Simple Kitchen Foods That Help Control Bad Cholesterol google
लाईफस्टाईल

Cholesterol : महत्वाची बातमी! कोलेस्ट्रोल कमी करणारे पदार्थ कोणते? उत्तर स्वयंपाकघरातच दडलंय; जाणून घ्या यादी...

Cholesterol Reducing Foods: स्वयंपाक घरात सहज मिळणारे पदार्थ वाढलेले कोलेस्ट्रोल कमी करू शकतात. योग्य आहार, जीवनशैली बदल आणि तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यास हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो.

Sakshi Sunil Jadhav

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात अनेकांना घरचं खाणं मिळत नाही. कारण लोक कामानिमित्त बराचवेळ घराबाहेर राहत असतात. पण याचा थेट परिणाम तुमच्याशरीरावर होतो. लोक चांगलं आयुष्य जगण्यासाठी खूप मेहनत घेतात. पण त्यावेळेस योग्य खाण्यापिण्याच्या गोष्टींकडे लक्ष देणं सुद्धा गरजेचं आहे. एकदा बाहेरचे पदार्थ खाण्याची सवय लागली की सुटत नाही. याने तुमच्या शरीरातल्या प्रत्येक भागावर परिणाम होतो आणि तुम्हाला कमी वयातच जीवघेण्या समस्यांना सामोरं जावं लागतं. मग तुम्ही केलेल्या मेहनीचं फळ तुम्हीच पाहायला नसता.

नुकत्याच वर्ल्ड हार्ट फाउंडेशनच्या प्रदर्षित झालेल्या अहवालानुसार, जगात दरवर्षी जवळपास ४४ लाख लोकांचा मृत्यू हा फक्त कोलेस्ट्रोलमुळे होत असल्याचं आढळं. यात गंभीर बाब म्हणजे हा आजार आता कमी वयातच तरुणांना गाठतो. तर याचा शेवट हा मृत्यूने होतो. कारण वाढत्या कोलेस्ट्रोलमुळे भविष्यात हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोकाही वाढतो. त्यामुळे वळीच हा आजार जाणून घेऊन त्यावर उपचार करणं खूप महत्वाचं आहे.

पुढील मुद्यात आपण कोलेस्ट्रॉल वाढल्यास डॉक्टरांनी दिलेल्या उपचारासोबत खाण्यात कोणते बदल किंवा कोणते पदार्थ खाल्ले पाहिजेत याबद्दल जाणून घेणार आहोत. जे तुमच्या स्वयंपाक घरात सहज उपलब्ध असतील. हे पदार्थ प्रत्येक चाळीशीतल्या पुरुषाने खाल्ले पाहीजेत. याचा फायदा ओपीडीमध्ये वीस आणि तीस वयोगटातल्या रुग्णांमध्येही एलडीएल कोलेस्ट्रॉल मोठ्या प्रमाणात आढळतो.

तज्ज्ञांच्या मते ओट्स किंवा डाळीया हा एलडीएल कमी करण्यासाठी चांगला पर्याय पर्याय आहे. यामध्ये बीटा-ग्लुकॅन फायबर असतात. त्याने तुमच्या शरीरातील आतड्यामधले कोलेस्ट्रॉल शोषले जाते आणि खराब कोलेस्ट्रॉल कमी होते. संशोधनानुसार रोजच्या रोज ओट्स सेवन केल्याने एलडीएलमध्ये 5 ते 10 टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते.

तसेच बदाम-अक्रोडसारखे सुकामेवे, भेंडी, दुधी भोपळा, गाजर, पालक यांसारख्या फायबरयुक्त भाज्या आणि साखर न घातलेला ग्रीन किंवा ब्लॅक टी हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो. पण फक्त आहारावर अवलंबून न राहता, गरज भासल्यास औषधोपचार आणि जीवनशैलीत बदल करणंही तितकंच महत्त्वाचं असल्याचा इशारा डॉ. अदिती यांनी दिला आहे.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उंची कमी असल्यास कपड्यांची निवड कशी करावी? जाणून घ्या 5 स्मार्ट स्टायलिंग टिप्स

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! मूळ वेतनात होणार ५१००० रुपयांची वाढ? कसं असेल कॅलक्युलेशन?

Maharashtra News Live Update: शेतकरी कर्जमाफसाठी शेतकऱ्यांंचं मंत्रालयाच्या बाजूला असलेल्या झाडावर चढून आंदोलन

भयंकर दुर्घटना! नव्याने बांधलेली इमारत कोसळली; ३ जणांचा मृत्यू,अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता

Maharashtra Politics: मोठी बातमी! एकनाथ खडसे घरवापसी करणार? विनोद तावडेंसोबतच्या भेटीचे फोटो समोर

SCROLL FOR NEXT