High Cholesterol : रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर शरीरात दिसतात 'हे' बदल; 99% लोकं करतात दुर्लक्ष

High Cholesterol Pain Areas: चुकीच्या आहाराच्या सवयीमुळे कोलेस्ट्रॉल वाढू लागतं. यावेळी शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर काही लक्षणं दिसून येतात. ही लक्षणं नेमकी काय आहेत ती पाहूयात.
High Cholesterol Pain Areas
High Cholesterol Pain Areassaam tv
Published On

आजकाल चुकीच्या जीवनशैलीमुळे अनेक आरोग्याच्या समस्या आपल्या मागे लागतात. यावेळी सर्वात मोठी जाणवणारी समस्या म्हणजे कोलेस्ट्रॉल. अवेळी आणि चुकीच्या खाण्यामुळे शरीरातील नसांमध्ये कोलेस्ट्रॉल जमा होऊ लागतं. यामुळे हार्ट अटॅक येण्याचा धोका वाढतो.

आपल्या शरीरात खराब आणि चांगलं कोलेस्ट्रॉल असून वाईट कोलेस्ट्रॉलचा स्तर कंट्रोल करणं फार गरजेचं असतं. अशावेळी शरीरामध्ये वाईट कोलेस्ट्रॉल वाढू लागल्यावर काही लक्षणं दिसून येऊ लागतात. ही लक्षणं हात आणि पायांमध्ये दिसून येतात. जाणून घेऊया ही लक्षणं काय असतात.

पायांमध्ये वेदना होणं

शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल वाढलं की, पाय दुखू शकतात. ज्यावेळी पायांच्या रक्त वाहिन्यांमंध्ये कोलेस्ट्रॉल जमा होतं तेव्हा रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होतो. यामुळे पाय दुखणं आणि क्रॅम्स येण्याची समस्या जाणवू लगाते. अनेकदा या वेदनांमुळे एखाद्या व्यक्तीला चालण्यास त्रास होऊ शकतो. त्यामुळे या लक्षणाकडे अजिबात दुर्लक्ष करू नये.

High Cholesterol Pain Areas
Cancer Risk: तुमच्या घरातील भांडी घासण्याचा साबण तुम्हाला पाडतोय आजारी; 'या' चुकीमुळे वाढतो कॅन्सरचा धोका

हातांमध्ये वेदना होणं

शरीरात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जास्त झालं की, हातांमध्ये वेदना जाणवू लागतात. कोलेस्ट्रॉल वाढल्यास हात आणि खांदा दुखू शकतो. रक्तातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढल्यामुळे हातातील रक्तप्रवाह कमी होतो. यावेळी हाताला मुंग्या येणं किंवा हात सुन्न पडू शकतो. जर वारंवार तुम्हाला हे लक्षणं जाणवत असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

पाठीमध्ये वेदना होणं

रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल जमा झालं की, तुमच्या पाठीमध्ये देखील वेदना होण्याचा धोका असतो. ज्यावेळी रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल जमा होतं तेव्हा पाठीचा कणा आणि त्याच्या आजूबाजूच्या भागात रक्त प्रवाहात अडथळा आणतात. अशावेळी पाठीच्या खालच्या भागात वेदना होऊ शकतात. त्यामुळे जर तुम्हाला सतत पाठीचं दुखणं असेल तर तातडीने टेस्ट करून घेणं गरजेचं आहे.

High Cholesterol Pain Areas
Kidney Damage: किडनी निकामी होण्यापूर्वी तुमच्या पायांमध्ये दिसतात 'हे' बदल; साधारण समजून दुर्लक्ष करू नका!

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com