Marathi News Live Updates : उद्योजक जितेंद्र तोरणे यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश, श्रीरामपूरमधून उमेदवारीसाठी इच्छुक

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates 6 October 2024 : आज रविवार दिनांक ६ ऑक्टोबर २०२४ महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, देश विदेशासह राज्यातील महत्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra News Live Updates:
Maharashtra Live News UpdatesSaam tv
Published On

उद्योजक जितेंद्र तोरणे यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश, श्रीरामपूरमधून उमेदवारीसाठी इच्छुक

श्रीरामपूर येथील उद्योजक जितेंद्र तोरणे यांनी आज संभाजीनगर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.. जितेंद्र तोरणे हे श्रीरामपूर मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी करण्यास इच्छुक असून आज त्यांनी आपल्या समर्थकांसह शिंदे गटात प्रवेश केलाय.. महायुतीत श्रीरामपूर विधानसभेची जागा शिंदेंच्या शिवसेनेला मिळण्याची शक्यता असल्याने याठिकाणी इच्छुकांची संख्या वाढली आहे..

सायबर हेल्पलाईनच्या माध्यमातून मुंबई पोलिसांनी वाचवले १ कोटी रुपये

सायबर हेल्पलाईन १९३० च्या माध्यमातून मुंबई पोलिसांनी २४ तासात वाचवले तब्बल १ कोटी रुपये

मुंबई गुन्हे शाखेच्या सायबर सेलची कारवाई

एकूण सहा केसेसमध्ये मुंबई पोलिसांनी २४ तासात वाचवले १.१ कोटी रुपये

डिजिटल अरेस्ट स्कॅम सारख्या गुन्ह्यात वाचवली रक्कम

गोल्डन अवर्समध्ये १९३० हेल्पलाईनवर कॉल केल्याने सायबर फसवणूक झालेली रक्कम वाचवण्यात आल यश

२०२४ मध्ये मुंबई पोलिसांनी सायबर फसवणूकितील वाचलेली एकूण रक्कम ११४ कोटी रुपयांच्या घरात

बूथ कमिटी बैठकीत भाजपा कार्यकर्त्यांमध्ये राडा , गोपीचंद पडळकर, तमनगौडा रवीपाटलांचे कार्यकर्ते भिडले

भूमपुत्र मुद्यावरुन भाजपाच्या बूथ कमिटी बैठकीत भाजपा कार्यकर्त्यांमध्ये राडा राडा झाला.भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि भाजपा नेते तमनगौडा रवीपाटलांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. भाजपा पक्ष निरीक्षक आणि पदाधिकाऱ्यांच्या समोरच व्यासपीठावर हा प्रकार घडला आहे.

बीआरएसचे अनेक नेते पवार गटात करणार प्रवेश

भारत राष्ट्र समिती (बी आर एस) चे अनेक नेते हाती घेणार तुतारी

बी आर एस चे अनेक नेते आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात करत आहेत प्रवेश

शरद पवारांच्या उपस्थितीत बी आर एस चे अनेक नेते राष्ट्रवादीत जाणार

जयंत पाटलांनी पैसे वाटल्याचे आरोप सिद्ध करावेत, दीपक केसरकरांचं खुलं आव्हान

लोकसभा निवडणुकीत नारायण राणे किंवा मी कोणालाही पैसे वाटलेले नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जे आरोप केले ते सिद्ध करून दाखवावेत अस आव्हान शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी जयंत पाटील यांना दिलं आहे. उलट लोक बोलतात की जयंत पाटील श्रीमंत आहेत त्यांचे साखर कारखाने आहेत ते लोकांना पैसे वाटतात पण याबद्दल आम्ही कधी बोलतो का ? असा प्रतिसवाल ही केसरकर यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काल सावंतवाडी येथे रवींद्र चव्हाण यांच्यामुळे राणे जिंकले त्यावेळी पैसे वाटण्यात आले होते असा आरोप केला होता यावर केसरकर बोलत होते.

