Sakshi Sunil Jadhav
आचार्य चाणक्यांच्या मते, घट्ट कुटुंबाची खरी ताकद गोपनीयता आणि मर्यादेत असते.
प्रत्येक घरात लहान-मोठे वाद होतात, मात्र ते बाहेर सांगणे धोकादायक ठरू शकते. घरगुती वाद इतरांसमोर मांडल्याने ते लोक भविष्यात त्याचा गैरफायदा घेतात.
आपली आर्थिक परिस्थिती कोणालाही सांगू नका. आर्थिक अडचण सांगितल्यास लोक आदर कमी करतात.
जीवनसाथीचे वागणं, कमतरता किंवा भांडणं इतरांसमोर मांडल्यास नात्यात दुरावा निर्माण होतो.
कुठेही झालेला अपमान सर्वांना सांगू नये. यामुळे लोक सहानुभूती देण्याऐवजी तुम्हाला कमकुवत समजू लागतात.
प्रत्येक कुटुंबात काही गोष्टी गोपनीय असतात. एखाद्या सदस्याची चूक, आजार किंवा जुनी घटना सार्वजनिक झाल्याने कुटुंबाच्या प्रतिष्ठेला धक्का बसतो.
मुलांचे अपयश, सवयी किंवा चुका सतत इतरांसमोर सांगितल्यास त्यांचा आत्मविश्वास कमी होतो आणि भविष्यात त्याचा मानसिक परिणाम होऊ शकतो.
आई-वडील किंवा ज्येष्ठ सदस्यांबद्दल तक्रार करणे किंवा त्यांचा अपमान बाहेर सांगणे कुटुंबातील एकोप्याला तडा देऊ शकते.
घर खरेदी, लग्न, नोकरी बदल किंवा गुंतवणूक यांसारख्या योजना आधीच सर्वांना सांगितल्यास अडथळे निर्माण होण्याची शक्यता असते.