

नाशिकच्या कळवण तालुक्यातील आभोणा-कुंडाणे रस्त्यावर संध्याकाळच्या सुमारास मिनी हायवा ट्रक चा अपघात झाल्याची घटना घडली आहे,विटा खाली करून येत असताना समोरून येणाऱ्या दुचाकीला वाचवण्याच्या नादात चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने तो रस्त्यावरील विजेच्या खांबाला जाऊन धडकला आणि पलटी झाला,याच वेळी रस्त्यावरून जाणार शालेय विद्यार्थी मात्र थोडक्यात बचावला.
संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराज महाराज पालखीच्या पार्श्वभूमीवर गरोदर व स्तनदा माता आणि लहान बालकांकरिता पुणे जिल्ह्यात एकूण ५७ हिरकणी कक्ष उभारण्यात आले असून याकरिता ७ बालविकास प्रक्लप अधिकारी, ५७ अंगणवाडी पर्यवेक्षिका, १९८ गणवाडी सेविकांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद खंडागळे यांनी दिली.
पुण्याच्या खेड तालुक्यात ५ ते ८ जुलैदरम्यान झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी झालीय तालुक्यात पाच मोठ्या दुर्घटनांमध्ये तिघांचा मृत्यू झाला असून शेलू येथील एक व्यक्ती अद्याप बेपत्ता आहे. शेती, पशुधन, रस्ते आणि वीज यंत्रणेचेही मोठे नुकसान झाले आहे.
रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यांना जोडणाऱ्या खेड तालुक्यातील रघुवीर घाटात ढगफुटीसदृश मुसळधार पावसामुळे भीषण भूस्खलन झाले आहे. घाटातील अनेक ठिकाणी मोठ्या दरडी कोसळून महामार्गाची एक बाजू थेट दरीत वाहून गेल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. त्यामुळे महाबळेश्वर तालुक्यातील सुमारे १५ गावांचा संपर्क तुटला आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराज महाराज पालखीच्या पार्श्वभूमीवर गरोदर व स्तनदा माता आणि लहान बालकांकरिता पुणे जिल्ह्यात एकूण ५७ हिरकणी कक्ष उभारण्यात आले असून याकरिता ७ बालविकास प्रक्लप अधिकारी, ५७ अंगणवाडी पर्यवेक्षिका, १९८ गणवाडी सेविकांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद खंडागळे यांनी दिली.
नाशिकच्या येवला-मनमाड रोडवर टू व्हीलर गाडीला वाचविण्याच्या प्रयत्नात क्रूजर गाडी खड्ड्यात गेल्याने गाडीतील आठ ते नऊ प्रवासी किरकोळ जखमी झाले,मनमाडच्या दिशेने क्रूजर गाडी जात असताना रॉंग साईडने टू व्हीलर गाडी आली, तिला वाचविताना हा अपघात घडल्याची घटना घडली आहे.सुदैवाने क्रूझर गाडी झाडावर जाऊ अडकल्या गाडीतील सर्वजण किरकोळ जखमी झाले असून,दुचाकीस्वाराला किरकोळ मार लागला.
टीईटी पेपर फुटी प्रकरणात आणखीन दोघांना अटक ,या प्रकरणात आता पर्यंत एकूण १२ जणांना अटक.
पवन यादव आणि हरिओम असे अटक आरोपींची नावे आहेत.
या दोन्ही आरोपींना उत्तर प्रदेश मधील आग्रा जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे.
अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी मुख्य आरोपी तसेच इतर साथीदारांच्या संपर्कात होते.
दोन्ही आरोपींना आग्रा मधून भिवंडी येथे आणण्यात येत आहे
आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या सहा व या दोघा अशा आठ जणांना न्यायालयात आज सायंकाळी हजर करण्यात येणार आहे.
