
Know how watching food content cause weight gain : आपल्या सर्वांनाच विशेषत: स्त्रियांना नेहमी काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा होत असते. काहीजण खाद्यप्रेमी असतात. पण लठ्ठपणा येऊ नये या भितीने जास्त खाणे किंवा बाहेरचे चमचमीत खाणे टाळतात, जिमला जातात. पण तुम्हाला माहीत आहे का? की, 'या' एका कारणामुळे तुमची सगळी मेहनत वाया जाऊ शकते. तुम्ही लठ्ठपणा टाळण्यासाठी बाहेरचे खात नसलात तरी, सतत सोशल मिडियावरील फूड कंटेंट पाहून नक्कीच लठ्ठपणा आणि इतर आजार ओढवून घेत आहात.
बऱ्याचवेळा आपण "आज बाहेरचे काहीच खायचे नाही" असे ठरवतो. पण इन्स्टाग्राम किंवा सोशल मिडियावर चटकदार खाद्यपदार्थांच्या रिल्स पाहतो, तेव्हा आपल्या मेंदू मध्ये डोपामिन म्हणजेच प्लेजर देणारा पदार्थ तयार होतो. यामुळे आपण काही खात नाही तरीही रिल्समध्ये असलेले चमचमीत पदार्थ खाण्याची तीव्र इच्छा होते. आणि त्यावर पर्याय म्हणून आपण जंक फूड किंवा इतर पॅकेजिंग पदार्थ खातो. जे शरीरातील फॅट वाढवण्यास कारणीभूत ठरतात. याला विज्युअल फूड सिम्युलेशन ( Visual Food Simulation) असं म्हणतात.
कधी कधी खरंच भूक नसताना देखील फुड कंटेंट असलेले व्हिडिओज पाहून आपल्याला जंक फूड खाण्याची इच्छा होते. आणि आपण पिज्झा, बर्गर, वडे, समोसा असे तळलेले पदार्थ, कॅलरीज असलेले केक्स, गोड खाऊ, सेजवानचे पदार्थ खातो. यांमध्ये असलेले घटक शरीरीत कॉलेस्ट्रॉल निर्माण करतात. जो लठ्ठपणाला आमंत्रण देतो. हे चक्र असेच सुरू राहीले तर याचा परिणाम आपल्या मानसिकतेवरही होण्याची शक्यता आहे. सतत काहीतरी खाण्याची इच्छा होत असल्याने लक्ष केंद्रित करणे कठीण होते.
रात्रीच्या वेळेस फूड कंटेंट रिल्स पाहिल्या तर, आपल्या मेंदूला आता आपण काहीतरी खाणार आहोत असा संदेश मिळतो. यासाठी शरीर लाळ, पचनासाठी आवश्यक असलेले अॅसिड तयार करतो. पण प्रत्यक्षात आपण काहीच खात नाही. शरीराने तयार केलेल्या अॅसिडचा काहीच उपयोग होत नाही आणि अॅसिडीटी, आंबट ढेकर येतात, पोटात गॅस किंवा जळजळ होऊ लागते. यावर उपाय म्हणून खाद्यपदार्थांच्या रिल्स पाहण्याला कमी आणि ठराविक वेळ द्या, भूक लागली तरच खा, सतत खाण्याची इच्छा होऊ नये यासाठी खाद्यपदार्थ असलेले व्हिडीओज पाहणं टाळा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.