Priya More
चहासोबत बिस्किट खाणं हे अनेकांना आवडते. भारतामध्ये तर चहासोबत वेगवेगळ्या प्रकारचे स्नॅक्स खाल्ले जातात.
चहासोबत मैद्याचे बिस्किट खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरते. त्यामुळे ही बिस्किटं न खाण्याचा सल्ला दिला जातो.
मैदा हे हाय ग्लायसेमिक इंडेक्स असलेला पदार्थ आहे. याचा अर्थ ते खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढते.
मधुमेह असलेल्या रुग्णांनी तर मैद्याचे बिस्किट खाऊच नये. हे खाल्ल्यामुळे शरीरातील ग्लुकोजची पातळी झपाट्याने वाढ होते.
मैद्याच्या बिस्किटांमध्ये सामान्यत: जास्त प्रमाणात कॅलरीज असतात आणि त्यांचे नियमित सेवन केल्यास वजन वाढण्यास मदत होते.
मैद्यात आढळणारे प्रक्रिया केलेले कार्बोहायड्रेट्स लवकर पचतात आणि भूक पुन्हा वाढते. ज्यामुळे व्यक्ती अधिक खाऊ लागते.
मैद्यात पोषक मूल्य खूपच कमी असतात. त्यात आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबरची कमतरता असते.
मैद्याची बिस्किट खाल्ल्याने शरीराला आवश्यक पोषक द्रव्ये मिळत नाहीत. ज्यामुळे भूक तर शमतेच पण आरोग्यालाही हानी पोहोचते.
मैद्याच्या बिस्किटांमध्ये ट्रान्स फॅट्स आणि सॅच्युरेटेड फॅट्स असू शकतात. जे हृदयाच्या आरोग्यासाठी हानिकारक असतात.
मैद्याच्या बिस्किटामुळे रक्तातील खराब कोलेस्टेरॉलची पातळी वाढते आणि चांगल्या कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते. त्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.
मैदा हे पचनसंस्थेसाठी वाईट आहे आणि त्याच्या सेवनाने बद्धकोष्ठता, ॲसिडिटी आणि अपचन सारख्या समस्या उद्भवू शकतात.