अशैक्षणिक कामांपासून सुटका, टीईटी रद्द यांसह अनेक प्रमुख मागण्यांसाठी बुलढाणा जिल्ह्यातील विविध संघटनेतील शेकडो शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आज मोर्चा काढला. मुंबई येथील आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनाचा भाग असलेल्या राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनात शिक्षकांचा सक्रिय सहभाग पाहायला मिळाला. शहरातील जिजामाता संकुल समोरून मोर्चाला सुरुवात होऊन नंतर संगम चौक, जयस्तंभ चौक मार्गे जिल्हा कचेरीवर मोर्चा धडकला. यावेळी शिक्षकांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर केले. शासनाने तातडीने शिक्षकांच्या मागण्यांसंदर्भात विचार करून निर्णय घ्यावा, अन्यथा तीव्र स्वरूपाच्या आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही आंदोलक शिक्षकांनी दिला आहे.
लातूर शहरातील पिव्हीआर चौक भागात काही तरुण मुलींची छेड काढत असल्याचा आरोप करत, काही तरुणांनी एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे, यावेळी संतापलेल्या जमावाणे देखील या तरुणाला चांगलाच चोप दिलाय, दरम्यान या तरुणाला एमआयडीसी पोलिसात देण्यात आली आहे.
नगारा पाठोपाठ मानाच्या दिंड्या पुण्यात दाखल
तुकाराम महाराज पालखीचा अश्व पुण्यात दाखल
थोड्याच वेळात संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे पुणे शहरात होणार आगमन
तुकाराम महाराज यांच्या पालखी पाठोपाठ संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी पुण्यात पोहचणार
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे.संततधार पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटातील रस्त्याला मोठमोठ्या भेगा पडल्या असून, त्या लपवण्यासाठी ठेकेदाराकडून तात्पुरती मलमपट्टी करण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे.
पुणे जिल्हा सर्व शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने आज सासवड येथील प्रशासकीय इमारतीसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. पुरंदर तालुक्यातील विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी व शिक्षक मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले.
नाशिक -
- नाशिक महापालिका आयुक्तांच्या दालनाबाहेर ठाकरेंच्या शिवसेनेचे आंदोलन
- पावसामुळे शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे आणि सिंहस्थाच्या कामांमुळे नागरिकांना झालेल्या त्रासाबद्दल आयुक्तांना जाब विचारण्यासाठी आंदोलन
- खड्डे आणि सिंहस्थाच्या ढिसाळ कामांविरोधात घोषणाबाजी
- नागरिकांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी आयुक्तांना निवेदन देऊन करणार चर्चा
नालासोपारा वाखणपाडा परिसरांमधून ताफा निघाला होता या ठिकाणी पालकमंत्री यांची गाडी रस्त्याच्या खड्ड्यामधून निघत होती.
आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागात मुसळधार पावसामुळे भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची माजी मंत्री दिलीप वळसेपाटील यांनी पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. पुराच्या पाण्यात भाताची रोपे आणि लागवडीसाठी तयार केलेली शेती वाहून गेल्याने यंदा भातशेती कशी करायची, असा प्रश्न आदिवासी शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. तातडीने पंचनामे करून योग्य नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी यावेळी केली.
राज्य सरकार विरोधात सोलापुरात हजारोच्या संख्येने शिक्षक उतरले रस्त्यावर
सोलापुरातील चार हुतात्मा चौक ते पूनम गेट पर्यंत शिक्षकांचा निकाला भव्य मोर्चा
शिक्षकांसाठीची टीईटी परीक्षा रद्द,SIR/BLO चे वाढीव काम रद्द झाले पाहिजेत यासाठी निघाला आहे मोर्चा
या मोर्चामध्ये प्राथमिक,माध्यमिक,सरकारी,खाजगी शाळेतील जवळपास दहा हजार शिक्षक सहभागी झाल्याचे चित्र दिसून आले.
तुळजाभवानी देवस्थानच्या 4122 एकर इनामी जमीनीचा घोटाळा..?
