Maharashtra Live News Update : नवी मुंबई विमानतळ अन् मुंबई मेट्रो-३ चे उद्घाटन

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज बुधवार, दिनांक ०८ ऑक्टोबर २०२५, पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर, नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन, मेट्रो ३ पूर्णपणे सुरू होणार, कोर्टात शिवसेना अन् धनुष्यबाण यावर सुनावणी, महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv

वाशिम एसडीपीओच्या पथकाची गावठी दारु विक्री करणाऱ्यावर धडक कारवाई

वाशीमच्या मालेगांव तालुक्यातील डोंगरकिन्ही येथे वेगवेगळ्या ठिकाणी गावठी दारू विक्री करणाऱ्यावर एसडीपीओच्या पथकाने छापे टाकून कारवाई केली. या कारवाई 1 लाख 68 हजाराचा मुद्देमाल जप्त करत 5 जणांवर पोलीस स्टेशन मालेगाव येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

वाशीम एसडीपीओ नवदीप अग्रवाल यांना मिळालेल्या माहितीनुसार मालेगांव पोलीस स्टेशन हद्दीतील डोंगरकिन्हीं येथे 5 ठिकाणी छापा टाकण्यात आला. यात मोहमाचं हातभट्टी दारू, सडवा बाळगणारे आणि विक्री करतांना मिळून आले. याप्रकरणी मिळून आलेली हातभट्टी दारू 105 लिटर, 855 लिटर मोहमाचा सडवा ,1 मोबाईल ,1 मोटर सायकल असा 1लाख 68 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलं आहे.तसेच गावठी हातभट्टी दारु आणि मोहामाच सडवा बाळगणारे आणि विक्री करणाऱ्या आरोपी 5 आरोपी विरुद्ध मालेगांव पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करण्यात आलं आहे. ही कारवाई एसडीपीओ नवदीप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. दिनेश शिरेकार आणि त्यांच्या पथकाने केली.

गौतमी पाटील ने धुडकावली पुणे पोलिसांची नोटीस

८ दिवसानंतर सुद्धा गौतमी पाटील ने पोलिसांकडे जबाब नोंदवला नाही

१ तारखेला हजर राहण्यासाठी पोलिसांनी नोटीस बजावली असताना सुद्धा गौतमी पाटील उपस्थितीत नाही

पोलिसांचा आदेश झुगारुन गौतमी पाटील चे "शो" दणक्यात सुरू

गौतमी पाटील ला कोणाची भीती वाटते? पोलिसांकडे हजर राहायला सुद्धा गौतमी पाटील ने टाळलं

ई-केवायसीसाठी सूचनेनंतरही रेशन कार्डधारकांची गैरहजेरी

यवतमाळ जिल्ह्यातील अंत्योदय आणि प्राधान्य गटातील कुटुंबांनाही ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यानंतर या रेशन कार्डधारकांनी ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, अशा रेशनकार्डधारकांचे धान्य बंद करण्याच्या सूचना होत्या तूर्त या प्रक्रियेत राशनकार्डला ई-केवायसी करण्याची वाढीव मुदत नसली तरी अपडेशन प्रक्रिया सुरू आहे मात्र पुढील काळात अशा रेशन कार्डधारकांवर प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे.

पंधरा दिवस सुरू असलेल्या शारदीय नवरात्र महोत्सवाची सांगता

22 सप्टेंबर रोजी घटस्थापनेने सुरुवात झालेला श्री तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाची आश्विन पौर्णिमेच्या विविध कार्यक्रमाने सांगता करण्यात आलीय.पंधरा दिवस सुरू असलेल्या महोत्सवानिमित्त देशाच्या कानाकोपऱ्यातून तुळजाभवानीच्या दर्शनासाठी भाविकांनी हजेरी लावली. सोलापूर येथील मानाच्या काट्या आल्यानंतर मंदीर संस्थानच्या वतीने स्वागत करण्यात आले तर राञी उशीरा मानाच्या काठ्यासह तुळजाभवानी मातेचा छबिना करण्यात आला आणि परंपरेचा जोगवा मागून या महोत्सवाची सांगता करण्यात आली.यावेळी मंदिरात लाखोच्या संख्येने भाविकांची उपस्थिती होती.

मिरजेत दोन गटात राडा. धार्मिक भावना दुखावनारे वक्तव्य प्रकरणी एकास अटक

सांगली जिल्ह्यातील मिरज येते मुस्लिम समाजाच्या भावना दुखानारे वक्तव्य करणाऱ्या 16 वर्षीय मुलाला पोलिसांनी तात्काळ अटक करून कारवाई केली आहे.

या घटनेने मिरज येथील शास्त्री चौक येते जमाव जमला होता..याच दरम्यान राजकीय पुढाऱ्यांचे ही फलक फाडले गेले आहेत.काहीजण भावना दुखावणार्या मुलाच्या घरावर चाल करून गेले होतें. वेळीच पोलिसांनी धाव घेऊन जमाव पांगवला ,पोलीस स्टेशन आवारात समाजाकडून संबंधितावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी जमावाला शांत करत ..कारवाई सुरू असल्याची माहिती दिली.सद्या तनाव पूर्ण निवळला आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका असेही आवाहन पोलीस अधीक्षक यांनी केली आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा उद्घाटन.

ज्या विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देणार असं राज्य सरकारकडून सांगण्यात आलं होतं. 

मात्र उद्या उद्घाटन तरी देखील निमंत्रण पत्रिकेवरती विमानतळाचा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असा उल्लेख. 

दिबा पाटील यांच्या नावाचं कुठेही उल्लेख नाही. 

विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्यात यावं यासाठी अनेक भूमिपुत्रांनी केले होते आंदोलन

महायुतीची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकींसाठी रणनीती ठरली…

महायुती राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा पातळीवर  समिती निर्माण करणार 

या समितीत पालकमंत्री व दोन्ही पक्षांचे नेते असणार, सोबतच जिल्ह्यातील आमदार व इतर ही असणार…

जिल्हा पातळीवरील समिती पुढील आठ दिवसात जिल्ह्यातील निवडणुकींच्या अनुषंगाने अहवाल तयार करणार…

या अहवालात जिल्ह्यातील परिस्थिती, महायुती आणि महायुतीअंतर्गत असलेल्या पक्षाची ताकद आणि परिस्थिती याचा ही आढावा असणार 

तसेच ज्या जिल्ह्यात महायुती अंतर्गत वादाची सविस्तर माहिती मांडणार 

हा संपूर्ण अहवाल, आढावा जिल्हा समन्वय समिती राज्य समिती समोर पुढील आठ दिवसात मांडणार 

राज्य सरकारकडे अहवाल आल्यानंतर ज्या ठिकाणी वाद असतील त्या ठिकाणचे निर्णय महायुतीचे मुख्य नेते घेतील 

कोणत्याही ठिकाणी जाहीरपणे तणाव निर्माण होणार नाही, याची काळजी राज्य समन्वय समितीकडून घेतली जाईल…

Maharashtra Live News Update : नवी मुंबई विमानतळ अन् मुंबई मेट्रो-३ चे उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहेत. नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होणार आहे. मुंबई मेट्रो ३ आज पूर्णपणे सुरू होणार आहे. मोदी काय बोलणार याकडेही सर्वांचे लक्ष लागलेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com