रायगडमध्ये मुसळधार पाऊस

रायगडमध्ये मुसळधार पावसाने सुरुवात केली आहे. कर्जत, खालापुर, खोपोलीमध्ये जोरदार पाऊस कोसळत आहे. ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या सरी पडत आहेत. जोरदार पावसामुळे मुंबई पुणे एक्सप्रेस वे आणि जुन्या महामार्गावर वाहन चालवताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे .

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करताना हिऱ्याच्या पोटी गारगोटी जन्माला आली असे म्हटले आहे. मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोण आहेत? या शिवसेनेच्या पोटातून ते जन्माला आलेले आहेत. मग तुम्ही हिऱ्याच्या सानिध्यात आलेला ढेकूण आहात का? जो मोदी सातत्याने चिरडत आहेत.
संजय राऊत, खासदार शिवसेना

पुण्यातील संगमवाडी येथील पुलावरून एका तरुणाने मारली उडी, अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली.  अग्निशमन जवानांनी नागरिकांच्या मदतीने सदर इसमास जखमी अवस्थेत बाहेर काढून तातडीने रुग्णालयात पुढील उपचाराकरता दाखल केले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या दिल्लीला जाण्याची शक्यता....

Summary

दिल्लीत नक्षलग्रस्त राज्यांच्या सुरक्षा परिस्थितीचा आढावा केंद्रीय गृहमंत्री घेणार असल्याची सूत्रांची माहिती...

या आढावा बैठकित आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना निमंत्रित करण्यातआले असल्याचे कळते...

यात आंध्र प्रदेश, बिहार, छत्तीसगड, झारखंड, तेलंगणा, ओडिशा, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्याच्या मुख्यमंत्र्यांना बैठकिसाठी निमंत्रीत करण्यात आले असल्याची सूत्रांची माहिती.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आदिवासींच्या पारंपारिक नृत्यावर धरला ठेका

उपमुख्यमंत्री अजित पवार आज अहमदनगरमधील अकोले दौऱ्यावर असताना, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अकोले येथे आदिवासी पुरुषांनी नृत्य सादर करून अनोख्या पद्धतीनं स्वागत केले. यावेळी अजित पवार यांनी देखील या नृत्यात सहभाग घेत, आदिवासींच्या पारंपारिक नृत्यावर ठेका धरला.

हर्षवर्धन पाटील उद्या तुतारी हातात घेणार असले तरी त्यांचे पुत्र राजवर्धन पाटील यांनी बारामती तालुक्यातील काटेवाडी येथील युगेंद्र पवारांसोबत कार्यक्रमाला हजेरी लावली. तसेच कार्यक्रमाला गेल्यानंतर युगेंद्र पवारांना राजवर्धन पाटील यांनी उद्या पक्ष प्रवेशासाठी आपण देखील यावं असं आमंत्रण दिलं. पक्षप्रवेश होण्याआधीच राजवर्धन पाटील पक्षाच्या कार्यात सक्रिय झाल्याचे पाहायला मिळाले.

लोकसभेला मतदानाची झाली खडकी म्हणून बहीण झाली लाडकी
अमोल कोल्हे

साहित्य संमेलनाच्या यंदाच्या अध्यक्षपदी डॉ. ज्येष्ठ साहित्यिका तारा भवाळकर यांची निवड

दिल्लीत होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या यंदाच्या अध्यक्षपदी डॉ. ज्येष्ठ साहित्यिका तारा भवाळकर यांची आज निवड झाली. पुण्यातील साहित्य परिषदेच्या पत्रकार परिषदेत अध्यक्षांची घोषणा करण्यात आली. अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष प्राध्यापक उषा तांबे यांनी आज ही घोषणा केली.

Beed : नारायण गडावरील दसरा मेळाव्यास दलित मुस्लिम बांधव लाखोच्या संख्येने उपस्थित राहणार

बीडच्या नारायणगड येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत दसरा मेळावा होणार आहे.. या मेळाव्यासाठी बीड जिल्ह्यातून लाखो दलित- मुस्लिम बांधव देखील जाणार आहेत.

