Cancer Risk: तुमच्या घरातील भांडी घासण्याचा साबण तुम्हाला पाडतोय आजारी; 'या' चुकीमुळे वाढतो कॅन्सरचा धोका

Cancer Risk: भांडी घासल्यानंतर जर तुम्ही त्याच भांड्याचा जेवणासाठी वापर करत असाल तर सावध व्हा. समोर आलेल्या माहितीनुसार, भांडी घासणाऱ्या साबणामुळे कॅन्सर होण्याचा धोका आहे.
Cancer risk
Cancer risksaam tv
Published On

आजारी पडून नये यासाठी आपण आपल्या आरोग्याची पुरेपुर काळजी घेतो. मात्र तुम्हाला माहितीये का, तुमच्या एक चुकीने तुम्हाला कॅन्सर सारखा गंभीर आजार होऊ शकतो. ही तुमच्याकडून किंवा तुमच्या घरी काम करण्यासाठी येणाऱ्या मदतनीसाकडून होऊ शकते. 'यूनिवर्सिटी ऑफ नॉर्थ कॅलिफोर्निया' च्या संशोधकांच्या म्हणण्यानुसार, तुमच्या घरी येणाऱ्या मेडने भांडी घासल्यानंतर जर तुम्ही त्याच भांड्याचा जेवणासाठी वापर करत असाल तर सावध व्हा.

समोर आलेल्या माहितीनुसार, भांडी घासणाऱ्या साबणामुळे कॅन्सर होण्याचा धोका आहे. त्यामुळे घासलेल्या भांड्याना चिकटलेल्या साबणामुळे आपल्याला कॅन्सर होण्याचा धोका वाढतो.

Cancer risk
PCOS मुळे वंध्यत्वाचा धोका कितपत? महिला आई होऊ शकतात का?

साबणामुळे होऊ शकतो कॅन्सर?

कपडे धुण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या डिटर्जेंटमुळे कॅन्सर होण्याचा धोका हा चिंताजनक आहे. कपडे धुण्याच्या डिटेर्जेंटमध्ये बऱ्याच पद्धतीने केमिकल्स असतात. जर हे केमिकल्स तुमच्या शरीरात पोहोचले तर ते तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. त्यामुळे भांडी घासल्यानंतर त्यावर साबण आहे का हे पाहणं गरजेचं आहे.

आतड्यांसाठी धोकादायक आहे डिटर्जेंट?

तज्ज्ञांच्या म्हणण्यांनुसार, जर घासल्यानतंर भांड्यांना साबण चिकटलेला असेल आणि अशाच भांड्यामध्ये जर तुम्ही जेवण बनवलं तर यामुळे कॅन्सर होण्याचा धोका वाढतो. या संशोधनात असंही म्हटलं गेलंय की, भांडी घासणाऱ्या डिटर्जेंट कशाही प्रकारे शरीरामध्ये गेला तर तो आतडं, यकृत आणि किडनीसाठी धोकादायक ठरू शकतं. या डिटर्जेंटमधील केमिकल्स पांढऱ्या रक्तपेशींना कमजोर करतं. यामुळे तुम्हाला इतर अनेक आजार जडण्याची शक्यता असते.

Cancer risk
Postpone Periods Dates: सणासुदीला पुजेनिमित्त मासिक पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्या घेताय? प्रजनन क्षमतेवरही होतोय परिणाम

भांडी घासताना 'या' गोष्टींची काळजी घ्या

द सनच्या रिपोर्टनुसार, भांडी घासून ती धुतल्यानंतर विशेष खबरदारी घेतली पाहिजे. जर असं झालं नाही तर कॅन्सरसारखे धोकादायक आजार होऊ शकतात. ज्या भांडींसाठी आपण डिटर्जंट वापरतो ते धुताना विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. भांडी घासण्याच्या साबणारे असलेल्या केमिकल्समुळे यकृताचा कॅन्सर होऊ शकतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com