Bitter Gourd : कडू 'कारलं' आता मिनिटात फस्त होणार, फॉलो 'करा' या टिप्स; लहान मुलांनाही आवडेल डिश

Bitter Gourd Recipe : आरोग्यासाठी पौष्टिक असलेली कारली कडवटपणामुळे नाकारू नका. कारल्याचा कडवटपणा कमी करण्याच्या सोप्या टिप्स जाणून घ्या आणि बनवा चवदार कारल्याची भाजी.
Bitter Gourd  Recipe
Bitter GourdSAAM TV
Published On

कारली व्हिटॅमिन सी, ए, फायबर इत्यादी गुणांनी समृद्ध आहे. कारली अनेक आजारांपासून आपले संरक्षण करते. त्यामुळे कारली खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. पण ही आरोग्यासाठी पौष्टिक असलेली कडू कारली मुलांना खाऊ कशी घालायची? हा पश्न प्रत्येक महिलेला पडतो. कारल्याची भाजी म्हणतात प्रत्येकाच्या घरात नाकं मुरडली जातात. चला तर मग कारल्यातील कडवटपणा कमी करण्याच्या सोप्या घरगुती टिप्स जाणून घेऊन कारल्याची भाजी बनवूया.

कारल्याचा कडवटपणा कसा कमी करावा ?

  • हिरव्या रंगाची आणि मध्यम आकाराची कारली चवीली थोडी कमी कडू असतात. त्यामुळे भाजी करताना अशा कारल्यांची निवड करावी.

  • करल्याचा कडवटपणा कमी करण्याचा रामबाण उपाय म्हणजे मीठ. करल्याची साले काढून त्यांना मीठ लावून अर्धा - एक तास मीठ असलेल्या पाण्यामध्ये घालून ठेवा. त्यानंतर कारली छान पिळून त्यामधील रस काढून घ्या. जेणेकरून सर्व कडवटपणा दूर होईल.

  • करल्याची साले काढून मधोमध कापून घ्या आणि त्यानंतर तांदळाच्या पाण्यात करली अर्धा तास भिजवून ठेवा. यामुळे कडवटपणा लवकर निघून जाईल.

  • दाण्याचा कूट आणि सुक्या नारळाचा खोबरे घालून कारल्याची भाजी करा. यामुळे कारल्याचा कडवटपणा दूर होतो आणि भाजी चवदार बनते.

  • कारल्याची भाजी करण्यापूर्वी कारल्याचे दोन भाग करून दह्यामध्ये ३० ते ४० मिनिटे घालून ठेवा. त्यानंतर कारली स्वच्छ पाण्याने धुवून घ्या आणि भाजी करा. यामुळे करल्याचा कडवटपणा दूर होईल.

  • करल्याची भाजी कधीच सालासकट बनवू नये. नेहमी साल काढून भाजी करावी. कारण कारल्याच्या सालीमध्ये जास्त कडवटपणा असतो.

  • कारल्याचा कडवटपणा दूर करण्यासाठी एका भांड्यात व्हिनेगर आणि साखर घालून त्यात कारली काही वेळ ठेवावीत . यामुळे करल्याचा कडवटपणा दूर होण्यास खूप मदत होते.

Bitter Gourd  Recipe
Leftover Rice : थांबा थांबा! रात्रीचा उरलेला भात फेकू नका; बनवा 'या' टेस्टी रेसिपी

चविष्ट आणि चटकदार कारल्याची भाजी कशी बनवावी जाणून घ्या..

साहित्य

  • कारले

  • चिंच

  • गुळ

  • कांदा

  • लसूण

  • तिखट-मीठ

  • कोथिंबीर

  • तेल

  • हळद-मोहरी

कृती

सर्वप्रथम कारली कापून त्यामधील बिया काढून घ्या. मग कारली गोल कापून तिच्या चकत्या करा. उकळत्या पाण्यात या चकत्या काही काळ शिजवून घ्या. दुसरीकडे पॅनमध्ये तेल तापवून त्यामध्ये कांदा , लसूण, मोहरी,हळद टाकून छान परतून घ्या. कांदा छान गुलाबी झाल्यावर यामध्ये तिखट मसाला, चवीनुसार मीठ, चिंचेचा कोळ, गुळ आणि कारल्याच्या चकत्या घालून भाजी छान एकजीव करून घ्यावी. शेवटी गॅस बंद करण्याच्या वेळी कोथिंबीर घालून गरमागरम भाजीचा पोळीसोबत आस्वाद घ्यावा.

टीप : ही फक्त सामान्य माहिती आहे. साम टिव्ही या माहितीचे समर्थन करत नाही.

Bitter Gourd  Recipe
Fansachi Bhaji Recipe: पावसात बनवा झणझणीत फणसाची भाजी, जाणून घ्या रेसिपी..

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com