घोटाळ्याला जबाबदार तत्कालीन अधिकारी,विश्वस्त,व देवस्थान आहे
तुळजापुरातल्या जमीन घोटाळ्याबाबत अहवाल, मात्र दोषींवर पांघरून घातले जात असल्याचा मंदिर महासंघाचा आरोप
आदिशक्ती संत मुक्ताईंची पालखी उद्या बीडमध्ये दाखल होणार आहे. मात्र यंदा मुक्ताईच्या पालखीचा मार्ग हा खडतर आहे.
बीड शहरात मुक्ताई आणि आजोबा गोविंद पंत यांची भेट होते. त्यामुळे या पालखीला विशेष महत्त्व आहे.
दोन दिवसांचा मुक्काम हा बीडमध्ये असतो.
अमरावतीत टीईटीविरोधात शिक्षकांचा मोर्चा
शाळाबाह्य कामे आणि टीइटीला शिक्षकांचा विरोध...
शिक्षकांवर शाळाबाह्य कामे लावण्यात आली, तसेच टीईटी परीक्षेला विरोध म्हणून शिक्षकांच आंदोलन सुरू आहे..
- खड्ड्यांनी नागरिकांचे जगणे अक्षरशः खडतर झाले आहे...या भागात तीन शाळा असल्यानं तसेच स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे...
- महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. पश्चिम नागपुरातील गणपती नगर, शिव किराणा टॉवर लाईन परिसरातील रस्त्यांच्या दुरवस्थेविरोधात आज मनसेने 'रस्ता रोको' आंदोलन छेडले.
- प्रशासन आणि महापालिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी करत नागरिकांसह मनसैनिकांनी रस्त्यावर उतरून तात्काळ दुरुस्तीची मागणी केली.
गेल्या तीन तास आंदोलन सुरू
अग्निशामक दल पोलीस याच्या वतीने खाली उतवण्याचे काम सुरु आहे
संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीवरून पुण्याकडे निघाली आहे. बोपखेल या ठिकाणी पालखीचे स्वागत करण्यात आलं. अनेक वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी.
नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी कराड शहरातील धोकादायक झाडांची पाहणी करून वाढलेला धोकादायक फांद्या तोडून झाडे न तोडता झाडाभोवतालचे सिमेंट व डांबर काढून झाडांना मोकळे करण्याच्या सूचना केल्या केल्या
बारामती एमआयडीसी परिसरात पालखी मार्गालगत असलेल्या वेस्पा कंपनीच्या मागील बाजूस संशयास्पद दुधाचा टँकर खाली करून चालक घटनास्थळावरून फरार झाल्याची घटना समोर आली आहे.या टँकरमध्ये भेसळयुक्त दूध असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात असून,परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
4 पूर्णांक 6 रिश्टर स्केलची भूकंपाच्या धक्क्याची नोंद.
सलग तीन धक्के जाणवल्याने नांदेड जिल्ह्यातील नागरिक भयभीत.
भूकंपाचा धक्का जाणवल्याने नागरिकांनी रात्र काढली जागून
राजमाता जिजाऊंच्या तिथीनुसार पुण्यतिथी निमित आज किल्ले रायगडच्या पायथ्याशी पाचाड येथील त्यांच्या समाधीस्थळी अभिवादन करण्यात आले. यावेळी मंत्री भरत गोगावले, शिवसेनेचे पदाधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.यानिमित्ताने जिजाऊंच्या समाधीस्थळी फुलांची सजावट करण्यात आली होती दिवसभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे.
- दारणा धरणातील पाणीसाठा ५२ टक्क्यांवर, तर भावली धरण ८७ टक्के भरल्याने दिलासा
- जिल्ह्यातील इतर अनेक धरणांतील पाणीसाठाही ५० टक्क्यांच्या पुढे
- धरणांच्या पाणलोट क्षेत्रात काल दिवसभर मुसळधार पाऊस
- नाशिक जिल्ह्यातील २४ धरणांतील एकूण पाणीसाठा ४७ टक्क्यांवर
- गेल्या वर्षी याच कालावधीत जिल्ह्यात ७० टक्के पाणीसाठा, यंदा तब्बल २० टक्क्यांची तूट कायम
- पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता
पिंपरी चिंचवड -
मोशी कचरा डेपो इमारत दुर्घटनेत पहिला मृतदेह बचाव कार्य पथकाने बाहेर काढला
कचरा डेपो दुर्घटनेत आतापर्यंत एका कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू
आणखी इमारतीच्या ढीगारयाखाली आठ जण अडकल्याची शक्यता
बुलडाणा -
राज्यात मुसळधार, पण बुलडाण्यात पावसाची दडी
जळगाव जामोद-संग्रामपूरमध्ये पेरण्या खोळंबल्या..
