Maharashtra Politics : मी स्टार प्रचारक, खर्चाची अजिबात चिंता करू नका; ऐन निवडणुकीत भाजप नेत्याचं वक्तव्य, चर्चांना उधाण

Maharashtra Political News : भाजप नेत्याच्या वक्तव्याने चर्चांना उधाण आलं आहे.
Gadchiroli news
Gadchiroli Saam tv
Published On
Summary

'मी स्टार प्रचारक आहे, खर्चाची चिंता करू नका” असे बावनकुळेंचे वक्तव्य

गडचिरोलीतील कार्यक्रमात बजेट कमी असल्याचे आयोजकांनी सांगितलं

बानकुळेंच्या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात चर्चा

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांनी महाराष्ट्र पिंजून काढायला सुरुवात केली आहे. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे देखील भाजप उमेदवारांचा जोरदार प्रचार करताना दिसत आहेत. याच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीत राजकीय वातावरण तापलं आहे. या निवडणुकीच्या रणधुमाळीदरम्यान 'मी स्टार प्रचारक आहे. खर्चाची अजिबात चिंता करू नका, असं मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं. बावनकुळे यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

चंद्रशेखर बावनकुळे आज गडचिरोलीच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी भाजपच्या उमेदवाराच्या प्रचाराच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमात काही महिला उन्हात बसलेल्या दिसल्या. लाडक्या बहिणीसाठी मंडप मोठा का बांधला नाही, असा सवाल बावनकुळे यांनी कार्यक्रमाच्या आयोजकांना केला.

Gadchiroli news
Fact Check : म्हशीनं पाजलं बिबट्यांना दूध? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय? VIDEO

बावनकुळेंच्या प्रश्नावर भाजप नेत्यांनी बजेट कमी असल्याचे कारण सांगितलं. खर्चाचा हिशोब निवडणूक अधिकाऱ्यांना द्यावा लागतो. यावर बावनकुळे म्हणाले, 'मी स्टार प्रचारक आहे. मला हिशोब देण्याची गरज नाही'. पुढे म्हणाले, 'निवडणूक आयोगाला हिशोब दाखवू. वाढीव ५० रुपयांच्या खर्चाची ही बाब आहे. तुम्ही बजेटचं अजिबात टेन्शन घेऊ नका'. बावनकुळे यांनी केलेल्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. विरोधकांनी भाजप नेते बावनकुळे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

Gadchiroli news
Nepal Protest : नेपाळमध्ये पुन्हा हिंसाचार; आंदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक, विमानतळ बंद

बावनकुळे यांनी नेमकं काय म्हटलं?

'आम्ही निवडणूक आयोगाला हिशोब देऊ. तुम्ही खर्चाची चिंता करू नका. पडदा लावण्याचे अवघे ५० रुपये खर्चात मोजले जातील. मी स्टार प्रचारक आहे. मी राज्यात आहे. आपण राज्यात हिशोब देऊ,असे ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com