Nervous System Damage Symptoms saam tv
लाईफस्टाईल

Nerve damage symptoms: हाता-पायांमध्ये ही लक्षणं दिसली तर समजा नर्व्स डॅमेज झाल्यात; कसं कराल याचं निदान?

Nervous System Damage Symptoms: अनेकदा आपल्याला हाता-पायांमध्ये मुंग्या येणे, बधीर होणे किंवा सतत वेदना होण्याचा अनुभव येतो. ही लक्षणे सामान्य वाटत असली, तरी ती तुमच्या मज्जातंतूंचे (Nerves) नुकसान (Nerve Damage) झाल्याचे संकेत असू शकतात.

Surabhi Jayashree Jagdish

  • हात-पायांत मुंग्या येणे न्युरोपथीचे लक्षण असू शकते.

  • मेटाबॉलिक सिंड्रोममुळे न्युरोपथीचा धोका चारपट वाढतो.

  • ७० टक्के रुग्ण न्युरोपथीने त्रस्त आहेत.

तुम्हाला कधी हात-पायांत मुंग्या येणं, सुन्नपणा जाणवणं किंवा विजेचा धक्का बसल्यासारखी तीव्र वेदना जाणवली आहे का? अनेकदा लोक हे लक्षण साधा थकवा किंवा अशक्तपणा समजून दुर्लक्ष करतात. मात्र, हे नर्व्ह डॅमेज म्हणजेच न्युरोपथीचं लक्षण असू शकतं. अलीकडेच जर्नल ऑफ न्युरॉलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनातून धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत.

संशोधनातील महत्त्वाचे निष्कर्ष

अमेरिकेतील मिशिगनमध्ये १६९ लोकांवर अभ्यास करण्यात आला. यामधील रुग्णांचं सरासरी वय ५८ वर्षे होतं आणि त्यातील जवळपास ७० टक्के लोक या आजाराने त्रस्त होते. त्यापैकी सुमारे निम्म्यांना डायबिटीस होता तर उर्वरितांना मेटाबॉलिक सिंड्रोम जसं की, उच्च रक्तदाब, पोटाभोवती चरबी, वाढलेली रक्तातील साखर आणि खराब कोलेस्ट्रॉल यांचा त्रास होता.

रुग्णांची सर्वात मोठी समस्या

अंदाजे ६० टक्के रुग्णांना सतत वेदना जाणवत होत्या. प्रत्येक तिसऱ्या रुग्णाने वेदनेचा त्रास नेहमीच जाणवत असल्याचं सांगितलं. ही व्याधी पडणं, संसर्ग होणं यांसारख्या धोक्यांना कारणीभूत ठरू शकतं. एवढेच नाही तर न्युरोपथीमुळे नैराश्य (डिप्रेशन) आणि अकाली मृत्यूचाही धोका वाढू शकतो.

मेटाबॉलिक सिंड्रोम हा मोठा कारणीभूत घटक

आतापर्यंत असं मानण्यात येतं होतं की, न्युरोपॅथी केवळ डायबिटीसशी संबंधित आहे. मात्र, संशोधनातून उघड झालंय की, मेटाबॉलिक सिंड्रोम असलेल्या लोकांना या आजाराचा धोका चारपट जास्त असतो. म्हणजेच केवळ वाढलेली साखरच नव्हे तर वजन वाढणं आणि उच्च रक्तदाब हे देखील नसा कमकुवत करण्याचं कारण ठरू शकतं.

या अभ्यासात उत्पन्नाचाही विचार करण्यात आला. यावेळी उत्पन्नाचा काहीही परिणाम दिसून आला नाही. पण आश्चर्याची बाब म्हणजे काही कृष्णवर्णीय लोकसंख्येत न्युरोपथीचा धोका इतरांपेक्षा किंचित कमी आढळला.

तज्ज्ञ डॉक्टरांचा इशारा

या संशोधनाची प्रमुख संशोधक डॉ. मेलिसा ए. एलाफ्रॉस यांच्या मते, न्युरोपथीचा वेळेत निदान होणं आणि उपचार करणं अत्यंत महत्त्वाचे आहे. हा आजार केवळ जीवनाची गुणवत्ता कमी करत नाही तर मृत्यूचा धोका वाढवतो. हे संशोधन स्पष्टपणं सांगतं की, हात-पाय सुन्न होणं, झिणझिण्या येणं किंवा सततची वेदना ही साधी बाब नाही. जर अशी लक्षणे जाणवत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.

हात-पायांत मुंग्या येणे कोणत्या आजाराचे लक्षण आहे?

हे न्युरोपथीचे लक्षण असू शकते.

न्युरोपथीचा धोका कोणत्या परिस्थितीत चारपट वाढतो?

मेटाबॉलिक सिंड्रोम असल्यास धोका चारपट वाढतो.

न्युरोपथीच्या रुग्णांपैकी किती टक्के डायबिटीसचे आहेत?

सुमारे निम्मे रुग्ण डायबिटीसचे आहेत.

न्युरोपथीमुळे कोणत्या मानसिक समस्या निर्माण होऊ शकतात?

नैराश्य (डिप्रेशन) होण्याचा धोका असतो.

न्युरोपथीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष का करू नये?

जीवनाची गुणवत्ता कमी होऊन मृत्यूचा धोका वाढतो.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune crime : पुण्यात अल्पवयीन गँगस्टर्सचा धुमाकूळ, गुन्हेगारी जगतातलं भयान वास्तव, पाहा स्पेशल रिपोर्ट

'लाडकीच्या मनात शिंदेच मुख्यमंत्री'; निवडणुकीच्या तोंडावर निलम गो-हेंचं वक्तव्य, VIDEO

Wardha Crime: एका हट्टापायी मैत्रीनं घेतला गळ्याचा घोट; खोलीत शिरला अन् तिला संपवून मोबाईल घेऊन पळाला

Voter Scam: हरियाणात 25 लाख व्होट चोरी; राहुल गांधींनी फोडला हायड्रोजन बॉम्ब

High Speed Internet: गावखेड्यात गतीमान इंटरनेट पोहोचणार; इलॉन मस्कच्या स्टारलिंकशी सराकारचा करार

SCROLL FOR NEXT