दीड महिना उलटूनही समाधानकारक पाऊस नाही..
शेतकरी आकाशाकडे डोळे लावून..
पुणे -
पुण्याच्या मुळशी तालुक्यातील पोमगाव येथील श्री जगद्गुरु प्रतिष्ठान संचलित, श्री राधा चैतन्य गोशाळा गुरववाडी येथे गोशाळेवर दरड कोसळल्याची घटना
या घटनेत जवळपास आठ ते दहा जनावरे दगावली
दरडी खाली दबलेल्या जनावरांना जेसीबीच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले
या गोशाळेत दिडशेच्या आसपास जनावरे असून इतर जनावरांना काहीही झालेलं नाही..सुदैवाने इतर जनावर यातून बचावलीयत.. त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे...
अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय वडूजला व्हावे
जनसंघर्ष समितीचे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू
अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय फलटणऐवजी मध्यवर्ती ठिकाण असलेल्या वडूज येथे स्थापन करावे
या मागणीसाठी खटाव तालुका जनसंघर्ष समितीच्या वतीने वडूज तहसील कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
अमरावती -
अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयातील सीटीस्कॅन मशीन तब्बल १५ दिवसांपासून बंद
हजारो रुग्णांना फटका
मुसळधार पावसाचे पाणी मशीनमध्ये शिरल्याने सेवा ठप्प, अद्याप दुरुस्ती पूर्ण नाही.
सीटी स्कॅनसाठी रुग्णांना सुपर स्पेशालिटी रुग्णालयात रेफर करण्याची अली वेळ,
त्यामुळे उपचारात विलंब आणि मानसिक त्रास.
सुपर स्पेशालिटीवर वाढला अतिरिक्त भार, सीटी स्कॅनसाठी रुग्णांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे.
वाशिम -
शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी टोल प्लाझा जप्तीचे आदेश
जमीन अधिग्रहणाचा योग्य मोबदला शेतकऱ्यांना देण्यासाठी वाशिम जिल्हा न्यायालयानं राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला मोठा दणका दिला
वाशिम जिल्ह्यातील धुमका-तोंडगाव टोल प्लाझा जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.
यवतमाळ -
वन्यप्राण्यांचा वाढता उपद्रव, शेतकरी हैराण
शेतशिवारात माकडांसह वन्यप्राण्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत आहे.
कवळ्या अंकुरांवर हल्ला करून पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी होत आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असून शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करून पिकांचे संरक्षण करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
अमरावती -
अमरावती शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटली
अमरावती मोर्शी रोडवरील नांदगाव पेठ येथे अमरावती शहर व बडनेरा जोडणारी पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी रस्त्यावर
शहराला होणारा पाणी पुरवठा पाईपलाईन दुरुस्त होईपर्यंत विस्कळीत होण्याची शक्यता...
जळगाव -
हातनुर धरणाचे ८ दरवाजे उघडले
हातनुर धरण क्षेत्रात पाण्याची आवक कायम आहे
हातनुर धरणाचे आठ दरवाजे एक मीटरने उघडले
तापी नदीमध्ये १७,०२२ क्युसेक
वेगाने पाणी तापी नदीत सोडण्यात आलं आहे
नदीकाठी असलेल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे
Pune:
चाकण-शिक्रापूर महामार्गावर नित्याची वाहतूक कोंडी
अवजड वाहनांच्या लांबच लांब रांगा
चाकण-शिक्रापूर महामार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे
सकाळपासून महामार्गावर अवजड वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत
प्रवासी आणि औद्योगिक वाहतुकीवर त्याचा मोठा परिणाम होत आहे.
