Body Pain Symptoms: शरीरातील 'या' भागांमध्ये होणाऱ्या वेदनांकडे दुर्लक्ष करू नका; गंभीर आजारांची असतील लक्षणं

Body pain symptoms: आपल्या शरीरात होणाऱ्या वेदना अनेकदा आपण सामान्य समजून दुर्लक्ष करतो. कधी डोके दुखते, तर कधी पोट किंवा पाठ दुखते. पण काही विशिष्ट भागांमधील वेदना ही एखाद्या गंभीर आजाराचे लक्षण असू शकते.
Body Pain Symptoms
Body Pain Symptomssaam tv
Published On
Summary
  • सतत डोकेदुखी गंभीर आजाराचे लक्षण असू शकते.

  • छातीतील वेदना हृदयविकाराचा इशारा असू शकते.

  • पोटदुखी किडनी स्टोन किंवा यकृताच्या समस्येचे लक्षण असू शकते.

आपल्याला नेहमी डोकेदुखी, पोटदुखी किंवा सांध्यातील वेदना जाणवतात, तेव्हा आपण त्याकडे साध्या त्रासाप्रमाणे त्याकडे बघतो. पण वारंवार किंवा सतत जाणवणारी वेदना ही शरीरातील गंभीर आजाराची सुरुवातीची लक्षणं असू शकतात. तज्ज्ञांच्या मते, जर ही चिन्हं वेळेत ओळखून योग्य उपचार घेतले तर मोठ्या समस्यांपासून बचाव करता येऊ शकतो.

डोकेदुखीला हलकं समजू नका

थकवा किंवा झोपेची कमतरता यामुळे डोकेदुखी होऊ शकते. पण जर ही दुख वारंवार होत असेल किंवा असह्य होत असतील तर ते मायग्रेन, उच्च रक्तदाब किंवा न्यूरोलॉजिकल विकाराचं लक्षण असू शकतं. डोकेदुखीसोबत उलटी, गरगरणं किंवा प्रकाश त्रासदायक वाटणं अशी चिन्हे दिसली तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Body Pain Symptoms
Fatty Liver: धक्कादायक! IT मध्ये काम करणाऱ्या 80% लोकांचं लिव्हर खराब; 'ही' लक्षणं दिसल्यास इग्नोर नका करू!

छातीत दुखणं

छातीतील वेदना आपण अनेकदा गॅस किंवा अपचन म्हणून दुर्लक्षित करतो. पण सतत होणारा छातीतील त्रास हा हृदयविकाराचा झटका किंवा कोरोनरी आर्टरी डिसीजचे सुरुवातीचा संकेत असू शकतात. जर हा त्रास डाव्या हात, खांदा किंवा जबड्यापर्यंत पसरत असेल तर त्याला कधीही दुर्लक्षित करू नये.

Body Pain Symptoms
Bad cholesterol facial signs: नसांमध्ये घाण कोलेस्ट्रॉल वाढल्यास चेहऱ्यावर दिसतात 'हे' संकेत; चुकूनही दुर्लक्ष करू नका

पोटदुखी आणि कंबरेतील वेदना

सतत पोटात किंवा कंबरेच्या खालच्या भागात होणारी वेदना या किडनी स्टोन, अल्सर, यकृताच्या समस्या किंवा महिलांमध्ये पीसीओडीची लक्षणं असू शकतात. यासोबत पोट फुगणं, भूक न लागणं किंवा लघवी करताना जळजळ होणं हीसुद्धा गंभीर आजाराची चिन्हे आहेत.

Body Pain Symptoms
Stomach Cancer Early Symptoms: पोटाचा कॅन्सर होण्यापूर्वी शरीरात दिसतात ५ महत्त्वाचे बदल; दुर्लक्ष करणं पडेल महागात

सांधे आणि हाडांमधील वेदना

जोडांमध्ये किंवा हाडांमध्ये सतत वेदना होत असल्यास, ते संधिवात, ऑस्टिओपोरोसिस किंवा व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होऊ शकते. विशेषतः महिलांमध्ये रजोनिवृत्तीनंतर ही समस्या जास्त दिसून येते.

Body Pain Symptoms
Chest Pain : छातीत दुखण्याचे कारण हार्ट अटॅक आहे कि गॅस, कसे ओळखाल? जाणून घ्या सविस्तर माहीती

डोळे आणि पाठीचा त्रास

डोळ्यांत सतत वेदना किंवा जळजळ जाणवत असल्यास ते ग्लुकोमा किंवा डोळ्यांच्या कमजोरीचं लक्षण असू शकतं. पाठीचा त्रास जास्त वेळ बसून राहिल्याने होऊ शकतो, पण सतत टिकून राहिल्यास तो मणक्यांच्या आजाराचा किंवा हाडांच्या कमकुवतपणाचा इशारा असतो.

Body Pain Symptoms
Gas and chest pain: छातीत वेदना झाल्या तर सावधान! गॅस आणि हार्ट अटॅकमधील खरा फरक समजून घ्या
Q

वारंवार डोकेदुखी कोणत्या गंभीर आजाराचे लक्षण असू शकते?

A

डोकेदुखी मायग्रेन, उच्च रक्तदाब किंवा न्यूरोलॉजिकल विकाराचे लक्षण असू शकते.

Q

छातीतील वेदना कोणत्या आजाराचा इशारा देऊ शकते?

A

छातीतील वेदना हृदयविकाराचा झटका किंवा कोरोनरी आर्टरी डिसीजचा इशारा असू शकते.

Q

पोटदुखी आणि कंबरेतील वेदना कोणत्या आजाराची लक्षणे असू शकतात?

A

किडनी स्टोन, अल्सर, यकृताची समस्या किंवा पीसीओडीची लक्षणे असू शकतात.

Q

सांध्यातील वेदना कोणत्या कमतरतेमुळे होऊ शकते?

A

व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियमच्या कमतरतेमुळे सांध्यात वेदना होऊ शकते.

Q

डोळ्यांतील सततची वेदना कोणत्या आजाराचे लक्षण असू शकते?

A

डोळ्यांतील वेदना ग्लुकोमा किंवा डोळ्यांच्या कमजोरीचे लक्षण असू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com