
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं.
मोदींनी भाषणाची सुरुवात मराठीतून दिवाळीच्या शुभेच्छा
लोकनेते दि. बा. पाटील यांची आठवण काढत मोदींनी त्यांच्या समाजकार्याचं केलं स्मरण
भूमिगत मेट्रो, आयटी उद्योगासाठी योजना, आणि तंत्रशिक्षणावर भर देत असल्याचं मोदींनी सांगितलं
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दुपारी दोन वाजता झालं. या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांशी संवाद साधला. ११६० हेक्टर जमिनीवर पसरलेल्या विमानाच्या उद्घाटनप्रंसगी कार्यक्रमात नरेंद्र मोदींनी भाषणाला मराठीतून सुरुवात केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईकरांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. मुंबईला दुसरं आंतरराष्ट्रीय विमानतळ मिळाल्यांच पंतप्रधान मोदींनी सांगितलं. यावेळी मोदींनी लोकनेते दि. बा. पाटील यांच्या आठवणीलाही उजाळा दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील मुद्दे
मुंबईला दुसरं आंतरराष्ट्रीय विमानतळ मिळालंय. मुंबई शहराला आशियाशी जोडण्यासाठी हे विमानतळ मोलाची भूमिका निभावेल.
मुंबईला आज भूमिगत मेट्रो देखील मिळाली आहे. मुंबईत प्रवास आणखी सुकर होईल. लोकांचा वेळ वाचणार आहे. ही भूमिगत मेट्रो भारत विकसित होत असल्याची चिन्हे आहेत.
मुंबईसारख्या शहरात इमारतींना धक्का न पोहोचता भूमिगत मेट्रो तयार करण्यात आली आहे. भूमिगत मेट्रो तयार करणारे श्रमिक आणि इंजिनीअरचं अभिनंदन करतो.
काही दिवस आधी देशातील आयटी कंपन्या इंडस्ट्रीला जोडण्यासाठी ८ हजार कोटींची योजना सुरु केली.
आज महाराष्ट्र सरकारने शेकडो आयटी संबंधित कार्यक्रम सुरु केले. शाळेत शिकणारे विद्यार्थी रोबोटिक्स, इलेक्ट्रिक वाहने, सोलर एनर्जी, ग्रीन हायड्रोजन अशा तंत्रज्ञानाची ट्रेनिंग देण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे लोकनेते दी. बा. पाटील यांचही स्मरण करत आहे. त्यांनी समाजासाठी सेवा केली. त्यांचं समाजकार्य आमच्यासाठी प्रेरणा आहे. त्यांचं जीवन समाजात काम करणाऱ्या लोकांसाठी प्रेरणादायी ठरेल.
आज संपूर्ण देशाच्या विकासासाठी कार्य करतोय. विकसित भारत म्हणजे जिथे गती आणि प्रगती आहे. जिथे सरकारच्या योजना लोकांचं आयुष्य सुकर करतील.
मागील ११ वर्षांत देशात झपाट्याने विकास होतोय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.