Hypertension and High Cholesterol: कोलेस्ट्रॉलमुळे हाय ब्लड प्रेशरचा त्रास? वाचा तज्ज्ञांनी काय काय सांगितलं

Hypertension and High Cholesterol: बदलती जीवनशैली आणि इतर अनेक बदलांमुळे काही समस्या आपल्या मागे लागल्या आहेत. उच्च रक्तदाबाची अनेक कारणं असू शकतात, त्यापैकी एक म्हणजे वाढलेलं कोलेस्ट्रॉल.
Hypertension and High Cholesterol
Hypertension and High Cholesterolsaam tv
Published On

बदलती जीवनशैली आणि इतर अनेक बदलांमुळे काही समस्या आपल्या मागे लागल्या आहेत. यातील एक समस्या म्हणजे हायपरटेन्शन. हायपरटेन्शन याचाच अर्थ हाय ब्लड प्रेशर म्हणजेच उच्च रक्तदाब. याशिवाय आजकाल एक समस्या दिसून येते ती म्हणजे कोलेस्ट्रॉलची. मात्र कोलेस्ट्रॉल आणि हायपरटेन्शनचा एकमेकांशी काही संबंध आहे का?

उच्च रक्तदाब म्हणजेच हायपरटेन्शन ही लाखो लोकांना प्रभावित करणारी एक सामान्य समस्या आहे. उच्च रक्तदाबाची अनेक कारणं असू शकतात, त्यापैकी एक म्हणजे वाढलेलं कोलेस्ट्रॉल.आपल्या शरीरात कोलेस्ट्रॉल वाढणं आणि उच्च रक्तदाब यामुळे तुमच्या रक्तवाहिन्या आणि हृदयाला नुकसान होऊ शकतं. यांवर नियंत्रण न ठेवल्यास, तुम्हाला हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक, किडनीचं नुकसान यांसारख्या समस्या होण्याचा धोका असतो.

Hypertension and High Cholesterol
High Cholesterol : रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर शरीरात दिसतात 'हे' बदल; 99% लोकं करतात दुर्लक्ष

वाशीच्या फोर्टिस हिरानंदानी हॉस्पिटलमधील सल्लागार-इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजीस्ट डॉ. प्रशांत पवार यांनी माहिती दिली की, अनियमित आणि चुकीच्या खाण्याच्या सवयीमुळे कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते. परिणामी हृदयविकार आणि पक्षाघाताचा धोका वाढतो. या चुकीच्या जीवनशैलीमुळेही रक्तदाब वाढू शकतो, ज्यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवू शकते. ज्यावेळी कोलेस्ट्रॉलची पातळी खूप वाढते त्यावेळी ते रक्तवाहिन्यांमध्ये प्लाक तयार करतात. अशातच उच्च रक्तदाबामुळे रक्तवाहिन्यांवर अधिक दाब पडतो, ज्यामुळे त्या आणखी अरुंद होतात आणि शरीराच्या इतर भागांमध्ये रक्तपुरवठा कमी होतो.

दोन्ही समस्यांवर कसं आणावं नियंत्रण?

जीवनशैलीतील घटक जसं की अस्वास्थ्यकर खाण्याच्या सवयी, शारीरिक हालचालींचा अभाव आणि धूम्रपानामुळे कोलेस्ट्रॉल आणि उच्च रक्तदाब वाढतो. या सवयी सुधारून आपण या दोन्ही समस्यांवर नियंत्रण ठेवू शकतो. प्रत्येकाने आठवड्यातून किमान पाच दिवस ३० मिनिटं व्यायाम करावा आणि तळलेले पदार्थांचं सेवन करणं टाळावं. उच्च रक्तदाब आणि उच्च कोलेस्ट्रॉल टाळण्यासाठी कमी चरबीयुक्त अन्न सेवन करणं हा सर्वोत्तम मार्ग आहे, असंही डॉ. प्रशांत पवार यांनी सांगितलंय.

न्यूबर्ग शाह लेबोरेट्रीचे संस्थापक डॉ. अजय शाह यांनी दिलेल्या माहितीनुसार, उच्च रक्तदाब आणि उच्च कोलेस्ट्रॉल यांचा एकमेकांशी जवळचा संबंध आहे. या दोन्ही समस्यांच्या एकत्रितपणाने हृदयरोग, स्ट्रोक आणि हृदयाशी संबंधित इतर समस्यांचा धोका वाढवतात. अतिरिक्त कोलेस्ट्रॉलमुळे रक्तवाहिन्यांमध्ये फॅट जमा होतं, ज्याला प्लाक म्हणतात. या साठ्यामुळे धमन्या अरुंद होतात. परिणामी योग्यरित्या रक्तप्रवाह होऊ शकत नाही. या स्थितीला एथेरोस्क्लेरोसिस म्हणतात. रक्तवाहिन्या अरुंद झाल्यामुळे, हृदयाला रक्त पंप करण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतात, ज्यामुळे रक्तदाब वाढून हायपरटेन्शनचा त्रास सुरु होतो.

Hypertension and High Cholesterol
Erectile Dysfunction: पुरुषांमध्ये वाढतेय इरेक्लाइल डिस्फंक्शनची समस्या; पाहा कोणत्या पुरुषांना याचा अधिक धोका?

या दोन्ही समस्या सायलेंट म्हणून ओळखल्या जातात. याचाच अर्थ ते गंभीर आरोग्याच्या समस्या उद्भवेपर्यंत कोणतीही लक्षणं जाणवत नाहीत. ज्यावेळी दोन्ही समस्यांचा एकत्रित त्रास होतो तेव्हा एक दुष्टचक्र तयार होतं. उच्च कोलेस्टेरॉल उच्च रक्तदाब वाढवतं आणि उच्च रक्तदाब प्लाक निर्मिती वाढवतं. मात्र एक चांगली बाब म्हणजे हे दोन्ही आजार जीवनशैलीत बदल करून नियंत्रित केले जाऊ शकतात, असंही डॉ. अजय म्हणतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com