आचारसंहिता लागली की हे सावत्र भाऊ कुठेतरी मांजर आडवा घालतील. त्यामुळे दिवाळीपूर्वी दोन महिन्याचे पैसे दिले आहेत. आमचे नियती साफ आहे. देण्याची प्रामाणिक इच्छा आहे.
एकनाथ शिंदे
येत्या ८-१० दिवसात भाऊबीजेची ओवाळणी मिळेल पण आम्हाला कधीच विसरू नका
अजित पवार

Nanded News : नांदेडच्या सिडको भागात राहणाऱ्या 10 जणांना विषबाधा

नांदेड शहरातील सिडको भागात राहणाऱ्या 10 जणांना विषबाधा झाली आहे. सिडको भागातील रहिवासी असलेल्या परिवारातील 8 ते 10 जणांनी बाभुळगाव परिसरातून सोयाबीनच्या शेंगा आणल्या होत्या. त्या शेंगा रात्री उकडून खाल्ल्या. त्यामुळे रात्री सर्वांना मळमळ होऊ लागली. लागलीच दहा जणांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.मीरा नामदेव खानजोडे वय 14 वर्षे या मुलीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तर अन्य 9 लोकांची जणांची प्रकृती स्थिर आहे. त्याच्यावर शासकीय रुग्णालय विष्णुपुरी येथे उपचार सुरू आहेत. नांदेडच्या नेरली गावात दूषित पाण्यामुळे 700 लोकांना विषबाधा झाली होती. त्यानंतर आता दुसरा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.

Madha News : माढ्यात अभिजीत पाटील यांची बैलगाडा स्पर्धा

माढा विधानसभा मतदारसंघात विविध कार्यक्रमांचा धडाका सुरू आहे. इच्छुक उमेदवार अभिजीत पाटील यांनी माढ्यात बैलगाडा स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेसाठी लाखो रूपयांच्या बक्षिसांचे वाटप केले. मोहेल धुमाळ यांच्या बैलगाड्याने दोन लाख 11 हजार रुपयांचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस जिंकले. स्पर्धा पाहण्यासाठी हजारो शौकिनांनी गर्दी केली होती.

Kolhapur News : तिरुपती देवस्थानकडून करवीर निवासिनी अंबाबाई देवीला मानाचा शालू

करवीर निवासिनी अंबाबाई देवीला शारदीय नवरात्र उत्सवात आज तिरुपती देवस्थानकडून मानाचा शालू अर्पण करण्यात आलाय. एक लाख 28 हजार 700 रुपये किमतीचा गोल्डन रंगाचा शालू असून त्याचे काठ लाल मारून रंगाचे आहेत. तिरुपती ट्रस्टचे प्रशासक बी. शशिधर यांनी सपत्नीक येवून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी अमोल येडगे सुपूर्द करण्यात आला आहे. यावेळी गोविंदा गोविंदा.. अंबा माता की जय असा जयघोषही करण्यात आला. यावेळी देवस्थान समितीच्या वतीने हा शालू स्वीकारण्यात आला असून दसऱ्या दिवशी करवीर निवासिनी अंबाबाई देवीला हा शालू नेसवण्याची परंपरा आहे.

Mumbai News : संभाजी राजे अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या शोधासाठी रवाना

संभाजी राजे अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या शोधासाठी रवाना झाले आहेत. गेट वे ऑफ इंडिया येथून संभाजी राजे रवाना झालेत. आपल्या ५० कार्यकर्त्यांसह संभाजी राजे शिवस्मारकाचा शोध घेणार आहेत.

Mumbai News : चेंबूरच्या सिद्धार्थंनगरमधील आग दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  

चेंबूर येथील सिद्धार्थनगर मधील आगीच्या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत दिली जाईल. तसेच जखमींवर शासनाच्या खर्चाने उपचार केले जातील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आज या दुर्घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यात त्यांनी दुर्दैवी कुटुंबियांची आस्थेने विचारपूस केली. तसेच त्यांना सर्वतोपरी आधार देण्याचा दिलासा दिला.

