हिवाळा सुरु झाला की, अनेक आजार डोकं वर काढतात. या काळात वातावरणात अनेक बदल होतात. ज्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. या ऋतूमध्ये मधुमेह आणि रक्तदाबाच्या रुग्णांना स्वत:ची विशेष काळजी घ्यावी लागते.
या काळात अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. या ऋतूमध्ये वातावरणातील बदलामुळे रक्तवाहिन्यावर परिणाम होतो. शरीरातील रक्ताभिसरण मंदावते. त्यामुळे हृदयावरील कामाचा ताण वाढतो. इतकेच नाही तर अनेक समस्या उद्भवू शकतात. ज्यामुळे हृदयविकाराचा झटका, ब्रेन स्ट्रोक आणि डोळ्यांच्या समस्या उद्भवतात. हिवाळ्यात कोणत्या आजारांचा सामना करावा लागतो. जाणून घेऊया
1. स्ट्रोक
हिवाळ्यात (Winter Season) उच्च रक्तदाबाच्या रुग्णांचा रक्तदाब वाढतो. ज्याचा थेट परिणाम रक्तवाहिन्यांवर होतो. जास्त रक्तदाबामुळे स्ट्रोकचा झटका येऊ शकतो. यामुळे उच्च रक्तदाब आणि मधुमेहाच्या (Diabetes) रुग्णांना या वेळी तणाव आणि बीपी नियंत्रणात ठेवावे लागते.
2. पेरिफेरल आर्टरी डिजीज
पेरिफेरल आर्टरी डिजीज झाल्यावर रक्त परिसंचरण मंदावते. ज्यामुळे शरीराच्या इतर भागांवर परिणाम होतो. हा रक्तवाहिन्यांचा आजार आहे. हिवाळ्यात हाय बीपीच्या (Blood Pressure) रुग्णांमध्ये अधिक त्रास होण्याची भीती असते.
3. डोळ्यांशी संबंधित त्रास
उच्च रक्तदाब आणि तणावामुळे डोळ्यांवर परिणाम होतो. ज्यामुळे डोळे खराब होतात. तसेच ऑप्टिक नर्व्हमध्ये सूज देखील येऊ शकते. ज्यामुळे डोळ्यांची अधिक काळजी घ्यायला हवी.
4. हृदयविकाराचा झटका
हिवाळ्यात कोलेस्टेरॉल धमन्यांवर परिणाम होतो ज्यामुळे रक्तवाहिन्या आकसतात. ज्याचा आपल्या हृदयावर परिणाम होतो. अशावेळी आपल्या हृदयाला रक्त पुरवण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागते.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.