Local Body Election : स्थानिक निवडणुकीत आता 'साडी पॅटर्न'; अवघ्या महिलांची 40 रुपयावर मतदारांची बोळवण, VIDEO

Local Body Election in Mahrashtra : महाराष्ट्राच्या इतिहासात सुरतचं विशेष महत्व आहे.. एकनाथ शिंदेंच्या बंडावेळीही सुरत चर्चेच्या केंद्रस्थानी होतं.. आता पुन्हा सुरत शहर चर्चेच्या केंद्रस्थानी आलंय ते निवडणुकीत मतदारांना आमिष देण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या अनोख्या पॅटर्नसाठी...मात्र हा पॅटर्न नेमका काय आहे? पाहूयात...
election
Local Body Election Saam tv
Published On

ऐकलंत... 40 रुपयात साडी विकणारं हे आहे सुरतचं बॉम्बे मार्केट... आता हेच मार्केट चर्चेत आलंय. कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सुरतमधून दररोज 1 लाख साड्या महिला मतदारांना वाटण्यासाठी खरेदी करण्यात येत आहेत..

प्रत्येक निवडणुकीत मतदारांना आमिष देण्याची प्रथा रोखल्याचा दावा निवडणूक आयोग करतं.. मात्र ही प्रथा रोखणं निवडणूक आयोगाला काही शक्य होत नसल्याचं चित्र आहे.

सुरतमधील 50 वर्षे जुनं मार्केट असलेल्या बॉम्बे मार्केटमध्ये 1 हजार साड्यांची दुकानं आहेत.. याच दुकानातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदारांना आमिष देण्यासाठी लाखो साड्या आणल्या आहेत..

election
Maharashtra Politics : मी स्टार प्रचारक, खर्चाची अजिबात चिंता करू नका; ऐन निवडणुकीत भाजप नेत्याचं वक्तव्य, चर्चांना उधाण

पुरुष मतदारांना दारु, मटण तर महिला मतदारांना साडी आणि घरगुती वापराच्या वस्तुंचं वाटप केलं जातंय.. असाच प्रकार पिंपरी चिंचवडमध्येही आढळून आलाय...

निवडणूक निष्पक्ष व्हावी, यासाठी मतदारांना देण्यात येणारी आमिष रोखणं गरजेचं आहे... मात्र आता मतदारांना वाटण्यासाठी 40 रुपयांच्या लाखो साड्या सुरतमधून आणल्या जात असतील तर निवडणूक आयोगाने त्याचा शोध घेऊन कारवाई करायला हवी..

election
BMC Election : महापालिकेची ही शेवटची निवडणूक, हातातून मुंबई गेली तर...; राज ठाकरे स्पष्टच बोलले, VIDEO

एवढंच नाही तर एक किलो साखर आणि दूध पिशवीसाठी 100 रुपये मोजावे लागतात. त्यामुळे फक्त साड्या वाटून मतदारांचं मत विकत घेतलं जात असेल तर आपल्या मताची किंमत 40 रुपयेच आहे का? याचा विचार मतदारांनीच करायला हवा.. आणि मतरुपी स्वाभिमान विकत घेण्याची हिंमत करणाऱ्यांना मतदारांनी घरचा रस्ता दाखवायलाच हवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com