Corona Variant JN.1 : कोरोनाची चौथी लाट येणार?, पुढचे २-३ आठवडे महत्वाचे; तज्ज्ञांचे मत काय?

Corona Variant JN.1 Disease : कालपर्यंत देशात या नवीन आजाराची २२ प्रकरणे समोर आली आहे. त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली. कोरोनाचे वाढते रुग्ण पाहाता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोनाच्या नवीन प्रकाराबाबत राज्यांना अलर्ट जारी केला आहे. महाराष्ट्रातही JN.1 चा संसर्ग आढळून आला आहे.
Corona Variant JN.1
Corona Variant JN.1Saam Tv
Published On

Corona Variant JN.1 Symptoms :

जगभरात पुन्हा एकदा कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने डोकं वर काढले आहे. या नव्या व्हेरिएंटमुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी करत असताना कोरोनामुळे अनेकांना टेन्शन आले आहे.

कालपर्यंत देशात या नवीन आजाराची २२ प्रकरणे समोर आली आहे. त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली. कोरोनाचे वाढते रुग्ण पाहाता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोनाच्या (Corona) नवीन प्रकाराबाबत राज्यांना अलर्ट जारी केला आहे. महाराष्ट्रातही JN.1 चा संसर्ग आढळून आला आहे.

कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसून येत असल्यामुळे लवकरच कोरोनाची चौथी लाट येईल असे अनेकांनी मत नोंदवले आहे. तर काही लोकांनी दोन-तीन आठवड्यात सर्व काही सामान्य होईल असे तज्ज्ञांनी सांगितले आहे. तसेच JN.1च्या या व्हेरिएंटबद्दल घाबरण्याची गरज नाही असे देखील सांगितले आहे.

Corona Variant JN.1
Corona Variant JN.1 : न्यू इयर सेलिब्रेशनचं प्लानिंग करताय? गर्दीत जाण्याआधी कोरोनाच्या Jn.1 धोका ओळखा

1. घाबरु नका

कोरोनाच्या या नव्या संसर्गजन्य आजाराच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे परंतु, घाबरण्याची गरज नाही असे देखील म्हटले आहे. WHO ने सांगितले की, याचे 'व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट' म्हणून वर्गीकरण करण्यात आले आहे. भारतात याची लागण झालेल्या रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे (Symptoms) आढळून आली आहेत.

या आजारात (Disease) सर्दी, खोकला, ताप याचा साधरणत: समावेश असतो. तज्ज्ञांनी सांगितले आहे की, ही लक्षणे सामान्य आहेत त्यामुळे कोणत्याही प्रकारची कोरोनाची लाट येणार नाही. ही लक्षणे दिसल्यास डॉक्टारांचा सल्ला घ्या

Corona Variant JN.1
Corona Variant JN.1 Cases : महाराष्ट्रात कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ, घराबाहेर पडण्याआधी डॉक्टरांचा सल्ला वाचा

2. दोन-तीन आठवड्यात परिस्थिती कळेल...

WHO चे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी सांगितले की, इन्फ्लूएन्झा एडेनोव्हायरस, राइनोव्हायरस आणि रेस्पिरेटरी सिन्सिशिअल व्हायरस यांसारख्या सीझनल फ्लूमुळे श्वसनावर परिणाम होत आहे. याची लक्षणे ही कोरोनासारखीच आहेत. ज्यामुळे लोकांना श्वास घेण्यास त्रास होतोय. यापूर्वी अनेकांना बूस्टर डोस घेतल्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. येत्या दोन ते तीन आठवड्यात आपल्या या आजाराची परिस्थिती कळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com