Itchy Scalp SAAM TV
लाईफस्टाईल

Itchy Scalp : पावसाळ्यात टाळूला वारंवार खाज सुटतेय? घरगुती पदार्थांपासून मिळतील चमत्कारिक फायदे

Hair Care Tips : पावसाळ्यात दमट हवामानामुळे केसांचे आरोग्य धोक्यात येते. टाळूला वारंवार खाज सुटते. अशात घरगुती पदार्थांनी तुमचे टाळूचे आरोग्य चांगले राहील.

Shreya Maskar

पावसाळा आनंदासोबत आरोग्याच्या समस्याही घेऊन येतो. पावसात केसांची विशेष काळजी घेतली पाहिजे. कारण पावसातील दमट वातावरणामुळे केसांच्या समस्या उद्भवतात. पावसात केस कोरडे होतात. केसांमध्ये कोंडा निर्माण होते. तसेच टाळूला वारंवार खाज येते. केस कमकुवत होऊन केसगळतीची समस्या वाढते. पावसाळ्यात केसांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी टाळू भिजवणे टाळले पाहिजे. आठवड्यातून तीन वेळा स्वच्छ केस धुवावे.

तेल मालिश

पावसाळ्यात टाळूला वारंवार खाज सुटू नये म्हणून तेलाने मालिश करावी. यामध्ये टी ट्री ऑइल, खोबरेल तेल आणि एरंडेल तेल याचा वापर करू शकता. खोबरेल तेल अँटीबॅक्टेरियल गुणधर्माने समुद्ध आहे. जे केसांची वाढ चांगली करते. तसेच केस मजबूत ठेवते. एका भांड्यात एरंडेल तेल, खोबरेल तेल आणि मोहरीचे तेल एकत्र करून थोडे गरम करावे आणि या तेलाने टाळूला मालिश करावी. यामुळे केसांचे आरोग्य चांगले राहते. रात्रभर हे तेल केसांना लावून ठेवावे. तसेच सकाळी केस धुण्याआधी टी ट्री ऑइल खोबरेल तेलामध्ये मिसळून डोक्याला लावावे. टाळू शांत झाल्यावर केस धुवून घ्यावे. टाळूला मसाज केल्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत होतो. तसेच केस धुताना केमिकल फ्री शॅम्पूचा वापर करावा.

शरीर हायड्रेट ठेवा

पावसाळ्यात केसांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी शरीर हायड्रेट ठेवणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे नियमित पाणी प्यावे.

ॲपल सायडर व्हिनेगर

ॲपल सायडर व्हिनेगर टाळूच्या आरोग्यासाठी रामबाण उपाय आहे. यामध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल गुणधर्म आढळतात. जे टाळूची खाज कमी करण्यास मदत करतात. पाण्यासोबत थोडे ॲपल सायडर व्हिनेगर मिसळून ते पाणी केसांवर ओता आणि केसांचा छान मसाज करा. कालांतराने केस कोमट पाण्याने धुवून घ्या.

डिस्क्लेमर : ही फक्त सामान्य माहिती आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पंढरपूर दौऱ्यावर

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

SCROLL FOR NEXT