

नेपाळमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार
Gen-Z आंदोलक पुन्हा रस्त्यावर
विमानतळावर सर्व उड्डाणे रद्द
नेपाळमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार झाला आहे . Gen-Z आंदोलकांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा पवित्रा घेतलाय. तरुणांनी नेपाळमधील सेमरा विमानतळाच्या बाहेर आंदोलन करायला सुरुवात केली आहे. आंदोलनकर्त्यांनी UML नेते महेश बस्नेत यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतलीये.. मागील आंदोलनादरम्यान बस्नेत यांनी माजी पंतप्रधान केपी शर्मा यांचं समर्थन केल्याने भडका उडाला आहे. बस्नेत हे विमानतळावर येत असल्याचे कळताच नेपाळमध्ये पुन्हा Gen-Z रस्त्यावर उतरले आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, UML नेते शंकर पौडेल आणि महेश बस्नेत हे रविवारी एका राजकीय कार्यक्रमासाठी येणार होते. त्यांच्या आगमनानंतर तातडीने Gen-Z समर्थकांनी रस्त्यावर घोषणाबाजी केली. आंदोलकांनी सेमरा विमानतळावर घेराव घातला. आंदोलक मोठ्या संख्येने जमल्याने पोलिसांचा मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात करण्यात आला. तसेच विमानतळाची सुरक्षा देखील वाढवण्यात आली आहे.
आंदोनलनानंतर जिल्हाधिकारी धर्मेंद्र कुमार मिश्र यांनी तातडीने कर्फ्यू लागू केला आहे. सेमरा विमानतळावर दुपारी १२.३० वाजेपासून रात्री ८ वाजेपर्यंत कर्फ्यू लागू केला आहे. जिल्हाधिकारी मिश्र यांनी स्पष्ट केलं आहे की, आंदोलनावर नियंत्रण मिळवण्यासाठी कर्फ्यू लागू करणं आवश्यक आहे'.
कर्फ्यू लागू केल्यानंतर सेमरा विमानतळावरील सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. कर्फ्यूमुळे अनेक प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. मात्र, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी निर्णय योग्य असल्याचे नेपाळच्या सुरक्षा यंत्रणांनी म्हटलं आहे.
गेल्या महिन्यांपासून नेपाळमध्ये आंदोलने सुरु आहेत. तरुणांच्या आंदोलनाने नेपाळमध्ये सत्तांतर झालं. मागील आंदोलनादरम्यान यूएमएल नेते महेश बस्नेत यांनी माजी पंतप्रधान शर्मा यांना पाठिंबा दिला होता. आता त्यांच्या विरोधातच नेपाळमधील राजकीय वातावरण तापलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.