T20 World Cup: वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टीम इंडियाचा जल्लोष, पाहा जबरदस्त PHOTOS

Priya More

दक्षिण आफ्रिकेचा पराभव

टी- २० वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यामध्ये टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा दारुण परभाव केला.

Team India Celebration | Social Media

७ धावांनी पराभव

अत्यंत रोमहर्षक सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव करून भारताने टी-२० सामना जिंकला.

Team India Celebration | Social Media

टी-२० वर्ल्डकप जिंकला

टीम इंडियाला पुन्हा एकदा टी-२० वर्ल्डकप जिंकण्यात यश मिळाले आहे.

Team India Celebration | Social Media

आतुरतेने वाट

गेल्या १७ वर्षांपासून टीम इंडियाचे खेळाडू आणि प्रत्येक भारतीय या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते.

Team India Celebration | Social Media

दिवाळी साजरी

टीम इंडियाच्या विजेतेपदानंतर बार्बाडोसच्या स्टेडियममध्ये दिवाळी साजरी केल्यासारखे वातावरण होते.

Team India Celebration | Social Media

अपूर्ण स्वप्न झालं पूर्ण

गेल्या वर्षी १९ नोव्हेंबरला अहमदाबादमध्ये अपूर्ण राहिलेले स्वप्न अखेर वेस्ट इंडिजमध्ये पूर्ण झाले. यावेळी रोहित शर्मासह सर्वच खेळाडूंच्या डोळ्यात आनंदाश्रू होते.

Team India Celebration | Social Media

टी-२० इंटरनॅशनल क्रिकेटला अलविदा

टी-२० वर्ल्ड कप जिंकल्यानंतर विराट कोहलीनंतर कॅप्टन रोहित शर्मानेही टी-२० इंटरनॅशनल क्रिकेटला अलविदा केला.

Team India Celebration | Social Media

टीम इंडियाला आनंद

दुसऱ्यांदा टी-२० वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंच्या आनंदाला पाराच उरला नव्हता.

Team India Celebration | Social Media

हार्दिक पांड्या रडला

टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या टी-२० विश्वचषकाची ट्रॉफी जिंकल्यानंतर रडू लागला.

Team India Celebration | Social Media

२००७ जिंकला पहिला वर्ल्ड कप

भारताने याआधी २००७ मध्ये पहिला टी-२० वर्ल्ड कप जिंकला होता. २००७ नंतर भारताने प्रथमच टी-२० वर्ल्ड कप २०२४ ची ट्रॉफी जिंकली.

Team India Celebration | Social Media

या देशांनी जिंकला वर्ल्ड कप

भारत, इंग्लंड आणि वेस्ट इंडिज हे एकमेव देश आहेत ज्यांनी T20 वर्ल्ड कप ट्रॉफी दोनदा जिंकली. आतापर्यंत केवळ ६ देशांनी टी-२० वर्ल्ड कप जिंकला.

Team India Celebration | Social Media

NEXT: Rasika Sunil: रसिका सुनील दिसणार डॅशिंग भूमिकेत...

Rasika Sunil Photos | Instagram/ @rasika123s