Serious illness signs: लघवीमधून लाल रंग दिसत असेल तर सावध व्हा; 'या' गंभीर आजाराचे संकेत असू शकतात

Symptoms of Urine Red Color: जर तुम्हाला लाल रंगाची लघवी होत असेल, तर याकडे दुर्लक्ष करणे खूप धोकादायक ठरू शकते. अनेकदा लोक याला सामान्य मानतात, पण हे एखाद्या गंभीर वैद्यकीय समस्येचे लक्षण असू शकते.
Serious illness signs
Serious illness signssaam tv
Published On
Summary
  • लघवीत रक्त येणे गंभीर आजाराचे लक्षण असू शकते.

  • बीट किंवा औषधांमुळे रंग लालसर होऊ शकतो.

  • किडनी स्टोनमुळे मूत्रात रक्त येऊ शकते.

आपल्या शरीरात दिसणारे छोटे–छोटे बदल अनेकदा मोठ्या आजारांचे संकेत देतात. विशेषतः युरिनमध्ये बदल आरोग्याविषयी महत्त्वाची माहिती देतात. सामान्यतः लघवीचा रंग पारदर्शक किंवा फिकट पिवळा असतो. मात्र त्यात लालसर रंग दिसू लागला तर ते धोकादायक ठरू शकते, असे तज्ज्ञ सांगतात.

डॉ. जय वर्मा यांच्या मते, काही अन्नपदार्थ जसं की बीट, बेरीज किंवा काही औषधांचे सेवन यामुळे लघवीचा रंग लालसर होऊ शकते. पण जर सतत मूत्रात रक्त दिसत असेल, तर ही स्थिती हेमॅट्युरिया (Hematuria) म्हणून ओळखली जाते आणि ती गंभीर आजारांची चिन्हे असू शकते.

Serious illness signs
Kidney function slowing down: खराब होण्यापूर्वी किडनी करू लागते संथ गतीने काम; शरीरातील 'हे' बदल वेळीच ओळखा

संभाव्य कारणं

  • किडनी स्टोन- यामुळे मूत्रमार्गात जखम होऊन रक्त येऊ शकते.

  • मूत्रमार्ग संसर्ग – संसर्गामुळे जळजळ आणि रक्त दिसू शकते.

  • ब्लॅडर किंवा किडनी कॅन्सर – सुरुवातीच्या टप्प्यात लघवीतून रक्त येणं हे एक लक्षण असतं.

  • किडनीचे आजार – किडनीचं कार्य व्यवस्थित न चालल्यास मूत्राचा रंग बदलतो.

  • रक्त गोठण्याची समस्या – आतल्या जखमा किंवा ब्लड क्लॉटिंगमुळे रक्त दिसू शकते.

Serious illness signs
Early signs of heart disease: शरीरात दिसणारे 'हे' ८ बदल वेळीच ओळखा; हृदयाच्या आजारांचा धोका दर्शवतात लक्षणं, दुर्लक्ष नकोच!

कधी घ्यावी डॉक्टरांची मदत?

तज्ज्ञांच्या मते, जर लघवीतील लालसरपणा दोन दिवसांत न गेला किंवा त्यासोबत वेदना, जळजळ, ताप, वजन कमी होणं किंवा वारंवार लघवी लागणं अशी लक्षणं दिसली तर तातडीने डॉक्टरांची तपासणी करून घेणं आवश्यक आहे.

Serious illness signs
Kidney Failure Symptoms: किडनी फेल होण्यापूर्वी शरीर देतं 'हे' संकेत, वेळीच ओळखून उपचार करा

यावर काय उपाय करू शकता?

  • पुरेसे पाणी पिणं

  • संतुलित आहार घेणं

  • मद्यपान व जास्त मीठ टाळणं

  • वारंवार होणारा UTI दुर्लक्षित न करणं

  • वेळोवेळी आरोग्य तपासणी करणं

Serious illness signs
Silent heart attack symptoms: सायलेंट हार्ट अटॅक येण्यापूर्वी शरीरात होतात 'हे' मोठे बदल; संकेत लक्षात येणं फारच कठीण

तज्ज्ञांचा सल्ला आहे की, युरिनमध्ये लालसरपणा दिसणे हे कधीही किरकोळ लक्षण मानू नये. योग्य वेळी तपासणी व उपचार केल्यास गंभीर आजारांपासून बचाव होऊ शकतो.

Serious illness signs
Hidden Heart Attack: कसा ओळखाल सायलेंट हार्ट अटॅक? जीवावर बेतण्यापूर्वी जाणून घ्या
Q

लघवीचा रंग लालसर का होतो?

A

बीट, औषधे, किडनी स्टोन किंवा संसर्गमुळे लघवी लालसर होते.

Q

हेमॅट्युरिया म्हणजे काय?

A

मूत्रात रक्त आल्यास त्याला हेमॅट्युरिया म्हणतात.

Q

लघवीत रक्त आल्यास कोणता आजार असू शकतो?

A

किडनी स्टोन, संसर्ग किंवा कॅन्सर असू शकतो.

Q

लघवीत रक्त दिसल्यास कोणती लक्षणे गंभीर आहेत?

A

वेदना, जळजळ, ताप आणि वजन कमी होणे ही गंभीर लक्षणे आहेत.

Q

लघवीत रक्त आल्यावर कोणता उपाय तातडीचा आहे?

A

पुरेसे पाणी प्यावे आणि तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com