Maharashtra News: खासदार हेमंत सावरा यांच्या घराबाहेर ओबीसी संघटनेचे आंदोलन व घोषणाबाजी

पेसा नोकर भरती व्हावी या साठी मंत्रालयात आंदोलन करणाऱ्या आमदार खासदारां विरोधात पालघर मधील ओबीसी संघटना आक्रमक झाली असून पालघर लोकसभेचे भाजपचे खासदार हेमंत सावरा यांच्या घराबाहेर ओबीसी संघटनेने आंदोलन सुरू केले आहे. जिल्ह्यातील ओबीसी बेरोजगार तरुणांवर पेसा भरतीच्या निर्णयाने अन्याय होणार असल्याची ओबीसींची भावना व्यक्त करत खासदार हेमंत सावरा यांच्या वाडा तालुक्यातील घराबाहेर ओबीसी संघटनांची घोषणाबाजी करत ओबीसींसाठीही घरावरून उडी मारण्याच्या घोषणा देत आहे ओबीसी संघटनांच खासदार सावरा यांना आवाहन .

Vidhan Sabha Election : शरद पवार गटाकडे 1652 इच्छुकांचे अर्ज, देवळालीतून 62 सर्वाधिक इच्छुक

शरद पवार गटाकडे 1652 इच्छुकांचे अर्ज आले आहेत. देवळालीतून 62 सर्वाधिक इच्छुक असल्याचं समोर आलंय. काल मराठवाड्यात मुलाखती पार पडल्या. आज विदर्भ तर उद्या उत्तर महाराष्ट्रामध्ये मुलाखती होणार आहेत. 8 आणि 9 पश्चिम महाराष्ट्र तर 10 ऑक्टोबर रोजी मुंबई आणि कोकणात मुलाखती पार पडणार आहेत.

Beed News: बीडच्या माजलगावमध्ये 5 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार; नराधम शिक्षकाला ठोकल्या बेड्या

बीडच्या माजलगावमध्ये अंगणवाडीत शिक्षण घेणाऱ्या 5 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम शिक्षकाला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. शहरातील एका शाळेत असणाऱ्या अंगणवाडीत ही घटना घडली होती. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला होता. अखेर पोलिसांनी आरोपी राहुल वायखिंडे या शिक्षकास अटक केली आहे. पोलिसांनी त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Maharashtra Politics: बीआरएसएसचे अनेक नेते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत; आज 'तुतारी' हाती घेणार 

भारत राष्ट्र समिती (बी आर एस) चे अनेक नेते आज हाती घेणार तुतारी

बी आर एस चे अनेक नेते आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात करणार प्रवेश

शरद पवारांच्या उपस्थितीत बी आर एस चे अनेक नेते राष्ट्रवादीत जाणार

आज दुपारी ३ वाजता होणार पक्ष प्रवेश..

Pune News: बालेवाडी परिसरात भाजप नगरसेवकाचे शक्ती प्रदर्शन

पुण्यातील बालेवाडी परिसरामध्ये आज चाळीस हजार कामगारांना दिवाळी सरंजाम वाटप करण्यात आलं. यावेळी मोठ्या शक्ती प्रदर्शन अमोल बालवडकर यांनी केलं.गेल्या 4 महिन्यापासून एक ही भाजपाचा मोठा नेता मंत्री माझ्या कार्यक्रमाला येत नसल्याची खंत व्यक्त करत स्टेज वर कामगार ड्राइवर याना एका खाजगी कार्यक्रमात मुख्य पाहुण्यांचा सन्मान केला.साधारण 20 हजार पेक्षा जास्त लोक हजर आहेत. अमोल बालवडकर बाणेर बालेवाडी परिसरातील भाजपचे नगरसेवक आहेत. यावेळी कामगार वर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होता. अनेक वेळा बालवडकर यांनी पक्षातील नाराजी बोलून दाखवली होती. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ती शक्ती प्रदर्शन त्यांनी केला.

