Washing machine detergent: वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुताना किती डिटर्जंट वापरावं? अनेकांकडून होते 'ही' चूक

Surabhi Jayashree Jagdish

जास्त डिटर्जंट वापरणं टाळा

आजकाल कपडे धुण्यासाठी अनेक जण वॉशिंग मशीनचा वापर करतात. या मशीनमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कपड्यांसाठी खास मोड असतात. कपडे धुताना जास्त फेस आला म्हणजे कपडे जास्त स्वच्छ होतात, असा अनेकांचा समज असतो.

Right detergent quantity | saam tv

कपडे कडक होऊ शकतात

डिटर्जंट जास्त टाकल्यास त्याचे काही अंश कपड्यांवर राहू शकतात. त्यामुळे कपड्यांवर थर तयार होऊन त्यावर धूळ आणि माती चिकटू शकते. यामुळे कपडे खरखरीत होतात आणि त्वचेवर खाज किंवा ॲलर्जीचा त्रास होऊ शकतो.

Laundry washing tips | saam tv

तीन किलो कपडे

वॉशिंग मशीनमध्ये तीन किलोपर्यंत कपडे धुताना डिटर्जंटचं प्रमाण योग्य ठेवावं. कपडे नेहमीच्या प्रमाणात मळलेले असतील तर साधारण दोन मोठे चमचे डिटर्जंट पावडर वापरा. लिक्विड डिटर्जंट वापरताना साधारण ३० मिली प्रमाण घेता येते, मात्र पाकिटावरील सूचनाही तपासाव्यात.

Detergent powder quantity | saam tv

पाच किलो कपडे

वॉशिंग मशीनमध्ये पाच किलोपर्यंत कपडे धुताना डिटर्जंटचं प्रमाण वाढवावं लागू शकतं. कपडे खूप मळलेले असतील तर तीन ते चार मोठे चमचे डिटर्जंट पावडर वापरा. कपड्यांचा प्रकार, मळाचं प्रमाण आणि डिटर्जंटच्या पाकिटावरील सूचनांनुसार योग्य प्रमाण ठरवावं.

Too much detergent effects | saam tv

टॉप लोड मशीनमध्ये डिटर्जंट किती वापरावं?

टॉप लोड वॉशिंग मशीनमध्ये पाण्याचं प्रमाण तुलनेने जास्त असू शकतं. त्यामुळे डिटर्जंट वापरताना मशीनच्या सूचना आणि पाकिटावर दिलेलं प्रमाण पाळावं. साधारणपणे मध्यम प्रमाणातील कपड्यांसाठी ६० मिली आणि जास्त कपड्यांसाठी ९० मिलीपर्यंत लिक्विड डिटर्जंट सुचवलं जातं.

Rough clothes after washing | saam tv

कपड्यांवर साबण राहिल्यास काय करावं?

कपडे धुताना खूप फेस तयार होत असेल तर डिटर्जंटचं प्रमाण जास्त असण्याची शक्यता असते. कपडे धुतल्यानंतरही त्यांना साबणासारखा गुळगुळीत स्पर्श जाणवत असेल तर ते पुन्हा स्वच्छ पाण्याने खळखळून धुवावेत.

Washing machine cleaning tips | saam tv

हाताने कपडे धुताना डिटर्जंटचं प्रमाण

हाताने कपडे धुताना अनेक जण अंदाजाने डिटर्जंट टाकतात. चार ते आठ लिटर पाणी असलेल्या छोट्या टबमध्ये साधारण एक छोटा चमचा डिटर्जंट पावडर किंवा लिक्विड डिटर्जंट वापरा. तर १० ते १५ लिटर पाण्यासाठी दोन छोटे चमचे वापरता येतात. मोठ्या टबमध्ये साधारण एक मोठा चमचा डिटर्जंट वापरता येतं.

Detergent for five kg clothes | saam tv

Amla beetroot carrot juice: रिकाम्या पोटी आवळा, बीट अन् गाजराचा ज्यूस प्यायलात तर काय होईल? वाचा

Amla beetroot carrot juice | saam tv
येथे क्लिक करा