Kalsubai Trek Saam Tv
लाईफस्टाईल

Kalsubai Trek: गर्द झाडी, हिरवळ अन् मखमालीच्या कुशीतलं कळसुबाई शिखर; कसं जायचं? वाचा एका क्लिकवर

Kalsubai Trek Route From Mumbai: कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. या शिखरावर ट्रेक करण्यासाठी अनेकजण जातात. या शिखरावर जाण्यासाठी कुठून जायचे, राहण्याची सोय काय, ट्रेक करण्याची योग्य वेळ कोणती याबाबत सर्व माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

Aarti Ingle

कोणताही ऋतू असो महाराष्ट्राचं सर्वोच्च शिखर असणाऱ्या कळसुबाई शिखराकडे पर्यटकांचा कायमच ओढा असतो. हे सर्वात उंच शिखर सर करणं अनेक पर्यटकांचं स्वप्न असतं. आज आपण याच शिखराविषयी जाणून घेऊयात.

आव्हानात्मक ट्रेकिंग आवडत असेल अशा पर्यटकांनी कळसूबाई शिखरावर नक्की भेट द्यावी. अहमदनगर जिल्ह्यातील हे शिखर म्हणजे जणू काही महाराष्ट्रातील माऊंट एव्हरेस्टच. उत्तरेकडील सह्याद्री पर्वत रांगेतील कळसबाई शिखराची उंची 5 हजार 400 फूट आहे. निसर्गाने भरभरून दान दिलेला हा शिखर केवळ प्रेक्षणीय नाही तर जैवविविधतेच्या दृष्टीने अत्यंत संपन्न आहे.

कळसूबाईचा इतिहास म्हणजे एक दंतकथा आहे. कळसू नावाची कोळ्याची एक मुलगी होती. ती पाटलाच्या घरी काम करत होती. केर काढणे आणि भांडी घासणे सोडून इतर कामे मी करीन, अशी अट कळसूने कामाला लागण्यापूर्वी पाटलाला घातली होती. मात्र एकदा पाटलाने कळसूला भांडी घासायला लावली, त्यामुळे चिडून कळसू डोंगरावर जाऊन राहू लागली. तोच कळसूबाईचा डोंगर होय, असे म्हटले जाते.

१) कळसूबाई शिखरावर जायचे कसे?

  • मुंबईहून कळसूबाई शिखरावर जाण्यासाठी CSMT रेल्वे स्थानकावरून कसारा ट्रेन पकडा. त्यानंतर कसारा स्टेशनला उतरून शेअरिंग जीप किंवा बस सुविधा आहेत. त्या पकडून अहमदनगर जिल्ह्यातील बारी या गावात उतरा. ज्यासाठी सुमारे 200 रूपये खर्च होईल.

  • पुण्याहून शिखरावर जाण्यासाठी पुणे जंक्शन ते इगतपुरी पर्यंत ट्रेन पकडा. त्यानंतर इगतपुरीला उतरून जीप किंवा बसने अहमदनगर जिल्ह्यातील बारी गावात उतरा. ज्यासाठी सुमारे 300 रूपये खर्च होईल.

२) शिखरावर बघण्यासारखे काय आहे?

  • कळसूबाई शिखरावरून अलंग, मदन, कुलंग, रतनगड, अशी सह्याद्रीची बरीचशी प्रसिद्ध शिखरे दिसतात.

  • शिखरावरील कळसूबाईचे प्राचीन मंदिर अतिशय शुभ मानले जाते. आजही अनेक गावकरी कळसूबाई देवीचे आशीर्वाद घेण्यासाठी मंदिरात येतात. हे मंदिर वर्षभर खुले असते.

  • कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. हे शिखर महाराष्ट्रातील माऊंट एव्हरेस्ट म्हणून ओळखले जाते.

  • कळसूबाई शिखरावर एक लोखंडी साखळी आहे. असं म्हणतात की ती साखळी ओढल्यास मनातली इच्छा पूर्ण होते. अनेक ट्रेकर्स ही हौस पूर्ण करतात.

  • कळसुबाई शिखरावर ट्रेकिंग करताना सुंदर लँडस्केप, हिरवीगार शेती पाहायला मिळेल. या शिखरावर अधून मधून शिड्याही बसवण्यात आल्या आहेत. ज्यामुळे पर्यटक इथे जास्त आकर्षित होतात.

३) राहण्याची, खाण्याची सोय आहे का?

  • कळसूबाई शिखरावर राहण्याची आणि खाण्याची कसलीच सोय नाही. मात्र अकोले तालुक्यातील भंडारदऱ्याला किंवा बारी गावात राहण्याची सोय होऊ शकते. त्यामुळे शिखरावर जाण्यापूर्वीच पोट भरून जेवण करून जावा, तसेच सोबत पुरेसे पाणी ठेवा.

४) ट्रेकवर जाताना सोबत काय ठेवाल?

  • पाणी, जास्तीचे कपडे, शूज, सुका खाऊ, ORS पावडर, पावसाळ्यात गेल्यास रेनकोट, उन्हाळ्यात गेल्यास गोड काहीतरी ठेवा, प्रथमोपचार किट आणि उच्च-कॅलरी स्नॅक्स.

५) शिखराला भेट देण्याची उत्तम वेळ

  • कळसूबाई शिखराला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ म्हणजे हिवाळा. हिवाळ्यात शिखरावरचे सरासरी तापमान 15°C असते. ज्यामुळे वातावरणात एक वेगळाच आनंद मिळेल. तसेच शिखरावरून तुम्ही सह्याद्री पर्वतरांगा आणि भंडारदरा तलावाच्या विहंगम दृश्यांचा आनंद लुटू शकता.

  • पावसाळ्यात हे शिखर हिरवेगार, रानफुले आणि धबधब्यांनी व्यापलेले असते. कळसूबाई शिखरावर जाण्यासाठी पावसाळा हा सर्वात साहसी आणि आव्हानात्मक काळ आहे, कारण ट्रेकचा मार्ग चिखलमय आणि धुक्याने भरलेला असतो. त्यामुळे पावसाळ्यात शिखरावर जाण्यासाठी तुम्हाला ट्रेकिंगचा अनुभव हवा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IRCTC App: रेल्वे प्रवाशांचं काम झटक्यात अन् सोपं होणार, तिकीट बुकिंगपासून सगळ्या सुविधा एकाच अ‍ॅपवर

मोठी कारवाई! अमरावतीमध्ये तब्बल ६ कोटींचे सोनं-चांदी जप्त, नागपूरवरुन निघालेल्या गाडीत सापडले घबाड!

Maharashtra Election : ऐन निवडणुकीत बेधडक कारवाई, एकनाथ शिंदेंनी बंडखोर महेश गायकवाड यांच्यासह १० जणांची केली हकालपट्टी!

Todays Horoscope: काही राशींची आर्थिक अडचण होईल दूर, तर काहींच्या नात्यात होईल वाद, जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Today Horoscope: आज होणार अचानक धनलाभ, तर अनेकांचे जुळेल प्रेम; यात तुमची रास तर नाही ना?

SCROLL FOR NEXT