
सणासुदीच्या काळात अनेकजण आपापल्या घरी जातात. दरम्यान या सणासुदीच्या तुम्हीदेखील फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. सध्या एअर इंडियाच्या विमानाच्या तिकिटावर बंपर डिस्काउंट मिळत आहे. एचडीएफसी बँक आणि एअर इंडियाने क्रेडिट कार्डधारकांना फ्लाइट तिकीट बुकिंगवर डिस्काउंट दिला आहे.
एअर इंडिया आणि एचडीएफसी बँकेच्या या ऑफरमुळे ग्राहकांना जवळपास ६००० रुपयांचा डिस्काउंट मिळणार आहे. देशांतर्गत आणि इंटरनॅशनल अशा दोन्ही फ्लाइट तिकिटांवर हा डिस्काउंट दिला जाणार आहे. (Air India Flight Ticket Discount)
कधीपर्यंत मिळणार फायदा?
एअर इंडियाची ही ऑफर १ ऑक्टोबर २०२५ ते १८ ऑक्टोबर २०२५ पर्यंत लागू असणार आहे. म्हणजे फक्त १८ दिवस तुम्हाला या ऑफरचा फायदा घेता येणार आहे. यासाठी ऑनलाइन तिकीट बुक करताना तुम्हाला (HDFCFLY) हा कोडदेखील टाकावा लागणार आहे.
कोणाला मिळणार फायदा?
ही ऑफर फक्त एचडीएफसी बँक क्रेडिट कार्डधारकांना मिळणार आहे. हे ग्राहक एअर इंडियाच्या अधिकृतस वेबसाइट किंवा मोबाईल अॅपद्वारे तिकीट बुक करु शकतात. जर तुम्ही थर्ड पार्टी अॅपवरुन तिकीट बुक केले तर तुम्हाला हा लाभ मिळणार नाही.
किती सूट मिळणार
एअर इंडियाच्या वेबसाइटवर तुम्हाला याबाबत सर्व माहिती दिली आहे. देशांतर्गत फ्लाइट तिकीटवर तुम्हाला ४०० रुपयांचा डिस्काउंट मिळणार आहे.
इंटरनॅशनल फ्लाइट
इकोनॉमी क्लाससाठी १००० रुपयांचा डिस्काउंट मिळणार आहे. प्रिमियम इकोनॉमी क्लाससाठी १५०० तर बिझनेस किंवा फर्स्ट क्लाससाठी २००० रुपयांचा जस्काउंट मिळणार आहे. राउंड ट्रिप तिकिटसाठी इकोनॉमी क्लासमध्ये २५०० रुपये, प्रिमियम इकोनॉमी क्लाससाठी ३००० रुपये, बिझनेस आणि फर्स्ट क्लाससाठी ६००० रुपयांचा डिस्काउंट मिळणार आहे.
नियम
ही ऑफर फक्त पूर्ण पेमेंट करणाऱ्यांसाठी लागू आहे. ईएमआयवर तुम्हाला ही ऑफर मिळणार नाही. दोन वर्षांपेक्षा कमी वयोगटातील मुलांसाठी ही ऑफर लागू नाही. एका महिन्यात एकदाच तुम्ही या ऑफरचा लाभ घेऊ शकतात.फक्त सिंगल ट्रान्झॅक्शनवर तुम्हाला या ऑफरचा फायदा मिळणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.