Sakshi Sunil Jadhav
दोन कप दूध, २ अंडी, १ टेबलस्पून कोको पावडर, २ टेबलस्पून साखर, १ ब्रेड स्लाइस, ३ ते ४ थेंब व्हॅनिला इसेन्स इ.
प्रथम दूध गरम करून त्यामध्ये साखर व कोको पावडर विरघळवून घ्यावी. हे दूध थंड झाल्यानंतर त्यामध्ये ब्रेडचे स्लाइस कुस्करून दुधामध्ये मिक्स करावेत.
अंडी नीट फेटून घ्यावीत. मग फेटलेल्या अंड्यांमध्ये व्हॅनिला इसेन्स मिसळून मिश्रण दुधामध्ये मिक्स करावे आणि बाजूला ठेवावे.
आता कुकरमध्ये पाणी घालून पाणी गरम करायला ठेवावे. मध्यम आकाराच्या जाड बुडाच्या भांड्यात साखर व पाणी घालावे. गॅसवर भांडे गरम करून साखर ब्राऊन होऊ द्यावी. चमच्याने मिश्रण सारखे हलवत राहावे.
साखर ब्राऊन झाली की गॅस बंद करून भांडे खाली उतरवावे. मग भांड्यामध्ये तयार केलेले दुधाचे मिश्रण ओतावे. कुकरमध्ये पाणी गरम झाल्यानंतर मिश्रणाचे भांडे कुकरमध्ये ठेवावे व त्यावर प्लेट झाकावी.
कुकरचे झाकण लावून ६ ते ७ शिट्ट्या काढाव्यात. शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करावा. मग कुकरमधील भांडे बाहेर काढून थंड करावे.
भांडे थंड झाल्यानंतर एका काचेच्या खोलगट प्लेटमध्ये पुडिंग काढावे. त्यासाठी भांड्यावर काचेची प्लेट ठेवून भांडे हळुवारपणे उलटे करावे.
पुडिंगचा शेप बदलता कामा नये. मग हे पुडिंग फ्रीजमध्ये २ तास सेट करावे. पुडिंग सेट आणि थंड झाल्यानंतर त्याचे पिसेस करून सर्व्ह करावे.