Kitchen Vastu Tips saam tv
लाईफस्टाईल

Kitchen Vastu Tips: किचनमध्ये मसाल्यांचे डबे कोणत्या दिशेला ठेवावेत? वास्तूशास्त्रात सांगण्यात आले आहेत योग्य नियम

Vastu Shastra for Kitchen: वास्तुशास्त्रानुसार किचनमध्ये मसाल्यांचे डबे आणि धान्य कोणत्या दिशेला ठेवावेत? नैऋत्य किंवा पश्चिम दिशा का महत्त्वाची मानली जाते? जाणून घ्या स्वयंपाकघरात डबे ठेवण्याचे ६ वास्तु नियम, काचेच्या डब्यांचे महत्त्व आणि सकारात्मक ऊर्जेसाठी सोप्या टिप्स.

Surabhi Jayashree Jagdish

घरातील किचनमध्ये प्रत्येक वस्तू योग्य ठिकाणी ठेवणं महत्त्वाचं मानलं जातं. वास्तुशास्त्रानुसार, किचनमध्ये ठेवलेले धान्य, मसाले आणि लहान उपकरणांचाही घरातील सकारात्मक ऊर्जेवर परिणाम होतो. त्यामुळे स्वयंपाकघरात मसाल्यांचे डबे आणि धान्य साठवताना काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जाणून घेऊया, वास्तूनुसार मसाल्यांचे डबे कोणत्या दिशेला ठेवावेत आणि ते ठेवताना कोणती काळजी घ्यावी.

मसाल्यांचे डबे कोणत्या दिशेला ठेवावेत?

वास्तुशास्त्रानुसार, किचनच्या नैऋत्य किंवा पश्चिम दिशेला धान्य आणि मसाल्यांचे डबे ठेवणं योग्य मानलं जातं. यामुळे घरात स्थिरता आणि भरभराट राहण्यास मदत होते, अशी मान्यता आहे.

स्वच्छ आणि कोरड्या डब्यांचा वापर करा

धान्य आणि मसाले ठेवण्यासाठी नेहमी स्वच्छ आणि कोरड्या डब्यांचा वापर करावा. हे डबे जमिनीवर न ठेवता कपाटातील वरच्या कप्प्यांमध्ये ठेवावेत. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते, असं वास्तूशास्त्रात नमूद करण्यात आलं आहे.

काचेच्या डब्यांचा वापर करा

मसाले आणि धान्य साठवण्यासाठी काचेचे डबे वापरणं चांगलं मानलं जाते. यामुळे त्यांचा ताजेपणा टिकून राहण्यास मदत होते. तसेच नकारात्मक ऊर्जा तयार होण्यापासून बचाव होतो, अशी वास्तुशास्त्रात मान्यता आहे.

किचनमधील ड्रॉवर नीटनेटकी ठेवा

किचनमधील सामान अस्ताव्यस्त ठेवू नये. मसाले आणि धान्याचे डबे व्यवस्थित लावून ठेवावेत. जुने, खराब झालेले किंवा मुदत संपलेले पदार्थ वेळोवेळी काढून टाकावेत. यामुळे किचनमध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह चांगला राहतो.

डबे रिकामे ठेवू नका

मसाले किंवा धान्याचे डबे पूर्ण रिकामे ठेवणं टाळावं. प्रत्येक डब्यात थोडं तरी धान्य किंवा मसाले असावेत. वास्तुशास्त्रानुसार, रिकामा डबा हे कमतरतेचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे घरात भरभराट राहावी यासाठी डब्यांमध्ये थोडे पदार्थ ठेवावेत.

लवंग आणि खडे मीठ ठेवा

किचनमधील साठवणुकीच्या जागेत काही लवंगा किंवा खडे मीठ ठेवावं. यामुळे नकारात्मक ऊर्जा शोषली जाते आणि किचनमधील वातावरण स्वच्छ आणि सकारात्मक राहण्यास मदत होते, असं वास्तुशास्त्रात सांगितलं जातं.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अग्रीपाड्यात क्राईम ब्रँचची मोठी कारवाई; दोन बंदुकांसह १९ जिवंत काडतुसे जप्त, दोघांना अटक

Raj Thackeray : हिटलरही व्यंगचित्राला घाबरला, आजचे सत्ताधारी.... पाहा राज ठाकरे काय म्हणाले?

Rinku Rajguru: अन्यायाविरुद्ध पेटून उठणाऱ्या लेकीच्या संघर्ष; रिंकू राजगुरु लवकरच पहिल्यांदाच दिसणार अॅक्शन अवतारात

Bribe Case : रायगडमध्ये खळबळ! सरकारी अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात पकडलं; गुन्हा दाखल

Dum Aloo Recipe: रेस्टॉरंटसारखी चमचमीत दम आलू भाजी घरीच बनवा, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT