कपडे धुण्याची योग्य पद्धतकपडे स्वच्छ धुण्यासाठी ते धुण्यापूर्वी डिटर्जंटच्या पाण्यात भिजत घालण्याची सवय असते..कपडे भिजत घालावे की नाही? घाम आणि धुळीने मळलेले कपडे भिजवल्याने मळ लवकर निघतो, हे खरे असले तरी कपडे नेमके किती वेळ पाण्यात भिजवावेत हे माहीत असणे अत्यंत गरजेचे आहे. .कपड्याचे नुकसान होते का?चुकीच्या पद्धतीने जास्त वेळ कपडे भिजवून ठेवल्यास कपड्यांचे आयुष्य कमी होऊ शकते. .कपडे किती वेळ भिजवावेत? रोजचे साधे कपडे: जर कपडे जास्त मळलेले नसतील आणि साधे रोज वापरातले असतील, तर ते ३० मिनिटे ते १ तास भिजत घालणे पुरेसे असते. घामाने किंवा तेलाने मळलेले कपडे जर कपड्यांना खूप घाम आला असेल किंवा तेलकट डाग असतील, तर ते २ ते ४ तास भिजत ठेवू शकता. .नाजूक कपडे सिल्क, लेस आणि लोकरचे नाजूक कपडे जास्त वेळ पाण्यात ठेवू नयेत, त्यांना हलक्या हाताने कमी वेळात धुवावे..रात्रभर कपडे भिजवून ठेवण्याचे तोटे अनेकांना रात्री कपडे डिटर्जंटमध्ये भिजवून सकाळी धुण्याची सवय असते, पण ही पद्धत कपड्यांसाठी अत्यंत चुकीची आहे . कुबट वास जास्त वेळ पाण्यात राहिल्याने कपड्यांना विचित्र आणि कुबट वास येऊ लागतो. डिटर्जंटच्या पाण्यात जास्त वेळ राहिल्याने कपड्यांचा रंग लवकर उडतो आणि ते जुने दिसू लागतात. ओल्या पाण्यामुळे कपड्याचे धागे कमकुवत होतात आणि कापड लवकर फाटू शकते..Black Tea: दररोज एक कप प्या ब्लॅक टी, अवघ्या १० दिवसांत दिसेल रिझल्ट.येथे क्लिक करा...