Mumbai News: उड्डाण पुलाच्या कामाच्या श्रेयवादाची लढाई; भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते आमने-सामने

मालाड पश्चिमेकडील मीठ चौकी येथील उड्डाण पुलाच्या कामाच्या श्रेयवादावरून भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याचे या ठिकाणी पाहायला मिळत आहे. काँग्रेस आमदार असलम शेख यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी काँग्रेस मोठ्या संख्येवर काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित असून भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू करण्यात आली याचवेळी भाजप कार्यकर्ते देखील या ठिकाणी जमल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले दोन्ही बाजूकडून घोषणाबाजी सुरू असल्यामुळे या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे पोलिसांकडून दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना पांगवण्याचे काम आता या ठिकाणी सुरू झाले आहे.

Mohan Bhagwat:  'भारत हे हिंदू राष्ट्र..' सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान

भारत हे हिंदू राष्ट्र असल्याचे विधान सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. राजस्थान येथील बारा नगर येथे स्वयंसेवकांच्या एकत्रीकरण कार्यक्रमात शनिवारी बोलत होते. आपण सर्व भारत मातेचे पुत्र आहे त्यामुळे भारत मातेसाठी जगू आणि मरू. पण भारतात भारतासाठी जबाबदार समाज कोण आहे. तर तो हिंदू समाज आहे कारण भारत हा हिंदू देश आहे. हिंदू राष्ट्र आहे. कारण परंपरेपासून प्राचीन काळापासून हिंदू लोक राहतात. त्यावेळी पासून जे राहत होते त्यांना हिंदू नाव मिळालं असल्याच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले

Pune News: बालेवाडी परिसरात भाजप नगरसेवकडून शक्ती प्रदर्शन करत सरंजाम वाटप

पुण्यातील बालेवाडी परिसरामध्ये आज चाळीस हजार कामगारांना दिवाळी सरंजाम वाटप करण्यात आलं. यावेळी मोठ्या शक्ती प्रदर्शन अमोल बालवडकर यांनी केलं.गेल्या 4 महिन्यापासून एक ही भाजपाचा मोठा नेता मंत्री माझ्या कार्यक्रमाला येत नसल्याची खंत व्यक्त करत स्टेज वर कामगार ड्राइवर याना एका खाजगी कार्यक्रमात मुख्य पाहुण्यांचा सन्मान केला.साधारण 20 हजार पेक्षा जास्त लोक हजर आहेत. अमोल बालवडकर बाणेर बालेवाडी परिसरातील भाजपचे नगरसेवक आहेत. यावेळी कामगार वर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होता. अनेक वेळा बालवडकर यांनी पक्षातील नाराजी बोलून दाखवली होती. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ती शक्ती प्रदर्शन त्यांनी केला.

Nagpur Accident: भरधाव ट्रकने चिरडले; १० गाई दगावल्या, नागपुरमधील घटना

नागपूर जिल्ह्याच्या उमरेड तालुक्यातील बेसूर शिवारात कोळशाच्या ट्रकने गायींना चिरडले. यामध्ये आठ ते दहा गाईंचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली.

भरधाव ट्रक कोळसा घेऊन समुद्रपूरच्या दिशेने जात असताना उतारावर गाडी न्यूट्रल केली असल्यामुळे ट्रकवर नियंत्रण सुटल्याची प्राथमिक माहिती..

- दहा गाईंचा अपघातात दगावल्याने गोपालकाचे लाखो रुपयांचे नुकसान

- अंदाजे 50 ते 60 हजार रुपये एका गायीची किंमत असून दहा गाईंचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती. पोलीस गावकरी घटनास्थळी दाखल नागरिकांमध्ये संतापट्रक चालकांवर कारवाई करण्याची गावकऱ्यांची मागणी

Raj Thackeray News : राज ठाकरेंच्या उपस्थित बैठकीला सुरुवात, उत्तर महाराष्ट्राचा घेणार आढावा

विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी राज ठाकरे उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. आज ते नाशिकमध्ये मनसे कार्यकर्ते तसेच पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. या बैठकीत इच्छुक उमेदवारांसोबत ठाकरे संवाद साधणार आहेत. तसेच आगामी विधानसभेची चाचपणी केली जाणार आहे. दरम्यान, राज ठाकरेंच्या उपस्थित बैठकीला सुरुवात झाली आहे.

