Dhanshri Shintre
आज भारतातील अनेक शहरांमध्ये मेट्रो सेवा सुरू असून, प्रवाशांना कमी वेळात आणि अधिक सोयीस्कर पद्धतीने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचता येते.
पण तुम्हाला ठाऊक आहे का, भारतातील पहिली मेट्रो सेवा कोणत्या शहरातून आणि कोणत्या वर्षी सुरू झाली होती? चला जाणून घेऊया तिचा इतिहास.
२४ ऑक्टोबर १९८४ हा भारताच्या वाहतूक इतिहासातील महत्त्वाचा दिवस ठरला, कारण याच दिवशी देशात पहिल्यांदा मेट्रो ट्रेन धावली.
भारताची पहिली मेट्रो सेवा पश्चिम बंगालच्या राजधानी कोलकात्यात सुरू झाली आणि याच शहरात ती पहिल्यांदा धावली.
या ऐतिहासिक मेट्रो सेवेमुळे भारतातील शहरी वाहतुकीमध्ये आधुनिक युगाची सुरुवात झाली आणि प्रवास अधिक सोयीस्कर बनला.
कोलकात्यात मेट्रोची संकल्पना १९२० मध्ये मांडली गेली, मात्र प्रत्यक्ष बांधकाम कामे १९७० च्या दशकात सुरू झाली.
२९ डिसेंबर १९७२ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी कोलकाता मेट्रोचे बांधकाम काम अधिकृतपणे सुरू केले.
रसदीच्या कमतरतेमुळे कोलकाता मेट्रोचे बांधकाम अनेक अडथळ्यांमुळे मंद गतीने सुरू झाले, तरीही ते अखेरीस पूर्ण झाले.
१९८४ साली कोलकात्यात एस्प्लेनेड ते भवानीपूर (सध्याचे नेताजी भवन) दरम्यान मेट्रो सेवा सुरू करण्यात आली.
सुरुवातीला मेट्रोचे नेटवर्क खूपच लहान होते, फक्त ३.४ किलोमीटर लांब आणि फक्त पाच स्टेशन उपलब्ध होते.