Dum Aloo Recipe: रेस्टॉरंटसारखी चमचमीत दम आलू भाजी घरीच बनवा, वाचा सोपी रेसिपी

Shruti Vilas Kadam

लागणारे साहित्य तयार करा

दम आलू बनवण्यासाठी १० ते १२ लहान बटाटे, २ बारीक चिरलेले कांदे, २ टोमॅटो, अर्धा कप दही, आले-लसूण पेस्ट, जिरे, हळद, तिखट, धणेपूड, गरम मसाला, मीठ, तेल आणि कोथिंबीर घ्या.

Dum aloo | yandex

बटाटे उकडून घ्या

सर्वप्रथम लहान बटाटे स्वच्छ धुवून कुकरमध्ये उकडून घ्या. बटाटे पूर्ण मऊ होणार नाहीत याची काळजी घ्या. थंड झाल्यावर त्यांची साल काढा आणि काट्याने हलके टोचे द्या.

Dum Aloo | Saam Tv

बटाटे तळून घ्या

कढईमध्ये तेल गरम करून उकडलेले बटाटे सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या. त्यानंतर ते एका प्लेटमध्ये काढून ठेवा. यामुळे बटाट्यांना छान चव येते.

Delicious and creamy Dum Aloo | pinterest

मसाल्याची ग्रेव्ही तयार करा

आता कढईत थोडे तेल घालून जिरे टाका. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालून सोनेरी रंग येईपर्यंत परता. त्यात आले-लसूण पेस्ट घालून परतून घ्या. नंतर टोमॅटो घालून मऊ होईपर्यंत शिजवा.

Dum Aloo | pinterest

दही आणि मसाले घाला

आता तयार मसाल्यात हळद, लाल तिखट, धणेपूड आणि मीठ घाला. त्यानंतर फेटलेले दही थोडे थोडे घालून सतत ढवळा. यामुळे ग्रेव्हीला छान चव आणि घट्टपणा येतो. दही घालताना गॅस मंद ठेवा.

Dum Aloo

बटाटे घालून दम द्या

तयार ग्रेव्हीमध्ये तळलेले बटाटे घाला. त्यात गरजेनुसार थोडे पाणी टाकून सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र करा. झाकण ठेवून मंद आचेवर १० ते १५ मिनिटे शिजू द्या. यामुळे मसाल्याची चव बटाट्यांमध्ये छान मुरते.

Dum Aloo

गरमागरम दम आलू सर्व्ह करा

शेवटी भाजीमध्ये गरम मसाला आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. गरमागरम दम आलू तयार आहे. ही चविष्ट भाजी पोळी, पराठा, नान किंवा जीरा राईससोबत सर्व्ह करा.

Weight Loss: पोटाचा घेर अन् मांड्यांची चरबी कमी करायची आहे? जिममध्ये पैसे घालवण्यापेक्षा घरीच करा या ५ सोप्या गोष्टी!

Weight Loss Tips | Saam Tv
येथे क्लिक करा