Bacchu Kadu News : आमदार बच्चू कडूंना मोठा धक्का; प्रहारचा आमदार शिंदे गटाने पळवला

प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चू कडू यांना सर्वात मोठा धक्का बसला आहे. प्रहारचा एकुलता एक आमदार शिवसेना शिंदे गटाने फोडला आहे. मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल लवकरच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

Pimpri Chinchwad News : रोड रोमिओच्या त्रासाला कंटाळून 12 वर्षीय मुलीची आत्महत्या

रोड रोमिओच्या त्रासाला कंटाळून 12 वर्षाच्या मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी परिसरात घडली. याप्रकरणी मृत मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी क्षितिज लक्ष्मण पराड आणि तेजस पांडुरंग पठारे या दोन आरोपींना अटक केली आहे.

Maharashtra Politics : डोंबिवलीत शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का

डोंबिवलीत शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला असून शिंदे गटाचे युवा सेना प्रदेश सचिव दीपेश म्हात्रे आज ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे बंधू माजी नगरसेवक जयेश म्हात्रे हजारो कार्यकर्त्यांसह काही वेळात मुंबईच्या दिशेने निघणार आहेत. उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत दीपेश म्हात्रे यांचा प्रवेश होणार आहे. दीपेश म्हात्रे ठाकरे गटाकडून डोंबिवलित विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता म्हात्रे यांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी आहे.

Pune News :  पुण्यातील सर्व टेकड्यांवर आता बसवण्यात येणार "सर्च लाईट"

पुण्यातील सर्व टेकड्यांवर आता "सर्च लाईट" बसवण्यात येणार आहेत. शहरातील सर्व टेकड्यांवर सायरन सुद्धा बसवले जाणार आहेत. आपत्कालीन परिस्थितीत हा सायरन महत्वाचा ठरणार आहे. बोपदेव घाटातील प्रकरणानंतर पुणे पोलिसांनी महत्त्वाचा निर्णय घेतलाय. काही दिवसांपूर्वी पुण्यातील बाणेर टेकडीवर एका तरुणाला काही चोरट्यांनी लुटले होते. पुण्यातील टेकड्यांवर होणाऱ्या चोऱ्या आणि लूट थांबवण्यासाठी आता पोलिसांकडून मोहीम सुरू होणार आहे.

Nandurbar Breaking : नवापूर तालुक्यात भीषण अपघात; शंभरहून अधिक मेंढ्या ठार

नवापूर तालुक्यातील जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर मेंढ्यांना चिरडले. शंभरहून अधिक मेंढ्या ठार झाल्यात. रस्त्यावर पडला मृत पावलेल्या मेंढ्यांचा खच पडला होता. भरधाव वेगाने रस्त्यावर जात असलेल्या मेंढ्यांना चिरडल्याची घटना घडलीय. घटनेत मेंढपाळांचे लाखो रुपयांचे नुकसान झालेय.

Nashik News : आज मुंबईत होणाऱ्या स्वराज्य पक्षाच्या आंदोलनाला नाशिकहून कार्यकर्ते रवाना

आज मुंबईत होणाऱ्या स्वराज्य पक्षाच्या आंदोलनाला नाशिकहून कार्यकर्ते रवाना झाले आहेत. शेकडो वाहनांचा ताफा मुंबईच्या दिशेने रवाना झालाय. नाशिक शहर आणि जिल्ह्यातून जवळपास 100 हून अधिक वाहने कार्यकर्त्यांसह मुंबईच्या दिशेने रवाना झालेत. आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल, अशी स्वराज्य पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

Pune News : गोखले इन्स्टिट्यूटच्या कुलपतीपदी संजीव सन्याल यांची नियुक्ती

गोखले इन्स्टिट्यूटच्या कुलपतीपदी संजीव सन्याल यांची नियुक्ती करण्यात आलीय. ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. बिबेक देबरॉय यांच्या राजीनाम्यानंतर सन्याल यांची नियुक्ती केली. सन्याल यांची नियुक्ती पाच वर्षांसाठी आहे. सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटी (एसआयएस) आणि गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स यांनी शनिवारी रात्री उशिरा याबाबतची घोषणा केली. सन्याल हे अर्थशास्त्रज्ञ असून पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे सदस्य आहेत. सन्याल यांनी भारताच्या आर्थिक सर्वेक्षणाच्या सहा आवृत्त्या तयार करण्यास मदत केलीय.

