ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
प्रत्येक महिलावर्ग कोरड्या केसांच्या समस्येपासून हैराण असतो.
यासाठी स्वयंपाक घरातील एका पदार्थाच्या मदतीने तुम्हाला कोरड्या केसांच्या समस्येपासून सुटका मिळवता येऊ शकते.
स्वयंपाक घरातील तो पदार्थ म्हणजे तुप.
तुपात अनेक आरोग्यासाठी पोषक असे गुणधर्म आढळतात.
केसांना तुप लावल्यास केसांना चमक येण्यास मदत होते.
केसांच्या टाळूला आठवड्यातून एकदा तुपाने मसाज करावी, असे केल्यास केस मऊ होण्यास मदत होते.
तुपाने केसांची मसाज केल्यास केसांममध्ये रक्ताभिसरण वाढण्यास मदत होते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.