Sakshi Sunil Jadhav
उच्च रक्तदाब (High Blood Pressure) हा आजार सध्या अनेकांना भेडसावत आहे. हा आजार हृदयरोग, स्ट्रोक आणि किडनीच्या जीवघेण्या आजारांचा धोका वाढतो.
औषधांसोबतच आहारही महत्त्वाची भूमिका बजावतो. तज्ज्ञांच्या मते काही पदार्थ किंवा फळं रक्तदाब नियंत्रणात मदत करू शकतात. पुढे आपण त्याबद्दल जाणून घेणार आहोत.
केळ्यांमध्ये भरपूर पोटॅशियम असतं. त्याने शरीरातले सोडियमचे प्रमाण नियंत्रणात राहतं आणि रक्तदाब कमी होतो.
किमान 70% कोको असलेल्या डार्क चॉकलेटमध्ये फ्लॅव्होनॉल्स असतात. त्यामुळे तुमच्या नसा सैल होतात. आणि शरीरातल्या प्रत्येक भागात रक्त व्यवस्थित पोहोचतं कोणतेच अडथळे येत नाहीत.
बीटरूटमध्ये नैसर्गिक नायट्रेट्स असतात. त्याने शरीरातले नायट्रिक ऑक्साइडमध्ये रूपांतरित होऊन रक्तवाहिन्या रुंदावतात.
डाळिंबातले अँटीऑक्सिडंट्स रक्तदाब नियंत्रित करणाऱ्या ACE एन्झाइमवर परिणाम करून रक्तदाब कमी करण्यास मदत करतात.
आल्यामधील जैव सक्रिय घटक रक्तदाबाची औषधे जशी काम करतात तसाच परिणाम करतात, असं संशोधनात आढळले आहे.
तज्ज्ञांच्या मते, या पदार्थांसोबत नियमित व्यायाम, मीठ कमी खाणे आणि तणाव नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे.