लाईफस्टाईल

Side Effects of Tea : तुम्हालाही सतत ‘चहा’ पिण्याची सवय आहे ? तर आताच बदला! होऊ शकतात हे गंभीर परिणाम

Health Tips : चहा बद्दल सांगायचं झालं तर माणसाच्या दिवसाची सूरवात होते ती म्हणजे एक कप चहाने. खूप कमी लोक असतील ज्यांना चहा आवडत नसेल. बाकी इथले सगळेच चहाप्रेमी आहेत.

Aarti Ingle

चहा म्हटले की प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय असतो. मात्र हाच चहा तुमच्या आरोग्यावर अतिशय गंभीर परिणाम करू शकतो. अनेक लोकांना तर चहा घेतल्याशिवाय कामातही काही सुचत नाही तर काहींचा दिवसच चहाने सुरू होतो. चहा प्रेमींसाठी चहा म्हणजे अमृत आहे. पावसाळ्यात तर चहा पिण्याचा एक वेगळाच आनंद असतो, पण चहाचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास आरोग्याशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात.

तुम्ही आवडीने पिणाऱ्या चहामुळे तुमचे आरोग्य धोक्यात जाऊ शकते. चहा पिण्याचे काय गंभीर परिणाम होतात ते एकदा नक्की वाचा.

1. पचनाच्या समस्या

चहा जास्त प्रमाणात प्यायल्याने पोटाच्या समस्या निर्माण होतात. अति चहामुळे ॲसिडिटी तसेच बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो.

2. छातीत जळजळ

चहाचे जास्त प्रमाणात सेवन केल्यामुळे छातीत जळजळ होऊ शकते. विशेषत रिकाम्या पोटी चहा घेतल्याने मळमळ आणि चक्कर (Dizziness)आल्यासारखे होते.

3. झोपेवर परिणाम

चहामध्ये कॅफिन असते, कॅफिनचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने झोपेमध्ये समस्या निर्माण होतात. रात्री चहाच सेवन केल्याने झोप उडते, ज्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी थकवा(stress) जाणवू शकतो.

4. ब्लड प्रेशर

चहामध्ये असणारे कॅफीन शरीरात मिसळल्याने ब्लड प्रेशर वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे ब्लडप्रेशरचा त्रास असणाऱ्यांनी चहाचे कमी सेवन करावे.

5. डायबिटीस होण्याची शक्यता

चहामध्ये साखर असते त्यामुळे शरीरातील साखरेची पातळी वाढण्याची शक्यता असते. दुधाच्या (Milk)चहाचे अधिक सेवन केल्याने टाईप २ डायबिटीस होण्याची शक्यता निर्माण होते.

6. अल्सर

अल्सर ही पोटाची एक समस्या आहे. बराच वेळ उपाशी राहल्याने एकदम चहा प्यायल्यास पोटातील आम्ल खवळल्यासारखे होते आणि अल्सरची समस्या निर्माण होते.

7. दातांवर परिणाम

चहामध्ये असलेली साखर(sugar) दातांसाठी घातक ठरू शकते. याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने दातांवर कॅविटी होण्याची दाट शक्यता असते. तसेच चहावर पाणी प्यायल्याने दात दुखण्याची समस्या निर्माण होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT