Juices For Skin Saam TV
लाईफस्टाईल

Juices For Skin: ज्यूसचे सेवन करा आणि सुंदर व्हा; चेहऱ्यावर येईल मस्त ग्लो

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

निरोगी शरीरासाठी आपल्याला व्हिटॅमिन जास्त असलेले पदार्थ खाणे गरचेचं आहे. त्याचप्रमाणे आपल्या ग्लोइंग स्किनसाठी देखील बेस्ट फूडचे सेवन केले पाहिजे. विविध फळांचे ज्यूस सुद्धा आपल्याला निरोगी ठेवतात. तसेच आपल्या स्किनला देखील याने अनेक फायदे मिळतात.

टोमॅटो ज्यूस

टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी असते. तसेच यामध्ये अँटीऑक्सीडेंट देखील असते. त्यामुळे आपल्या स्किनला याचा मोठा फायदा होतो. स्किनमधील रेडिकल डॅमेज याने भरून निघते.

बीट ज्यूस

बीटपासून बनलेल्या ज्यूसचे सेवन केल्याने आपल्याला व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन ए मिळते. याने सूर्याच्या किरणांमुळे आपल्याला होणाऱ्या त्वचेच्या समस्या दूर होतात. तसेच चेहऱ्यावरील ओपन फोर्स कमी होतात.

गाजराचा ज्यूस

गाजरचे सेवन आहारात असावे असं प्रत्येक डॉक्टर सांगतात. याने आपल्या डोळ्यांची नजर आणखी तीक्ष्ण होते. तसेच यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीऑक्सीडेंट असते. याने चेहऱ्याच्या स्किनवरील काळी वर्तुळे, डाग या समस्या दूर होतात आणि चेहऱ्यावर नॅचरल ग्लो येतो.

कारल्याचा ज्यूस

कारलं चवीला कडू असतं. त्यामुळे अनेक व्यक्ती याचे सेवन करत नाहीत. मात्र कारलं आपल्या आरोग्यासाठी फार गुणकारी आहे. डायबिटीज असलेल्या व्यक्तींनी कायम आहारात कारल्याचा समावेश केला पाहिजे.

फळांचा आणि फळभाज्यांच्या ज्युसचा आपल्या आरोग्यावर चांगला परिणाम होतो. जर तुम्हाला चष्मा असेल तर तो देखील हे ज्यूस प्यायल्याने कमी होतो. शिवाय चेहऱ्यावर आलेले पिंपल्स, डार्क सर्कल्स, ओपन फोर्स, ब्लॅकहेट्स सर्व काही दूर होते.

टीप : ही सामान्य माहिती आहे. आम्ही या माहितीचा दावा करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Live Updates : बीआरएसएसचे अनेक नेते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत; आज 'तुतारी' हाती घेणार

Bachchu Kadu : बच्चूभाऊंना विधानसभेच्या तोंडावर महायुतीकडून 'कडू' घास; एकमेव आमदार पळवला!

Viral News : रामाची भूमिका साकारणाऱ्या व्यक्तीला हार्ट अटॅक; मंचावरच सोडला जीव, धक्कादायक VIDEO

Pune Crime : पुणे हादरलं! वारज्यात घरात घुसून महिलेवर लैंगिक अत्याचार, शहरात संतापाची लाट

Hypertension and High Cholesterol: कोलेस्ट्रॉलमुळे हाय ब्लड प्रेशरचा त्रास? वाचा तज्ज्ञांनी काय काय सांगितलं

SCROLL FOR NEXT