Sindhudurg News : एसटी बस थांब्यावरून विद्यार्थ्यांचे रस्त्यावर बसून ठीय्या आंदोलन

कुडाळ तालुक्यातील जांभवडे हायस्कुल समोरील बस स्टॉपवर एसटी बसेस न थांबविल्यामुळे विद्यार्थ्यी, शिक्षक आणि पालकांनी रस्त्यावरच ठीय्या आंदोलन केलं. जांभवडे हायस्कुल येथील शाळेत एसटीने प्रवास करणारे जवळपास 200 विद्यार्थी आहेत. या शाळेपासून बस स्टॉप दुर असल्यामुळे या शाळेजवळच एसटी बसेस थांबाव्यात अशी विनंती शाळा व्यवस्थापन व पालकांनी एसटी प्रशासनाकडे लेखी मागणी केली होती. मात्र मागणी करूनही एसटी बस थांबत नसल्यामुळे विद्यार्थ्यांसह पालक व शिक्षकांनी काल हे आंदोलन केले. दरम्यान शासकीय कामात अडथळा केल्या प्रकरणी संस्था अध्यक्ष, पालक व शिक्षक अशा 13 जणांवर कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune News : पुण्यातील धायरी परिसरात अपघात, PMPML बस झाडाला धडकली

पुण्यातील धायरी परिसरात डीएसके’च्या उतारावर PMPML बसचे ब्रेक निकामी झाल्याने बस खड्ड्यात पडून झाडाला धडकली. सुदैवाने या अपघातात कोणालाही इजा झालेली नाही. ही बस धायरी येथील डीएसके येथून हडपसर भेकराईनगरकडे निघाली होती. त्याचवेळी उतारावर बसचे ब्रेक निकामी झाला आणि बस पत्र्याच्या कंपाउंडला धडकल्यानंतर पुढे खड्ड्यात पडून झाडाला अडकली.

Bhandara News : शिकारीच्या शोधात असलेल्या बिबट्या विहिरीत पडला

भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील पळसगाव (सोनका) येथे शिकारीच्या शोधात असलेल्या बिबट्या पहाटेच्या सुमारास थेट गावातील विहिरीत पडल्याने चांगलीच खळबळ उडाली. पळसगाव ग्रामस्थांनी तातडीनं माहिती वन विभागाल कळवली. वनविभागानं तातडीनं दाखल होत बिबट्याला बाहेर काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहे.

शिकारीचा शोधामध्ये हा बिबट्या फिरत असताना त्याला विहिरीचा अंदाज आला नाही. पाणी असलेल्या विहिरीमध्ये तो अडकला. तासभरापासून वन विभागाची टीम बिबट्याला काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत असून या बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.

Latur News : अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड

लातूर जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील जवळपास 2 लाख 82 हजार हेक्टर वरील पिकांचं प्रचंड मोठं नुकसान झालं होतं., दरम्यान यावेळी मुख्यमंत्री , आणि उपमुख्यमंत्री हे लातूर दौऱ्यावर असताना स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर जात नुकसानीची पाहणी करून केली. यावेळी तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना केल्या. त्यामुळे महिनाभरातच शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होणार आहे. तर लातूर जिल्ह्यासाठी ३८४ कोटी १४ लाख रुपयाचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न सरकारकडून केला आहे.

Mumbai Fire News : चेंबूरमध्ये आग लागून एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू

मुंबईतील चेंबर परिसरात शनिवारी रात्रीच्या सुमारास एक मोठी दुर्घटना घडली. येथील सिद्धार्थ कॉलनीत एका घराला भीषण आग लागली. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील ७ जणांचा होरपळून मृत्यू झाला. मृतांची नावे अद्याप समोर आलेली नाही. अग्निमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com