अमरावती -
अमरावतीच्या तिवसा तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात काँग्रेस पक्षासह शेतकऱ्यांच आंदोलन
कृषी अधिकाऱ्याच्या टेबलवर सोयाबीनचं बोगस बियाणे फेकून राज्य सरकार आणि बियाणे कंपनीचा निषेध....
तिवसा तालुक्यात 50 शेतकऱ्यांच्या वर शेतकऱ्यांचे पेरलेले सोयाबीनचे बियाणे निघालेच नाही...
शेतकऱ्यांना बोगस बियाणे देणाऱ्या कंपनीच्या प्रतिनिधींना ठोकून काढणार-काँग्रेस पक्षाचा इशारा
दोन दिवसात शेतकऱ्यांना चांगले बियाणे बियाणे कंपन्यांनी द्यावे-
शेतकऱ्यांनी पेरलेले बियाणे बोगस निघाल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ
पंढरपूर -
चोरीला गेलेले 9 लाख रूपये किंमतीचे दागिने हस्तगत
एंकर - पंढरपूर शहरामध्ये चोरी व घरफोडीच्या तीन गुन्ह्यांचा तपास लावण्यामध्ये पोलिसांना यश आले असून
यामध्ये पोलिसांनी 9 लाख 30 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
विविध तीन ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या होत्या. पोलिसांनी सी सी टीव्ही फूटेज द्वारे चोरीचे गुन्हे उघड करून चोरांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
ऐन आषाढी वारीच्या तोंडावर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.
कोल्हापूर -
कोल्हापुरात ऐतिहासिक छत्रपती शाहू मिलची पडझड सुरूच
मुसळधार पावसामुळे शाहू मिलची संरक्षक भिंत ढासळली
कोटीतीर्थ तलावाकडे जाणाऱ्या रस्त्याकडील भिंतीचा काही भाग कोसळला
कोल्हापुरात सुरू असणाऱ्या पावसाचा परिणाम
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या ऐतिहासिक ठेव्याचं जतन आणि संवर्धन करण्याची गरज
यवतमाळ -
यवतमाळ ग्रामपंचायत निवडणूक अपडेट
सदस्यांचे आरक्षण जाहीर करण्याची प्रक्रिया पूर्ण
८५०० ग्रामपंचायत सदस्यांना अंतिम आरक्षण
उद्या जिल्ह्यातील सदस्यांचे अंतिम आरक्षण जाहीर होणार
यानंतर मतदारयादी प्रसिद्धीचा कार्यक्रम निवडणूक आयोगांकडून जाहीर होणार
नागपूर -
- नागपुरात सर्वच भागात पावसाला सुरुवात, दिवसभराचा उघडीप नंतर पावसाला सुरवात
- राज्यात पुढील चार ते पाच दिवस राहणार पावसाची विश्रांती घेणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे
- काल शहरात सायंकाळी पाऊस झाला होता, आजही दिवसभर उघडीप दिल्यानंतर पाऊस सुरू झाला आहे
बारामती - पुरंदरमधील गराडे धरण 100 टक्के भरले
पुरंदर तालुक्यातील तालुक्याचे शहर असलेल्या सासवड सह पाच गावांना पाणीपुरवठा करणारं गराडे धरण शंभर टक्के भरले
या धरणाच्या सांडव्यातून पाणी करा नदी पात्रात यायला सुरुवात झाली मागील चार-पाच दिवसापासून पुरंदरच्या पश्चिम भागात म्हणजेच पुरंदर किल्ला आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये संत धार पाऊस पडतोय
त्यामुळे गराडे धरण पूर्णपणे भरून आता त्याच्या सांडव्यातून पाणी कऱ्हा नदी पात्रात जाऊ लागले त्यामुळे पुरंदरच्या पश्चिम भागातील जनतेला दिलासा मिळाला
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.