या' गोष्टी कटाक्षाने पाळा अन् डोळ्यांचे सौंदर्य वाढवा
  • कॉन्टॅक्ट लेन्स लावताना लेन्स खाली पडल्यावर ती तशीच उचलून डोळ्यांना लावू नये. त्यामुळे संसर्गाचा धोका वाढतो. कारण जमिनीवरील लेन्सला धूळ, माती लागलेली असते. जी डोळ्यांत जाते.

  • गॅस जवळ काम करताना, पाण्यात पोहताना आणि डोळ्यांना कोणते अ‍ॅलर्जी झाली असल्यास कॉन्टॅक्ट लेन्सचा वापर टाळावा.

  • लेन्स लावल्यानंतर तुमच्या डोळ्यांची जळजळ होत असल्यास किंवा डोळे लाल होत असल्यास त्वरित डॉक्टरशी संपर्क साधावा.

  • कॉन्टॅक्ट लेन्सचा पाण्याशी संपर्क टाळा.

  • कॉन्टॅक्ट लेन्स लावण्याआधी आणि काढून ठेवताना बॉक्समध्ये उपलब्ध असलेल्या द्रावणाचा वापर करावा.

डिस्क्लेमर : ही फक्त सामान्य माहिती आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Healthy Eyes
Eyes Healthy : डोळ्यांमध्ये 'ही' लक्षणे जाणवल्यास वेळीच व्हा सावध, अन्यथा जाऊ शकते तुमची दृष्टी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com