
पावसाळ्याच्या दिवसांत वातावरण सारखं बदलत असतं. पाऊस धो-धो बरसत असला की थंडी जाणवते, तर उघडीप दिली तर उष्णता वाढते. त्यामुळं घाम येतो; तसेच हवेतील धूळ-माती चेहऱ्यासह केसांवरही बसते. केस तेलकट आणि चिकट होतात. यामुळे केसांची हवी तशी स्टाईल करणे कठीण जातं. शिवाय तेलकट आणि चिकटपणा केसांची चमक घालवतो. धावपळीच्या जीवनात रोज किंवा दोन दिवसांनी केस धूणं अशक्य होतं. यावर उपाय म्हणून तुम्ही घरच्या घरी काही हेअर केअर हॅक्स करू शकता, जे तुमच्या केसांचा तेलकट आणि चिकटपणा घालवतील व केस चमकदार, सुटसुटीत होतील.
केस न धुताही केसांचा चिकटपणा घालवायचा असेल तर, गुलाब पाणी उत्तम पर्याय आहे. एका स्प्रे बाटलीत गुलाब पाणी भरून ठेवा. जेव्हाही तुमचे केस तेलकट किंवा चिकट होतील, तेव्हा थोड्या प्रमाणात स्कॅल्प आणि केसांवर स्प्रे करा. हलक्या हातांनी मसाज करा. नंतर फणीने केस विंचरा. याने तुमचे केस तर ताजेतवाने राहतीलच, केसांना छान सुगंधही येईल. तसेच मसाज केल्याने रक्ताभिसरण वाढून केसांची वाढ होईल.
अचानक कुठे बाहेर जायचं ठरतं पण तुमचे केस चिकटपणामुळे सुटसुटीत दिसत नाहीत. अशावेळी हवी तशी हेअर स्टाईल करता येत नाही, याचा परिणाम संपूर्ण लूकवर होतो. यापासून वाचण्यासाठी तुम्ही ब्लॉटिंग पेपरच्या मदतीने एक सोपा हॅक करू शकता. चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल काढण्यासाठी ब्लॉटिंग पेपरचा वापर केला जातो. याचा वापर करून तुम्ही स्कॅल्पवरील तेलही कमी करू शकता. यासाठी ब्लॉटिंग पेपर घेऊन स्कॅल्पवर हलके दाबून ठेवा. जेणेकरून ते अतिरिक्त तेल शोषून घेईल.
तुमच्याकडे असलेली टॅल्कम पावडरही तुमच्या केसांचा तेलकट आणि चिकटपणा घालवू शकते. थोडी टॅल्कम पावडर केसांवर शिंपडा आणि हेअर ब्रशने केस विंचरा. याने केसांच्या जटा सोडवणे सोपे होईल आणि केस सुटसुटीत दिसतील. केसांवरील अतिरिक्त पावडर झटकून टाका, नाहीतर केस राखाडी आणि रखरखीत दिसतील. शिवाय केस विंचरल्यानंतर मऊ दात असलेल्या ब्रशने स्कॅल्प स्वच्छ करा. यामुळे केसांवरील अतिरिक्त तेल कमी होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.