ATM PIN security: ATM पिन ठरवताना घ्या काळजी, चुकूनही हे नंबर ठेवू नका; नाहीतर...

Surabhi Jayashree Jagdish

एटीएम कार्ड

आजच्या डिजिटल युगात एटीएम कार्ड किंवा गुगल पेचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. पैसे काढणं, ऑनलाइन खरेदी करणं किंवा बिल भरणं या सगळ्या गोष्टी एटीएम कार्डमुळे सोप्या झाल्या आहेत.

unsafe ATM PIN numbers

एटीएम पिन

मात्र अनेक लोक एटीएम पिन निवडताना मोठी चूक करतात. काही विशिष्ट नंबर पिन म्हणून ठेवलं तर सायबर गुन्हेगारांना तो सहज शोधता येतो. त्यामुळे तुमच्या खात्यातील पैसे धोक्यात येऊ शकतात.

ATM card safety tips

1234 किंवा 4321 असे नंबर

1234 किंवा 4321 असे सरळ क्रमाने किंवा उलट क्रमाने असलेले नंबर खूप सामान्य असतात. सायबर गुन्हेगार सर्वात आधी अशाच पिनचा अंदाज लावण्याचा प्रयत्न करतात. म्हणून असे सोपे क्रमांक एटीएम पिन म्हणून ठेवणं टाळावं.

common ATM PIN mistakes

एकच अंक

1111, 0000, 2222 किंवा 5555 असे एकाच अंकाचे पिन आठवणीत ठेवायला सोपे असतात. पण हे पिन सायबर हॅकर्ससाठी ओळखायला सोपे असतात. अशा पिनचा अंदाज काही सेकंदांत लावला जाऊ शकतो.

cyber security banking tips

जन्मतारीख पिन म्हणून ठेवणं

अनेक लोक स्वतःची किंवा कुटुंबातील लोकांची बर्थ डेट पिन म्हणून ठेवतात. 1308, 1511 अशा तारखा सोशल मीडियावरून सहज सापडतात. म्हणून जन्मतारीख पिन म्हणून ठेवणं धोकादायक ठरू शकतं.

online banking safety

बर्थ इअरचा पिन

काही लोक त्याचं बर्थ इअर किंवा जवळच्या व्यक्तीचं बर्थ इअर पिन म्हणून ठेवतात. ही माहितीही अनेकदा कागदपत्रांमध्ये किंवा सोशल मीडियावर उपलब्ध असते. त्यामुळे हॅकर्सना हा पिन ओळखणं सोपं असतं.

cyber crime banking

मोबाईल नंबरशी संबंधित अंक

काही लोक मोबाईल नंबरमधील शेवटचे चार अंक पिन म्हणून ठेवतात. ही माहिती अनेक ठिकाणी शेअर केली जाते किंवा इतरांना माहीत असते. त्यामुळे अशा पिनचा अंदाज लावणं सोपं असतं.

ATM PIN safety rules

गाडीचा नंबर

गाडीचा नंबर, आधार क्रमांक हे आकडे पिन म्हणून ठेवले जातात. हे नंबर अनेकदा कागदपत्रांवर किंवा सार्वजनिक ठिकाणी दिसतात. त्यामुळे अशा पिनचा वापर केल्यास फसवणुकीचा धोका वाढतो.

banking security awareness

सुरक्षित पिन कसा ठेवावा?

तज्ज्ञांच्या मते पिन असा निवडावा ज्याचा सहज अंदाज येणार नाही. तो नियमितपणे 6 ते 12 महिन्यांनी बदलणंही आवश्यक आहे. तसंच पिन कुणासोबतही शेअर करू नये आणि प्रत्येक कार्डासाठी वेगळा पिन ठेवावा.

avoid common PIN numbers

Raigad fort history: रायगड किल्ल्याचं अद्भुत रहस्य! नगरखान्यातील आवाज दरबारात बसलेल्या महाराजांपर्यंत कसा पोहोचायचा?

ancient acoustic engineering
येथे क्लिक करा